आशेचा कवडसा

©® प्रज्ञा पवन बो-हाडे.घराण्याला वारस हवा या आपल्या आईच्या हट्टापायी विनयला एका मागून माग चार मुली झाल्या. रमा, निशा, नेहा, स्पृहा. मुलगा होईल या आशेवर ठाम असलेली आई आजच्या काळात देखील विनय आणि मोहिनी ला वारस हवा म्हणून अट्टाहास करत होती. मोहिनी खरतर चार सिजर झाल्यनंतर अशक्त झाली होती. तिची अवस्था फक्त विनयला समजत होती. … Read more

मोरपंख मैत्रीचा

©®सौ.दिपमाला अहिरे.दारावरची बेल वाजते तशी घाईघाईने अवनी दार उघडते. कोण आले ते न बघता ती सरळ किचन मध्ये जाते. कारण तिला माहित होते कला मावशीची येण्याची ही वेळ..कला मावशी अवनीची कामवाली बाई. “काय हे मावशी आजपण उशीर? तुम्हांला माहित आहे ना, सकाळी माझी किती धावपळ असते ती, कधी एकदा तुम्ही याल आणि कधी एकदा किचन … Read more

माई

©️®️ सौ.हेमा पाटील.वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी साऊ लग्न होऊन सासरी आली, आणि त्या एकत्र कुटुंबातील सर्वांची माई बनली. अर्थात त्या काळात शिक्षणाबाबतची निकड फारशी जाणवत नसल्याने आणि मुलीला काय करायचेय शिकून..चूल आणि मूलच तर सांभाळायचे आहे असा दृष्टिकोन असल्याने मुलींच्या शिक्षणाबाबत बहुजनसमाज उदासीनच असे.स्वातंत्र्यपूर्व काळ होता तो! महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे मुलींच्या शिक्षणासाठी … Read more

उपरती

©️®️सायली जोशी.“अहो, आपल्या लेकीला इकडे आणूया म्हणते मी. किती त्रास होतोय तिला सासरी!” सुमन काकू नाराज झाल्या होत्या. यावर शरदराव काहीच बोलले नाहीत.वर्तमानपत्र उघडून वाचलेल्या बातम्या पुन्हा पुन्हा वाचत राहिले.‘आधी हे किती बोलायचे माझ्याशी! आणि मी मात्र किंमत दिली नाही यांना. आपल्याच विश्वात दंग होते.’ काकू मनातल्या मनात म्हणाल्या.“अहो, बोला ना काहीतरी. आणखी किती दिवस … Read more

जत्रा

©® मृणाल शामराज.“अरे.. अरे.. हो.. हो..अरे.. अरे.. हो.. हो..तिकडेच चाललोय ना आपण?” राधाच्या हाताला आता ओढ असाह्य झाली हॊती, शेवटी ती वैतागून राजसला म्हणाली.त्याने एक क्षण आईकडे पहिलं, तिचा अंदाज घेतला आणि तो खुदकन हसला.ते निष्पाप हसू पाहून राधा विरघळली. अजाणतेपणे ती पण सौम्य हसली.“अरे!तिकडेच जातोय ना. ते बघ पाळणे दिसतात आहेत ना तुला. पोचू … Read more

सुगंध दरवळला स्वादाचा

©®सौ. प्रतिभा परांजपे.अर्चनाने टेस्ट पेपर मधले मार्क पाहून त्याची बेरीज करत मागच्या व वरच्या पानांवर लिहून सही केली. अजून सात आठ वह्या तपासायच्या होत्या.तेवढ्यात तिला नवऱ्याची चाहूल लागली.“अहो चहा करून ठेवला आहे”  अशोक ने काही उत्तर दिले नाही. तो टॉयलेट मध्ये निघून गेला.अर्चना पटापट वह्या तपासत होती. खरंतर आज रविवार सुट्टीचा दिवस, पण तरीही ती … Read more

रितीरिवाज

©®अनुराधा पुष्कर “अहो , तो मुलगा मला आवडला होता.. घर पण चांगलं होतं आणि एकाच शहरातला तर होता” सुमन ताई.“हो ना, मुलगा होता हुशार, पण रेवा ची पसंती महत्वाची….”प्रदीप राव“तिला काय कळतंय… उगीच नाही ते कारण देते… नव्या पिढीच्या नव्या अपेक्षा नव्हे ,जास्तीच्या अपेक्षा..”आज्जी“ते काही असो मला वाटतं एकदा बोलावं पुन्हा रेवाशी.. अस किती दिवस थांबायचं….. … Read more

शालन वेगळी राहते

©®सौ.दिपमाला अहिरे.एक असे पात्र रेखाटण्याचा प्रयत्न जे प्रत्येक स्त्री मध्ये लपलेले एक व्यक्तीमत्व असु शकते.शालन तीन मुलींची आई. अजुन कदाचित दोन मुली राहिल्या असत्या तिला पण सासु सासऱ्यांनी गर्भपात करवुन घेतले. शालन च्या तिन्ही मुली शांत,सालस आणि हुशार. आईचे सर्व गुण आले होते तिघींमध्ये. पण तरीही सासुबाई ला त्या नकोशाच होत्या. तिघी मुली सारख्याच. तीन … Read more

पोशाख

©® Adv. Vinita Zade Mohalkarसकाळी जरा उशिरा उठलेली रीमा घाईघाईने तिचे कामे आवरून ऑफिसला निघण्याची तयारी करत असते. ती स्वतःसाठी आणि रोहन साठी डब्बा बनवते (रोहन म्हणजे रीमाचा नवरा). डबा बनवल्यानंतर ती तिच्या घरातील सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला सुध्दा ती विसरत नाही. हे सगळे करेपर्यंत साडेनऊ झालेले असतात आणि ती पटकन तिच्या ऑफिसची बॅग घेऊन ऑफिसला … Read more

प्रेमा तुझा रंग कसा…

©® मृणाल शामराज.‘सुखदा..आज, घरी जायच्या आधी भेटून जा मला.’‘हो, येतें.’आज काय बरं काम असेल मॅडमच ? नेमकं आजचं घरी जायची घाई आहे.आईंचा डॉक्टरकडे फॉलोअप आहे. समीरला वेळ नाही आहे. मिटिंग आहे त्याची. स्वराची प्रिलीम जवळ आली आहे. तिचा अभ्यास कसा चाललाय बघायला हवं. ही मुलगी पण अशी, ट्युशन आवडत नाही. सगळा सेल्फीस्टडी करायचा. आहे हुशार पण … Read more

error: Content is protected !!