अस्तित्व

©अनुराधा पुष्कर
“पूजा ,ए पूजा तुझं आजच प्रेसेंटेशन छान होत ….तसही तू नेहमीच छान काम करतेस म्हणा ..”-नेहा “हो मग काय तर सगळा डेटा पूर्ण पणे गोळा करून मगच ती प्रेसेंट करते ..”-रवी “कोणी किती प्रश्न विचारले तरी तिच्याकडे नक्कीच उत्तर असत ..”-कोमल.
“अरे ,बस बस .आज काय हरभऱ्याच्या झाडावर चढवायचा विचार आहे का ?’-पूजा
“नाही हा असं काही नाहीये ..आम्ही खर तेच सांगतोय..”-कोमल .

“बर बर पण हे काही माझ्या एकटीच काम नाहीये ..तुम्ही सगळे मदत करत असता म्हणून ते शक्य होत ..बरा चला आटोप लवकर अर्ध्याच तासात ऑफिस सुटायची वेळ होईल ..त्याआधी आपल्याला हे करायला हवं ..”-पूजा .
सगळे मग आप आपल्या कामाला लागतात.
तर अशी हि पूजा..
एका मार्केटिंग कंपनीत नोकरीला होती ….पूजा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील होती ..आई वडिलांची, भावाची लाडकी …खूप अभ्यास करून ,मार्क्स मिळवून व्यवस्थापन क्षेत्रात डिग्री घेतली आणि मग स्वबळावर नोकरीला लागली ..

साधी  ,सिम्पल पण स्मार्ट मुलगी पूजा …पूजा ला विशाल च स्थळ सांगून आलं होत ..दिसायला सुंदर ,समजदार आणि उच्च शिक्षित अश्या विशाल च्या सगळ्या अपेक्षा पूजाच्या रूपाने पूर्ण झाल्या होत्या ..एक दोन भेटी गाठी नंतर त्या दोघांनी लग्नचा निर्णय घेतला होता.
विशाल एक इंजिनिअर होता …आई वडिलांचा एकलुता एक आणि विशेष म्हणजे आईचा  आणि आज्जीचा लाडका ….विशालचे बाबा सुद्धा एका खाजगी कंपनीत नोकरीला होते …तस मध्यम वर्गीय कुटुंब ते ..पूजा विशालशी लग्न करून त्याच्या घरात आली आणि विशाल च कुटूंब वाढू लागलं.

तसं म्हणायला पूजा साठी सासर माहेर एकाच शहरात होत …..पण जायला यायला जमत नसे जास्त …… लग्न नंतर दोघे फिरून आले ..पूजा ने नोकरी सोडली होती ..म्हणजे वर्षभरासाठी ब्रेक घेतला होता.
पहिल्या वर्षातले सगळे सण वार , कोड कौतुक सुरु होत ,नव्या नवरीचे दिवस फुलपाखरासारखे उडत होते …पूजा खूप खुश होती ..हळू हळू विशालच्या घरच्या चालीरीती ,आवडी निवडी जपत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होती.
लग्नाआधी स्वयंपाक घरात थोडीशी मदत करणारी पूजा आत सगळं स्वयंपाक घर एकटीने सांभाळू शकत होती ….सासूबाई जायच्या त्यांच्या भिशीच्या ग्रुप मध्ये ,सासरे त्याच्या मित्रांमध्ये ,,विशाल ऑफिस मध्ये …तर घरी आजीसासू आणि पूजा.

सगळ्यांना काय हवं ,नको  ते बघणं ,वेळच्या वेळेवर सर्व काही व्यवस्थित पार पडणं ह्याची जणू तिला सवय झाली होती …. दिड  वर्षानंतर तिने पुन्हा नोकरीचा विषय काढला …..
“विशाल मी काय म्हणते ?”-पूजा आरश्यासमोर बसून हाताला क्रीम लावत विशाल शी बोलत होती …विशाल फोन बघत होता .
“हा बोल ना ..”-विशाल  तो अजूनही फोन बघत होता …
“मी पुन्हा नोकरीचा विचार करतेय..”-पूजा म्हणाली पण विशालचं काही लक्षच नव्हतं तिच्या बोलण्याकडे.

पूजा ने  नकारर्थी मान हलवली आणि गप्प बसली ..जवळ जवळ दहा मिनिटांनंतर विशालच्या लक्षात आलं कि पूजा पुढे काही बोललीच नाही ते ..त्याने फोन मधून डोकं बाहेर काढलं ….तेव्हा पूजा केस विंचरत होती ..
“आयेहाये  ,काय तो नखरा ….अश्या मोकळ्या  केसांमध्ये किती छान दिसते ग तू ?”-विशाल
“हो का , आता लक्ष गेलं का तुझं ?- पूजा थोडासा हलकेच दटावत …केस बांधून  त्याच्या बाजूला बेड वर येऊन बसली ….”म्हणजे काय ?आमचं लक्ष तुमच्याशिवाय इकडे तिकडे कुठे हि जात नाही ..आम्ही फक्त तुम्हाला बघत असतो …”-विशाल  तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला.

“ओ हो ..खरं कि काय ? आत्ताच  तर ह्या फोन मध्ये  डोकं घालून बसला होतास ….माझा आवाज तरी गेला ह्या कानापर्यंत ..”-त्याचा कान पकडून पूजा त्याला  हलकेच दटावत होती ..तेवढ्यात विशाल ने एक हात  तिच्या गळ्याभोवती नेला आणि तिला खाली खेचलं … त्याचे श्वास तिला जाणवत होते ..तो एकटक तिच्या  डोळ्यात बघत होता.
“विशाल ..”-पूजा
तिच्या तोंडावर बोट ठेवत “हि बोलण्याची वेळ नाहीये …”-विशाल ने हलकेच  तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि मग खिडकीतून  येणाऱ्या मंद हवेच्या झोतात ते एकमेकांच्या बाहुपाशात एकरूप झाले.

सकाळी अलार्म वाजला तस पूजा लगबगीने उठली .. विशालच्या गळयावर तिची टिकली पाहून रात्री च्या आठवणीने पुन्हा लाजली आणि मग हलकेच त्याच्या गालावर किस करून उठून काम आवरायला निघून गेली.
सगळं काही रोजच्या रुटीन प्रमाणे सुरु होत. आज सासर्यांना त्यांच्या जुन्या एका मित्रा कडे जायचं होत त्यामुळे ते  नाश्ता करून निघणार होते आणि संध्यकाळीच येणार होते  .. सासू बाई आणि आज्जी सासू घरीच असायच्या.सासूबाई जात असत कुठे कुठे पण रोज नाही   सगळं आवरून विशाल हि निघाला आणि मग  तिने ,सासूने आणि आज्जी सासूने नाश्ता केला.

“आज्जी काही देऊ  का तुम्हाला ?”-पूजा  ने सहज  विचारले.
“बाळकृष्ण येऊ दे ..घरी …लवकर ..”-आज्जी
“काय ?”-दचकून पूजा ने विचारले ..सासूबाई पण बघतच होत्या
“मग काय तर , झालं कि दीड वर्ष लग्नाला .. तयारीला लागा म्हणजे सगळं सुरळीत होईल आता. घरी दुडू दुडू धावणारा कृष्ण आलं न कि बघ घर कस भरून जाईल ..आणि तुझाही वेळ जाईल त्यात ..”-आज्जी हसून समजावत होत्या.

“नाही म्हणजे असं काही नाही आजी ..घरात  इतकी कामे असतात त्यात वेळ निघून जातो …आणि वेळ जाण्यासाठी अजून बराच काही करता येण्यासारखं आहे ,..”-पूजा
“म्हणजे ,तुम्हाला मूल नकोय का ?”-आता सासूबाई रिंगणात उतरल्या होत्या.
“नाही आई तस काही नाही ..पण आम्ही अजून विचार केला नाही ..मी तर  आता नोकरी वर पुन्हा जायचं म्हणत होते …”-पूजा
“ते राहू दे ग ……..नोकरी काय कधीही करू शकशील ?”-सासू बाई

“हो एकदा का वय निघून गेलं कि मुलं होण्यात अडचण निर्माण होते …बाईचं वय आणि प्रकृती नेहमी एकसारखी नसते ….”-आज्जी
दोघी हि पूजा ला समजावत होत्या ….. प्रेमाने दटावत होत्या …..दुपारी बेड वर पडल्या पडल्या पूजा च्या डोक्यात सकाळचा च विषय होता.
संध्याकाळी विशाल घरी आला….. रात्री तिने आज्जी आणि सासूबाईं नी बाळचा विषय काढला होता ते सांगितलं
“तुला काय वाटतं?” विशाल
“हे बघ मला कळत नाहिये नक्की. म्हणजे मी आता नोकरीचा विचार करत होते….पण त्या म्हणतात तस पुढे जाऊन आई होताना अडचण यायला नको.. काय करावं काही कळत नाही..”पूजा
“ह्मम अस आहे तर…मग मी काय म्हणतो विचार नकोच कृती च करू न..”विशाल एक डोळा मारत तीला जवळ घेतो.

“विशाल तुझ आपल काहीतरीच…. प्रश्न काय आणि तु बोलतो काय.”पूजा नजर चोरत हलकेच हसत म्हणाली
त्यांच्या हो नाही च्या मस्ती मध्ये रात्र कधी सरली ते कळलच नाही.
असच एक महिना होउन गेला… आणि पूजा चि पाळी चुकली…..तिला अचानक च हुरहूर लागली…. सगळे विचार करत होते तस् पूजा आई होणार होती…तिला तर खुपचं आनंद झाला.
सगळं कसं छान सुरु होत ..दिवस भरले आणि तिला मुलगा झाला… हर्ष त्याचं नाव ठेवण्यात आल..
पूजा आता हर्षच्या बाळ लीलांमध्ये व्यस्त होती, त्याच्यासोबत घराची पूर्ण जबाबदारी होतीच…

हर्ष आता ५वर्षांचा झाला होता.. पूजा सगळं करत होती पण आता तिची चिडचिड सुरु झाली होती…. बऱ्याच गोष्टी वर ती चीडत असे.
शेवटी ती विशाल शी बोललीच
“विशाल,  मला नोकरी करायची आहे. “पूजा
“काय  नोकरी? आता हे आणि कशासाठी… तुला कंटाळा आलाय तर दुसरं काही कर आणि तसही हर्षला सांभाळून हे सगळं जमणार आहे का तुला?”विशाल
“का नाही जमणार? विशाल ,हर्ष मोठा झाला आहे. शाळेतही जातो आणि तुम्ही साथ दिली तर सगळं शक्य आहे”पूजा

“म्हणजे आम्ही साथ देत नाही का?.. काय म्हणायचं काय तुला?.”विशाल
“हे बघ गैर समज करून घेऊ नकोस…..मी फक्त एवढंच म्हणते आहे की सगळे मिळून घराची जबाब दारी घेऊ, हर्ष ला बघू… म्हणजे मला ही थोडा वेळ मिळेल…. माझं ही करियर आहेच न…..”पूजा…..
“हे बघ पूजा हर्ष ला गरज आहे तुझी आणि तु बाहेर गेलीस तर आज्जी च ,आईच आणि घराचं कोण बघणार….?”- विशाल….
“ते सगळं मी करतेच आहे पण सगळ्यांनी थोडफार केलं तर सोप्पं होईल आणि घर सगळ्यांचं आहे. आपलं आहे…”पूजा

“हे बघ मला काही पटत नाही हे तरीपण तू जर सगळं सांभाळून करु शकत असशील तर कर…”विशाल…
काही काही महिने असंच चालू होतं.. नंतर  सहा महिन्यांनी पूजाला नोकरी लागली आणि ती घरातले सगळे आवरून हर्ष ला शाळेला पाठवून नोकरीवर जाऊ लागली…
तिच्या नोकरी करण्याने घरी थोड्या कुरबुरी वाढल्या आजी सासूबाईंचा मत होतं की, नोकरीचे काय गरज?
पण निर्णय पूजाचा होता आणि ती सगळं काही हसत हसत करत होती…. एक दिवस पूजा ची तब्येत खराब झाली आणि सगळे तिला बोलू लागले,

“काय गरज आहे एवढी मरमर करण्याची… विशाल  कमवतोय ना….”सासूबई
“नाहीतर काय, डोक्यात खुळ घ्यायचं काहीतरी….. एवढं सगळं केल्यावर तब्बेत खराब होणारच.”आज्जी
“पूजा, तब्बेतीची काळजी घेत जा….”सासरे…
“पूजा काय मिळत तुला हे सगळं करून… हर्ष कडे बघ कसा झालाय तो…..”विशाल.
“विशाल कमीत कमी तू तरी नको मला बोलू… अरे माझं काम ,माझं घर, माझी नाती हेच माझे विश्व आहे आणि मी माझ्या विश्वात आनंदी आहे आता होते थोडी दग दग पण याचा अर्थ असा नाही ना की मी सगळी कडे दुर्लक्ष केलं.

हर्ष शाळेत जातो त्याला वेळच्यावेळी डब्बा देते तुझ्या ऑफिस च कामात ही मी कधी अडथळा येऊ देत नाही… घरी सगळ्यांचं करून मी जाते….. त्यामुळे कोणतही काम थांबलं नाही….
मी नोकरी का करु नये तर घराकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून तर घरकडे दुर्लक्ष होतच नाही तुलाही माहित आहे सगळ्यांनी थोडीफार मदत केली तर ही दगदग सुद्धा होणार नाही… बघ विचार करून.
माझ्या कामातून मला प्रेरणा मिळते आणि घरी आल्यावर मी आनंदी असते..,”पुजा..

वाचकहो बऱ्याच घरांमध्ये मुल झाल्यानंतर सुनेला नोकरी करण्याची परवानगी नसते कारण काय तर मुलाचे कोण बघणार आणि घर कोण सांभाळणार हा प्रश्न असतो आणि तिने नोकरी केली तरी सगळं तिलाच बघावं लागतेपण जर एखाद्या मुलीला आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तिला खूप संघर्ष करावा लागतो . एका बाई साठी तिचं काम, तिचं घर हेच तिचं विश्‍व असतं आणि ती त्या विश्‍वात आनंदी असते.. तिला मागे खेचण्यापेक्षा तिला सहकार्य केले तर जास्त चांगले …. नाही का?
******
समाप्त
©अनुराधा पुष्कर
सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.



Leave a Comment

error: Content is protected !!