© राशी राकेश राऊत
“ले ,लो. ले ,लो. ताई चूड़ी ले, लो. मोहन माळ तर कुणी बकुळी हार. अब्बू चाचा चा आवाज ऐकताच गावातील मुली बायका त्याच्याकडे धाव घेत असत.
सरू आठ दिवसापासून अब्बु चाचा ची वाट पाहत होती. तिला छानशी ठुशी हवी होती. ती अब्बू चाचा तिच्यासाठी आणणार होते. नीताला रंगीत रिबिनी नि मोनूला खुळखुळा.
माझ्याकडे बऱ्याच केशरी बांगड्या आहेत पाटल्याही आहेत. पण मला या खेपेला पिचोडी बांगड्याच हव्या आहेत.
“चल ,चल .लवकर चल नाहीतर ही ट्रेन निघुन जाईल.” म्हणत सरूचा हात पकडत कुंजू उमेला सोबत घेऊन स्टॉपवर आली..
चाचाच्या अवती भोवती सर्व बायका मुली जमलेल्या.
चाचा कोणाला काजळी डब्बी तर कोणाला गंधाची बाटली देण्यात व्यस्त होता.
‘चाचा कुंजू की नाही तुम्हाला ट्रेन बोलत असते.’ पण चाचा नेहमीप्रमाणे त्याच्या घाईतच होता .
अबू चाचा नेहमी गावात येत असे .
गेल्या चार-पाच वर्षांपासून सगळ्यांनाच परिचित असलेला. मोजकच बोलणं नि भरभर निघून जाणं.
बायकांना अब्बू चाचाचा हा स्वभाव आवडत नसे.
बायका त्याला नेहमी म्हणत, “काय रे चाचा, तुलाच कसली इतकी घाई असते रे? आम्हा बायकांना तर किती काम असतं. तुला काय आमच्या बायकांचे हाल समजणार काय असतात ते?”
अरुणा काकी बोलत होती नि अब्बू चाचा च्या चेहऱ्यावर सौम्य हसू दिसलं.
“बरं बाई नाही कळत अब्बू चाचा ला . आता ताई सांगाल का मला काय देऊ आज? काजळाची डब्बी की अत्तराची कूपी ? चला बायांनो घ्या लवकर. उरका आता. मला उशीर होतोय” म्हणत अब्बू चाचा घाई घाईतच सर्वांना वस्तू देत कोणाला बांगड्या देत तर कोणाला खेळणी देत पसार पण झाला. ..
अमिना भाभी बोलली, “बहुत घाई असती है इसको हमेशा! मेरा पैसा भी नही दिया. आने दे अगली बार तभी देखती हूँ!”
नि विनाला म्हणाली, “क्या रे तेरेको बत्तख दिया क्या बदली करके?”
विना लगेच म्हणाली, “हो हो मग काय तर ! पन्नास रुपये मी काय असेच वाया जाऊ दे ईन का?”
विनाची मुलगी सावी मधेच बोलली, “आई निकुने बदक तोडलेला. आता अब्बू चाचा ने पुन्हा नवीन दिला की देऊ नकोस हं पुन्हा तिला.”
विना तिच्याकडे मोठे डोळे करत म्हणाली,” चल, चल.”
निकु ला घेऊन विना घराच्या दिशेने गेली. तेव्हा विणाने आणलेली पाचशे रुपयांची नोट चुकून तिच्या हातून तिथेच पडली आणि तिला कळले देखील नाही..
कुंजू अमीना चाचीला म्हणाली, “बघितलं का अमिना चाची? विना ने चाचाला पुन्हा थाप मारली. नि मोडलेले बदक देऊन आता पुन्हा नवा घेणार.”
त्यावर अमीना म्हणाली, “तो क्या हुआ? बच्चे का खिलोना है ! वापस दिया बदली करके तो क्या बिघडता है! तू भी न कुंजुं बहुत सोचती है. “
“अब्बू चाचा ने मेरे तीस रुपये भी अभी तक नही दिये.”
“आज कितना घाई मे चला गया. चल मेरे को बहुत काम पडा है! बाद मे आती हू.” बोलून अमीना चाची घरी गेली.
कुंजू एक लग्न झालेली स्त्री होती. कुंजुला अमिना चाची चे बोलणे पटले. बरोबरच आहे हिच. अब्बू चाचा नेहमीच असा घाईत येतो. कोणाचे पैसे कमी देतो. तर कोणाला मोडके खेळणे देऊन जातो.
कुंजुनी चाचा ला ज्या पिचोडी बांगड्या आणायला सांगितल्या होत्या, त्याही त्याने आणल्या नव्हत्या. त्यामुळे कुंजूच्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण झाला होता.
उमाला मात्र एक टिकलीच्या पाकिटा ऐवजी दोन -तीन पाकीट मिळाली होती.
कुंजू म्हणाली, “काय गं हा असा चाचा ! ह्याला जरा सुद्धा वेळेचे महत्व कळत नाही. नि कामात पण त्याला त्याच्या रस वाटत नाही. कसला मेला घाईत येतो . नि घाईत जातो. छे बाई! पुढच्या वेळेस पासून मी काहीच घेणार नाही याच्याकडून.” कुंजू उमेला म्हणाली. त्यावर उमा म्हणाली, “तू नको घेऊस गं बाई .पण माझा तर आज पण फायदाच झाला आहे. त्या दिवशी अबू चाचा नी सूरमा बाटली चे पैसे लावले नाहीत की सुईच्या पाकिटाचे ही. नि आज तर उलट एक टिकलीच्या पाकिटा ऐवजी तीन -तीन पाकीट मला मिळाली आहे .मी तर घेईन बाई पुढच्या वेळेस ही अब्बू चाचा कडूनच.” असे चिडवत कुंजुला उमा सांगू लागली.
कुंजूला ही गोष्ट काही पटलेली नव्हती. पण तिने उमेला काहीच उत्तर न देता घरात निघून गेली.
घरी आल्यावर कुंजूच्या मुलांनी केलेला पसारा पाहून कुंजूच्या कपाळावर आट्या पडल्या.
“काय रे ? खूप मस्ती आलीय का तुम्हाला? लोकांना मिळत नाही तसले कपडे खेळणी आहेत . म्हणून अशी का फेकून द्यायची? नि सोनू तू तर हद्दच केली .उचल आधी तो पैशांचा गुल्लक. आठ दिवस पण झाले नाही तुला अब्बू चाचा कडून घेऊन दिलेल्याला. नि तू असा फेकलास. उचलतो की नाही ?” रागात कुंजू म्हणाली . दोघी
गावामध्ये मुली बायकांमध्ये कुंजू जरा वेगळ्याच स्वभावाची होती. सर्व पसारा आवरून कुंजू बाहेर अंगणात आली.
रस्त्यावरूनच शकू नी कुंजू ला आवाज दिला. शकू अंगणात आली व दोघी अंगणात बसून गप्पा मारण्यात दंग झाल्या. शकुला लग्नाला जायचे होते सर्व तयारी पण झालेली. पण शकुला मनासारखी पार्लर वाली मिळत नव्हती .
तेव्हा शकू ने तिची ही अडचण कुंजुला सांगितली.
“कुंजू आपण जाऊया का दूरच्या गावी? तिथे कोणी चांगली पार्लर वाली मिळाली तर मिळाली.”
कुंजुला तिचे म्हणणे पटले.
कुंजूच्या गावाला दर बुधवारचा बाजार भरत असे. पण मुली बायकांना इतके पैसे खर्च करून जायाला आवडत नसे.अब्बू चाचा खास सुंदर सुंदर बांगड्या जरी विकत असला तरी सर्वांच्या आवडत्या वस्तू ही तो आणत असल्यामुळे बायकांना समाधान वाटत असे.
मुली बायका खूपच गरज पडली तरच बाजाराला जात असे. कुंजीला नव्या पिचोडी बांगड्या हव्या होत्या. तिने मनाशी ठरवलं चाचा तर काय इतकं सांगुन ही बांगड्या आणून देत नाही. मी ही शकू सोबत दूरच्या गावाला जाईन तिथेच मलाही माझ्या पिचोडी बांगड्या मिळतील. नि सोबत मी रंगीत गुलाबी फुलांचे चाप ही घेईन.
दुसऱ्या गावी जायचे म्हणून कुंजू भल्या पहाटे लवकर उठली. फुले घेण्यासाठी ती स्टॉप वर आली. तिथे तिला एका कोपऱ्यात पाचशे रुपयाची नोट दिसली. कुंजू ने आजूबाजूला पहिलं तिथे कोणीच नव्हतं.
शेवटी तिने पाचशे रुपयांची नोट उचलून आपल्या पर्समध्ये ठेवली.
ठरल्याप्रमाणे आलेल्या पहिल्या गुरुवारी दोघी जणी ट्रेनने दुसऱ्या गावाला गेल्या. कडक ऊन होते. दोघीही घामाघुम झालेल्या.
उसाचा रस एक एक ग्लास पिऊन शकू व कुंजूं दुकानाच्या बाहेर आल्या. तेव्हा कुंजूची खास वर्ग मैत्रीण कुंजु ला दुकानाबाहेर दिसली.
दोघींनाही एकमेकींना पाहून खूप आनंद झाला .
कुंजूच्या मैत्रिणीने हट्ट धरला व ती ऐकायला तयार नव्हती . जबरदस्तीत तिने कुंजू व शकुलाआपल्या घरी येण्याचा आग्रह केला. त्यामुळे पुन्हा एकदा ट्रेन पकडून त्यांना आणखीन पुढे जावं लागलं .
कुंजू ची वर्ग मैत्रीण म्हणाली, “पाच मिनिटे तुम्ही इथे थांबा. मी आलेच लगेच दुकानात जाऊन.”
त्या दोघींना वडाच्या झाडा शेजारी उभ्या करून कुंजीची वर्ग मैत्रिण एका किराणा दुकानात शिरली .
नवीन आजूबाजूचा परिसर कुंजू व शकू पाहत होती अचानक तिचे लक्ष गेले .एका झोपडीकडे त्या झोपडीतून एक माणूस बाहेर आला . उष्टी खरकटी भांड्याचा तुटलेला अर्धवट ट्रे हाती घेऊन.
कुंजुनी अब्बू चाचाला लगेच ओळखले . शकु चा हात पकडत कुंजू त्या झोपडी जवळ गेली.
“अब्बू चाचा , अब्बू चाचा.” कुंजू नी आवाज दिला पण चाचा त्याच्याच काहीसा विचारात होता.
दोनदा आवाज दिल्यावर वर अब्बू चाचा ला कळलं कोणी तरी आवाज दिला. चाचाने बाजूला पाहिले.
“अरे कुंजू बेटा, यहा कैसे?”
कुंजू म्हणाली, “चाचा इथे राहता तुम्ही?”
अब्बू चाचा म्हणाले, “हो बेटा. या आत या. शकु व कुंजु ला चाचा ने घरात यायला सांगितले.
बसण्यासाठी एकच खुर्ची होती ती ही मोडलेली नि एक पलंग होता त्यावर एक स्त्री बसलेली.
कुंजु नी अंदाज लावला. चाचा ची बायको असेल. लगेच कुंजू म्हणाली, “ही चाची का?”
चाचा म्हणाले, “हो. तुम्ही बसा ना दोघी इथे पलंगावर.” आणि अब्बु चाचा ने चाची ला पलंगावरून उठण्यास सांगितले.
“नको नको राहू द्या .आम्ही राहतो उभ्या.” शकू म्हणाली .
चाचा म्हणाले, “नाही बेटा पहिल्यांदा आल्यात तुम्ही माझ्या घरी आणि अशा उभ्या का राहणार?” बसा मी तुमच्यासाठी थंडा आणतो.”
अब्बु चाचा दोन पाऊल पुढे गेले व पुन्हा मागे आले नि म्हणाले, “म्ही जेवणार का दोघी?”
शकु नी कुंजू सोबतच बोलल्या, “नको नको चाचा राहू द्या कशाला त्रास घेता. आम्हाला काही नको.” कुंजु नी शकू एकमेकींकडे पाहू लागल्या .
कुंजू ,शकू आणि चाचाच्या गप्पा चाललेल्या तोपर्यंत चाची एका ताटलीत दोघींसाठी चमचम मिठाई घेऊन आली व म्हणाली,” लो बच्चे खाव थोडा थोडा.”
शकू म्हणाली, “चाचीने तर ताट भरून चमचम आणले नि म्हणते खा व थोडा थोड. अरे देवा ! कधी तर खायची ही एवढी मिठाई? घ्या तुम्ही ही घ्या ना चाची.”
“नको बेटा माझी तर आता औषधाची समय झाली तुम्ही खा दोघींनी.” असं म्हणत चाची औषध चाचपडू लागली.
कुंजू म्हणाली, “चाचा हे काय? चाची असे औषधाच्या बाटल्या का चाचपडत आहे?”
“दिसत नाही तिला.” अब्बू चाचांनी सांगितल्यावर कुंजू व शकुला फार वाईट वाटले.
अब्बू चाचा चाचीला औषध देत होते तितक्यात ऊ ऊं ऊं रडायचा आवाज झोपडीच्या आत असलेल्या पडद्यामागून आला.
“शब्बी उठ गई . जाओ पहले उसे लो नही तो पुरा घर सर पे उठायेगी.”
शकुचं लक्ष बाहेर गेलं. कुंजुची मैत्रीण त्या दोघींना शोधत होती. तिने लगेचच कुंजुं ला सांगितले, “कुंजु तुझी मैत्रीण बघ शोधत आहे आपल्याला.” कुंजूं नी तिच्या वर्ग मैत्रिणीला म्हणजेच लीनाला आवाज दिला.
लीना अब्बू चाचा च्या झोपडीत आली. “अरे तुम्ही दोघी इथे आल्या का? नि मी तुम्हांला वडाच्या झाडा शेजारी पाहत होती.” असं म्हणत कुंजूची मैत्रीण झोपडीतल्या त्या पडदयामागे गेली. अब्बू चाचा कडून त्यांच्या नातनीला तिने आपल्या खांद्यावर घेतले.
“शब्बो अरे माझी शब्बो, ऐसे नहीं रोते बेटा” म्हणत तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत होती.
कुंजु व शकु ला प्रश्न पडला होता कि हे बाळ इतकं रडत आहे तरी तिची आई तिला घेत का नाहीये?
पण त्यांनी काही विचारण्याआधी तिच्या मैत्रिणीने त्यांना सांगितलं, ” ही राहिनाची मुलगी. चला या आत दाखवते तुम्हांला.”
राहिना वेड्यासारखी वागत होती. तिला तिचा नवरा सोडून गेला होता . प्रेमात लग्न करून राहिना फसली होती. नि अश्या या अवस्थेत अब्बू चाचा त्याच्या आंधळ्या बायकोला, एकुलत्या एक मुलीला व चार-पाच महिन्याच्या नातीला सांभाळण्याचा प्रयत्न एकटाच करत होता.
हे सर्व दृश्य पाहता कुंजू व शकु ला खूप वाईट वाटले.
कुंजू ची मैत्रीण म्हणाली, “मी येते इथे अधी मध्ये. माझी सासू नसली की चाची जवळ. आज चाचा काही न खाता पिताच सकाळीच घाई घाईत चाललेले तेव्हा समजलं कोणी गिऱ्हाईकाने त्यांच्या कडे हट्ट धरलाय पिचोडीच बांगड्या हव्या आहेत म्हणून .
मी ही बाजारात चाललेली म्हणून दिल्या चाचाला आणून”
चाचाच्या नातीला चाचीकडे देऊन म्हणाली, “चाचा तुमचा स्वभावाचा लोक फायदा घेतात.” नि कुंजू व उमे कडे पाहत म्हणाली, ” हे बघा” कोपऱ्यात असलेल्या बास्केटमधून खेळण्यातील पिवळ्या रंगाचे बदक काढले व म्हणाली, ” हे पहा मी स्वतः बघून आणलेली दोन डझन सर्व बदक विकून पुन्हा पाच बदक याच बास्केटमध्ये आले. कसे शक्य आहे?”
“चाचाची गिऱ्हाईक सांगतात मोडके बदक आहेत म्हणून” हातातले खेळणे ठेवत कुंजूची मैत्रिणी म्हणाली.
त्यावर केविलवाण्या सुरात लीना म्हणाली,” लोक फार वाईट आहेत नि अब्बू चाचा पण बिचारा खूपच भोळा माणूस आहे. अरे मी विसरलेच की तुला विचारायला तुम्ही कसे बरे ओळखतात अब्बू चाचा ला? येतात का तुमच्या गावाला?”
“हो येतात आमच्या गावी.” शकू म्हणाली.मग शकू व कुंजू चाचा चाचीला येतो सांगून झोपडी बाहेर आल्या.
कुंजीच मन मात्र खुपचं अस्वस्थ झालं होत.
“लिने ,शकू तूम्ही व्हा पुढे मी येतेच” कुंजू म्हणाली.
लीनाने एक फुल बागांनी सजलेल्या अंगणाकडे हात दाखवला व म्हणाली, “कुंजी ते बघ माझं घर .ये हं लगेच .”
शकू व लीना निघून गेल्या.
कुंज झोपडीत पुन्हा आली.
चाचा कुंजूच्या हातात पिचोडी बांगड्या देत म्हणाले, “लीनाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. पोरगी चिंता करते माझी.”
कुंजूचे डोळे भरून आले. याच पिचोडी बांगड्या साठी कुंजुनी अब्बु चाचाला चुकीचे समजले होते आणि आज याच बांगड्यामुळे तिला अब्बू चाचा ला ओळखताही आले .
पुढे चाचा म्हणाले, “घरी काल नवीन खेळणी आणल्यात जाशील तेव्हा खिलोन्यातील एक बदक त्या विना च्या पोरीला देऊन टाक. पोरीला जाम आशा होती बदकाची” चाचा ने हसत हसत बास्केटमधून एक बदक काढून कुंजीच्या हातात दिले .
कुंजू लगेचच म्हणाली, “चाचा नको काही देऊ तिला बदक. तुम्ही दिलेला तेव्हा चांगला होता तिच्या मुलीने मोडून पुन्हा दिले तुम्हाला.” चाचा पुन्हा हसले आणि म्हणाले, “अरे बेटा या म्हाताऱ्याचे केस पिकले. ठाऊक आहे मला राहू दे. काही हरकत नाही . दे माझ्यासाठी नेऊन त्या पोरीला.”
इतक्या मनाचा मोठेपणा कुंजूनी आजवर पाहिला नव्हता. कुंजूच्या हळव्या मनावर एकेक आश्चर्याचे धक्के बसले आणि अब्बू चाचाला पुन्हा एकदा अशा रूपात पाहून कुंजू थक्क झाली… आतापर्यंत कुंजू चाचा ला रेल्वेचा डबा म्हणून चिडवत असे.
पण आज त्या रेल्वेतून निघणारा धूर तिच्या डोळ्यांना झोंबू लागला होता..
कुंजूला माहीत होतं अब्बू चाचा फुकट मध्ये कोणाकडून एकही रुपये घेणार नाही.
कुंजुने चाचीला म्हटलं, “चाची चला निघते हा मी. पण जाण्याअगोदर तुमच्या नातीला, शब्बोला पाच मिनिटं घेऊ का मी?”
चाची म्हणाली, “हा बेटा घे ना.”
“कुंजू बेटा माझा अजून एक काम करशील का?” म्हणत अब्बू चाचा एका कोपऱ्यात लटकलेल्या झोळीकडे गेले . झोळीतून काही चिल्लर काढली काही पैसे अर्धे मोजून झोळीत पुन्हा टाकले व तीस रुपये कुंजीच्या हातावर ठेवत म्हणाले, “अमीना भाभीला सांग, चुकून राहून गेले तिचे तीस रुपये माझ्याकडे . पुढच्या हप्तापर्यंत गावाला यायला जमणार नाही. यात्रा आहे ना बेटा मग खूप धावपळ होईल.”
चाचीने कुंजु कडे शब्बोला देण्याआधी कुंजुनी पटकन आपली पर्स उघडली. त्यातून शंभर रुपयाची नोट काढली. तिचं लक्ष पटकन सकाळी मिळालेल्या पाचशेच्या नोटीवर ही गेले .तिने तीही नोट हाती घेतली.
सहाशे रुपये शब्बो च्या हातात देत म्हणाली, “बेटा शब्बो – तुला खेळण्याची काय गरज? तुझ्या आजोंबा कडे खूप छान छान खेळणी आहे तुला देण्यासाठी. हे पैसे घे मावशीने तुला खाऊ साठी दिल्यात बरं का .खाऊ खायचा मस्तपैकी.”
कुंजीला मनात शंका होती. … चाचा पैसे देऊ देणार नाहीत, ती पटकन जाण्याच्या तयारीत होती. नि नेमकं तसंच झालं .
चाचा ओरडले, “नको बेटा इतके पैसे काय करायचे लेकराला? फक्त आशीर्वाद दे माझ्या पोरीला.”
अब्बू चाचा असं म्हणताच कुंजूचे पुन्हा एकदा मन भरून आले.
चाचा आम्हा बायका ना खरंच तुम्हाला नाही समजून घेऊ शकत. तुम्ही खरंच आम्हा या बायकांपेक्षा खूप महान आहेत. तुमच्यात पाहिलेला प्रेमळ नवरा, आदर्श पिता, निस्वार्थी आजोबा मिळण्यासाठी खरंच भाग्य हवे, म्हणत कुंजू अब्बू चाचाच्या पायांना स्पर्श करत जड अंतकरणाने झोपडीतून बाहेर पडली.
समाप्त
© राशी राकेश राऊत
सदर कथा लेखिका राशी राकेश राऊत यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.
या कथाही अवश्य वाचा
वटपोर्णिमा
खरी जीवनसाथी