मृगजळ भाग -1

This entry is part 1 of 3 in the series मृगजळ

© परवीन कौसर
सूर्य बऱ्यापैकी वर आला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तो जास्तच प्रखर तेजाने तळपत होता. तो खरंच तळपत होता की आग ओकत होता हेच कळत नव्हते.
अशा उन्हात ती शहरातील मोठ्या पंचतारांकित हॉटेलमधुन आपल्या चुरगळलेल्या विस्कळीत कपड्यात गडबडीने एकाच पायात सॅंडल घालून दुसऱ्या पायात घालत बसण्यात वेळ न दवडता तशीच रुमच्या बाहेर पळत सुटली.
ज्या मुलायम घनदाट केसांची निगा राखायची रोज वेगवेगळ्या प्रकारची हेअरस्टाईल करायची आज तेच केस भल्या मोठ्या वेताच्या टोकरीसारखे भुरभुरलेले होते. त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती सुसाट वेगाने पळत पळत हाॅटेलच्या बाहेर आली.

समोर एक टॅक्सी उभी होती. टॅक्सी समोर जाऊन,” भैय्या घर तक छोड दो. पैसा नहीं है . ये सोने की चैन ले लो. मगर जल्दी इस पतेपर छोड दो मुझे.” असे म्हणत गळ्यात असलेली सोनसाखळी कटकन ओढून तोडून ड्रायव्हरला दिली आणि आपल्या घरचा पत्ता सांगितला.
ड्रायव्हरने तिला अगदी वरून खाली दोन वेळा निहारले जसे कोणीतरी स्क्यनिंग मशीन फिरवतो न तसेच. तिच्या अंगावर महागातला ड्रेस होता. तिच्या एकाच पायात सॅंडल ते पण उंची महागातलेच. तिच्या ड्रेसची ओढणी थोडी पातळ होती त्यामुळे तिच्या ड्रेसवर असलेली डिझाईन दिसत होती.

तिच्या मानेवर कसलेतरी निशाण दिसत होते बहुतेक नखांनी ओरबडलेले असावे. तिच्या ड्रेसचं वरचं बटण तुटलेलं होतं त्यामुळे तिच्या ड्रेस मधून तिचे शरीर थोडे दिसत होते. एकदम त्याचे लक्ष तिच्या छातीवर गेले आणि तो स्तब्ध होऊन तिथेच बघू लागला. तिच्या दोन्ही छातीवर ओलसरपणा दिसत होता इतकेच नव्हे तर काहीसा द्रव्य निघून पुन्हा तिथून टपकत आहे असे जाणवू लागले.
त्याचे असे बघणे तिला जरा अस्वस्थ करत होते पण तरी देखील,” भैय्या …! चलो न जल्दी प्लिज भैय्या…!” अशी ती गयावया करु लागली. तिच्या आवाजाने एकदम तो भानावर आला आणि त्याने पटकन तिची सोनसाखळी तिच्या हातावर ठेवली.
” क्या हुआ भैय्या ? ये सच में सोने की चैन हैं. झूठ नहीं बोल रही मै. थांबा याचे बील दाखवते. कालच घेतली होती तिथे त्या मोठ्या शो रुम मध्ये. ” असे म्हणत ती आपला हात आपल्या खांद्यावर असलेल्या पर्स जवळ नेला तशी ती रडकुंडीला आली. माझी पर्स पण…..!
” अरे नहीं नहीं बहना. मला चैन नको. चलो मै छोड देता हूं. ” असे म्हणत त्याने टॅक्सीचे दार उघडले.
पटकन ती आत जाऊन बसली.

” जरा फास्ट न्या भैय्या. तिकडे घरी माझी….! ” असे म्हणत ती ओक्साबोक्शी रडू लागली.
गाडी हवेच्या वेगाने पळत होती.
” हा इधर से थोडा आगे.” असे म्हणत तिने समोर असलेल्या वळणावरून आत न्यायला सांगितले.
” हो बास बास. आले घर माझे.” असे म्हणत तिने गाडी थांबवली.
ड्रायव्हरने तिला दार उघडून दिले. ती गाडीतून उतरता उतरताच थ्यंक्यू भैय्या थ्यंक्यू भैय्या म्हणत पळत सुटली.

ड्रायव्हरने समोर बघितले तर एक टुमदार घर होते. घर कसले बंगलाच म्हणावा. रंगरंगोटी एकदम सुरेख, समोर मोठे गेट , आजूबाजूला झाडे लावलेली. इतक्या मोठ्या घरात राहणारी ही काय झाले असेल हिचे ? या विचारात त्याने आपली टॅक्सी सुरु केली आणि तो निघून गेला.
हिने दारावरची बेल वाजवली त्याचबरोबर दारावर जोरजोरात थाप देऊ लागली.
” हो हो येतोय. जरा धीर धर. इतका काय उतावीळ पणा तो.” असे म्हणत एका तरुणाने दरवाजा उघडला.

तशी ती झर्रकन आत पळाली. आत जाऊन आपल्या खोलीत गेली तशीच ती पुन्हा बाहेर आली आणि त्या तरुणांकडे एकदम त्वेषाने बघत ,” कुठे आहे माझी छकुली?” असे विचारले.
” अगं बाई किती हा राग..! शोभत नाही हो एवढ्या सुंदर मुलीला.”
” काही पण बरळू नकोस. माझी छकुली कुठे हे सांग…!”
आता तिचा आवाज आणखीन वाढला.

” अगं ती झोपली आहे गाढ. पोट भर दुध प्याली आणि झोपली. मी वर होतो तिला घेऊन. ती झोपली अन् तू आलीस. बरं ते जाऊ दे. आर यू ओके न बेबी. एन्जॉय न. आणि हे काय असा अवतार धारण केला आहेस. छ्छे…! जा आधी शॉवर घे. फ्रेश हो. मग जेवण करु आपण दोघे मिळून. गो बेबी फास्ट फास्ट .” असे म्हणत त्याने तिच्या गालावर हात फिरवला तसा तिने त्याचा हात जोराने हिसडा देऊन झटकून दिला आणि ती जोराने पळत पळत वरच्या मजल्यावर गेली.
खोलीचे दार बंद होते. तिने ते उघडून आत खोलीत गेली. तिथे पलंगावर एका महिन्याची गोड गोजिरवाणी पोरं निरागसपणे झोपलेली होती. तिला तिने पटकन उचलून घेतले आणि आपल्या छातीशी घट्ट पकडले.

तिच्या ड़ोळ्यातूंन असंख्य अश्रू वाहू लागले तिचे अश्रू बाळाच्या अंगावर पडताच ती जागी झाली आणि रडू लागली. तिला तसेच आपल्या मांडीवर घेऊन तिने आपले दूध पाजू लागली. ज्या दुधासाठी रात्रभर आपली लेक तळमळत होती त्याच दुधाचे कारंजे उडवत त्या नराधमांनी आंघोळ केली होती हे आठवून ती रडत होती. रात्रभर भुकेलेली पोरं गटगट करत दूध ओढून पीत होती. तिच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवत स्वतः ला तिची दोषी मानून मनोमनी तिची माफी मागत ती रडत होती. रडता रडता तिला सारे आठवू लागले.

सौंदर्यांची खाण असलेली सुंदरता जिच्या पायी लोटांगण घालत होती अशी ही नावाप्रमाणेच सुंदर असलेली सौंदर्या. तिला तिच्या जन्मावेळी तिचे सुंदर रुप बघून तिच्या आजोबांनी नाव दिले होते . सौंदर्यां. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सौंदर्याच्या घरी तिचे आईवडील, आजी आजोबा आणि तिचे दोन भाऊ . दोन मुलांच्या पाठीवर मुलगी झाली निश्चितच सर्वांची लाडकी झाली. त्यात अधिक भर देते तिचे सुंदर दिसणे. आजी तर रोज रात्री तिची दृष्ट काढत होती. तिला जरा देखील कोणी दुखवत नव्हते. वडिलांच्या तर मनावर ती राज्य करत होती.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरातील नामवंत मुलींच्या काॅलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला. कॉलेजच्या पहिल्या वर्षात तिने चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवले. आता बारावीचे वर्ष.तिला काॅलेजबरोबर दुसरीकडे शिकवणी वर्ग लावले . प्रायव्हेट क्लास असलेमुळे तिथे मुले मुली एकत्र क्लासला यायचे. यामध्ये मनापासून शिकणारी मुलांबरोबर काही टाईमपास म्हणून येणारी पण मुलेमुली होतीच.

याच मुलांमध्ये होता तो सिद्धार्थ.दिसण्यात अगदीच देखणा राजबिंडा तरुण. रुबाबदार गोरा वर्ण कपडे अगदी उंची महागातले ‌. महागडी बाइक घेऊन तो क्लासला यायचा. त्याला त्याचे मित्र सिद्ध असे म्हणत.त्याच्या राहणीमानामुळे तो मोठ्या पैसेवाल्या बापाचा मुलगा आहे हे लगेचच ओळखले जायचे.काही मुले त्याच्या मागे मागे फिरत असायची.मुली पण त्याला बघताच घायाळ व्हायच्या.
त्याचे लक्ष जरा देखील अभ्यासाकडे नव्हते. बारावीमध्ये दोन वेळा नापास झालेला मुलगा. त्याच्या वडिलांनी त्याला या वर्षी पास झाला तरच तुला घरात ठेवेन नाही तर घराबाहेर काढणार कायमचाच अशी धमकी दिली होती.

पण तरीदेखील याचे अभ्यासाकडे दुर्लक्षच होते.आईकडून खोटे बोलून पैसे आणून हॉटेलमध्ये जाऊन खाणे सिनेमा बघणे कधी कधी बारमध्ये पण जाऊन पैसे उधळणे अशी कामे करत होता.
क्लासमध्ये जेव्हा त्याने सौंदर्याला पाहिले तेव्हा तो तिला एखसारखा बघतच बसला. ‘ काय स्लाॅलिड आहे ही. इतकी सुंदर मुलगी अजून पर्यंत मी पाहिलेली नाही कधीच. मेरे लिये बनी है ये तो. काहीही करून हिला पटवायलाच पाहिजे.’ असे मनात म्हणत होता
क्रमशः
© परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Series Navigationमृगजळ भाग 2 >>

Leave a Comment

error: Content is protected !!