पूर्ण झाली अधुरी कहाणी

© अनुजा धारिया शेठ
इतना कूछ मिला है की क्या मैं बोलू
तुझे पाकर इतनी खुशी हुई की इसे मैं कैसे तोलू
तुझे पाया तो मीली मुझे मेरी जिंदगी..
तुम्हे पाकर पुरी हुइ मेरी ये अधुरी जिंदगी…
तेरी हो गई मैं इतनी सयानी
के अब तुम्हारे बीन कैसे होगी पुरी हमारी ये कहानी..

रोहित एक चांगला मुलगा त्यानें इंजिनीरिंग केले आणि एका मोठ्या कंपनीमध्ये कामाला होता. घरी सर्व चांगले होतें, पण लग्नाच वय झाले तरी मुलगी मिळत नव्हती. त्याच्या घरी त्याचे बाबा आणि तो असे दोघेच रहात होते.
अगदी छान चालू होतें सर्व.. त्याने कळायला लागल्या पासून आईला कधी बघितले नव्हते आणि त्याचे बाबा एवढे करायचे त्याच्यासाठी कि त्याला कधी आठवण झालीच नाही आईची.
त्याच्या मनात खूप प्रश्न होते पण विषय काढला की बाबा गप्प व्हायचे म्हणून त्याने हळू हळू प्रश्न विचारणे बंद केले.

काही दिवसांनी ऑफिसमध्ये काम करत असलेल्या संदीपची बहीण सारीका आवडू लागली होती. रोहित संदीपच्या घरी अधून मधून जात असे, दोघांची नजरानजर होत होती पण पुढाकार कोणी घेतं नव्हते शेवटी त्याने सारीकाला विचारले आणि तिने होकार दिल्यावर बाबांना सांगून मागणी घालायला त्यांच्या घरी जायचं ठरवले.
बाबांना त्यांनी सारिकाचा फोटो दाखवला आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. बाबांनी लगेच तिला मागणी घालू असे आनंदाने बोलून दाखवले.. रोहितला खूप आनंद झाला. येत्या रविवारी जायचं ठरलं.. दोघे खूप खूष होते.

त्यांच्या घरी आल्यावर तीची आई खूप विचित्र वागली, जणू तीची आणि बाबांची जूनी ओळख असावी, कारण तिने बाबांना बघितल्यावर स्पष्टपणे तोंडावर नकार दिला अन् हा तुमचा मुलगा हेच कारण अस म्हणाली.
रोहितला काही कळेना झाले, त्याला राग आला होता. पण तो तिथे गप्प बसला, घरी आल्यावर माञ त्यानें प्रश्नांचा भडीमार सुरु केला. तो म्हणाला, “बाबा, आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. संदीपची आई तुमच्याशी अशी का वागली??? काय लपवत आहात??? कोण आहे माझी आई आणि मी कोण आहे??? माझ्या आईचा एक पण फोटो नाही इथे असे का??? ती का सोडून गेली??आज सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत मला??? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे.”

“सांगतो सर्व सांगतो बाबा म्हणतात ऐक, सगळे सांगतो आता.
संदीपची आई म्हणजे कसे सांगूं मी… त्यांची माफी मागेनच.”
“बाबा आता प्लीज सांगा लवकर” रोहित म्हणाला
“माझे प्रेम होते सुमन नावाच्या एका मुलीवर तिची बहिण म्हणजे संदीपची आई.
आमच्या दोघांचे खूप प्रेम होते, आम्ही लग्न करणार होतो. पण त्या आधी मला नोकरी नव्हती अन् त्या शोधात मी फिरत होतो.

तीच्या ताईला म्हणजे संदीपच्या आईला माहीती होते आमच्याबद्दल सर्व. काही दिवसात मला नोकरी लागली पण नोकरी आरोग्य खात्यामधील असल्यामुळे सर्व टेस्ट करून मग फायनल होणाऱ होती अन त्या टेस्ट करताना रिपोर्ट आला की मी कधीच बाप होऊ शकत नाही.
मला सुमनला फसवायचं नव्हते पण मी तिला कसे सांगूं मला कळंत नव्हते शेवटी मी तिला भेटायला बोलवले आणि सर्व खर सांगून टाकले. तिला म्हणालो की तूझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. ती निघून गेली ती परत मला अजूनही भेटली नाही मला, मी ही तिला त्रास नको म्हणून परत कधी संपर्क केला नाही.

रोहितचा चेहरा परत लाल झाला “आणि मी कोण आहे मग???”
“सांगतो अरे ऐकून घे माझे..  तुझी आई म्हणजे माझी बहिण. तुझ्या आई बाबांचा अपघात झाला अन् तुझे बाबा त्यामध्ये गेले,आई कोमात गेली तुमच्या घरच्या सर्वानी दुर्लक्ष केले.
मग तिचं माहेर म्हणुन आम्हीं ती जबाबदारी घेतली. पण गावी राहणं शक्य नव्हते म्हणून कंपनीच्या कॉलनीत आम्हीं राहायला गेलो.. त्या आधी मी बाहेर मित्रांसोबत रूम शेअर करायचो.. पण आई आणि कोमात गेलेली ताई या सोबत तु बाळ होतास त्यामूळे कंपनीच्या कॉलनीत राहणे पसंत केले.

तुझ्या आजीला माझे लग्न करायचे होते पण मी प्रत्येक मुलीला तेच सांगितलं जे खर होतें. आणि मग् माझे लग्न जमेना झाले लोकं काही बाही बोलू लागले म्हणून आम्ही तें घर विकून इकडे लांब राहायला आलो.
तू खूप लहान होतास तुला कळायला लागले आणि मला बाबा म्हणून हाक मारलीस तू. म्हणुन मी आणि तुझ्या आजीने लपवून ठेवले, दत्तक पत्र करून घेतले आणि एका वर्षात तुझी आई गेली.
तू मोठा होत गेलास आणि मी तुझ्यात गुंतून गेलो. आजी पण गेली तेव्हां तु थोडा मोठा झाला होतास आणि मग हा संसार मी पुढे नेला.. एकट्यानं.. एका चाकावरचा संसार हा सगळा.


ह्या सर्व प्रकारामुळे संदीपच्या आईचा गैरसमज झाला असेल . त्यांना वाटत असेल मी फसवलं पण तसे नाही आहे रे”
रोहित रडू लागला, “बाबा मला माफ करा. हे लग्न नाही झाले तरी चालेलं पण तुम्ही मला हवे आहात.”
संदीपच्या घरी जाऊन त्यांनी सर्व सांगितले आणि माफी मागितली. सुमन पण आपल्या बहिणीकडे आल्यामुळे तिथेच होती तिनेही लग्न केले नव्हते.
तेंव्हा हे सर्व ऐकल्यावर सुमनने तिच्या बाजूने उलगडा केला.. की तिला सर्व सांगितल्यानंतर दोन वर्षाने ती त्यांच्या घरी गेली पण, तिला समजले की त्यांनी बाळ लहान असल्यामुळे घर बदलून दुसरीकडे राहायला गेले.

त्याच्या कंपनीमधल्या कॉलनीमध्ये देखील त्याच्या बहिणीला सर्व त्याची बायको समजले म्हणून हा गोंधळ झाला होता आणि सुमनला सुध्दा तिथल्या लोकांनी हेच सांगितले, त्यात हे पण सांगितलं की त्याची बायको गेली आणि मुलाला घेऊन तें दुसरीकडे गेले. आता सर्व खरी गोष्ट समजली आणि शेवट गोड झाला.

रोहितने सुमन आणि बाबांची भेट घडवून आणली.. एव्हढ्या वर्षानी भेटल्यावर काय बोलायचं काहिच कळत नव्हते पण सुमन माञ बर्याच वर्षानी हळूच शायरी पुटपुटली..
इतना कूछ मिला है की क्या मैं बोलू
तुझे पाकर इतनी खुशी हुई की इसे मैं कैसे तोलू
तुझे पाया तो मीली मुझे मेरी जिंदगी..
तुम्हे पाकर पुरी हुइ मेरी ये अधुरी जिंदगी…
तेरी हो गई मैं इतनी सयानी
के अब तुम्हारे बीन कैसे होगी पुरी हमारी ये कहानी..

तीची ही जुनी सवय होती, शायरी तिला खूप आवडायची सर्वांनीच ते ऐकलं आणि इर्शाद करत तिला दाद दिली.. लाजेने ती चुर झाली अगदी.
आता  लवकरच दोन लग्न होणाऱ ह… असे म्हणत संदीपने मावशीला आणि सारीकाला चिडवायला सुरूवात केली.. जवळचा मुहूर्त काढून दोन्ही लग्न अगदीं छान पार पडली. एवढे वर्ष एकट्याने ओढत नेलेला संसार खर्या अर्थाने पूर्ण झाला.
************
समाप्त
© अनुजा धारिया शेठ
सदर कथा लेखिका अनुजा धारिया शेठ यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!