रेशीम बंध (भाग 1)

This entry is part 1 of 2 in the series रेशीम बंध

© परवीन कौसर
रोज  प्रमाणे रुही सकाळी लवकर आंघोळ करून ओले केस टाॅवेल मध्ये लपेटून ड्रेसींग टेबल समोर येऊन उभारली.आणि हळूच आपल्या ओल्या केसांना बांधलेला टाॅवेल काढला आणि आपले ओले लांब सडक केस मोकळे सोडले आणि त्यांचा गुंता हळूवार सोडू लागली तोच मागुन तिच्या मानेवर हळूच एक गरम श्वासात ओठ टेकवत तिला आपल्या बाहू पाशात ओढत महेश म्हणाला ” गुड मॉर्निंग माय स्वीट बायको ” आणि एकदम रुही लाजेने चूर चूर होऊन आपल्या हातात चेहरा लपवून उभारली.
“अरे लाजतेस का मी नवरा आहे तुझा.बघ न किती सुंदर दिसतेस.तुझ्या चेहऱ्यावर माझ्या प्रेमाचे रंग ओसंडून वाहत आहेत.” म्हणत महेशने तिला आपल्या घट्ट बाहुपाशात कैद केले.

ती देखील लटकेच लाजत ” सोडा न कोणी तरी बघेल.आई उठल्या असतील.पुजा करण्यासाठी तयारी करत असतील येतील त्या. सोडा न प्लिज ,अहो ,अहो असे काय करता सोडा न, बघा ताई पण उठल्या.आता वहिनी म्हणून हाक येईल त्यांची. सोडा ना……..
…….सोडा ………..
” ये रुही काय झाले .असे काय बोलत आहेस.कोणाला म्हणते सोडा सोडा” आईच्या आवाजाने रुही एकदम भानावर आली.आणि आपल्या आईच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडू लागली.

रमेश आणि सीमा या दांपत्याला दोन मुली आणि एक मुलगा असे कुटुंब.रमेश सरकारी नोकरी करत होते.सीमा गृहिणी होती.कांचन,रुही आणि दिलीप असे हे तीन भावंडे.
कांचन बी.ए.पूर्ण करुन एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होती.रुही अभ्यासात हुशार होती तिला इंजिनिअर व्हायचे होते.तिला तिच्या चांगल्या मार्कांनी शहरातील नावाजलेल्या काॅलेजमध्ये प्रवेश मिळाला होता.दिलीप पण मेडिकल कॉलेज मध्ये होता.एकंदरीत हे सुखी कुटुंब होते.

आता कांचन साठी स्थळं येत होती.आणि बघता बघता एक चांगले स्थळ आले आणि कांचनचे लग्न फिक्स झाले.
रुहीच्या परीक्षा झाल्यावर लग्न करायचे असे रमेश नी सांगितले पण नवरा मुलगा परदेशात असलेमुळे सुट्टी मिळणे कठीण.म्हणून लगेच लग्न करून तो परत कांचन ला घेऊन परदेशात जाणार होता. म्हणून लगेचच लग्न करून द्यावे असे नवरा मुलाच्या वडिलांनी सांगितले.

रुहीचे काॅलेजचे शेवटचे वर्ष . अभ्यासाचा ताण आणि घरात मोठ्या बहीणी चे लग्न कार्य. सगळे एका वेळीच जुळून आलेले.घरात पाहुण्यांची वर्दळ.रुहीचे सबमिशन.काही केल्या गणित जमेना. शेवटी रुही ने आपल्या मैत्रिणींच्या घरी जाऊन अभ्यास पुर्ण करायचा ठरवले.
आज कांचनचे लग्न.रुही जरा नर्व्हस होती.तिला हवे तसे बहीणिच्या लग्नात एन्जॉय करता आले नव्हते.आणि आता तर लग्न झाले झाले कांचन परदेशात जाणार होती.
लग्न अगदी थाटामाटात पार पडले.जेव्हा कांचनची बिदाई होत होती तेव्हा रुही कांचनच्या गळ्यात पडून रडू लागली.इतक्यात ” काही काळजी करू नका.आम्ही आमच्या मुली सारखेच जपणार कांचनला.” असे कांचनच्या सासुबाई म्हणाल्या.

कांचन ची गाडी जोपर्यंत दिसेल तोपर्यंत सगळे बघत उभारले.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कांचनच्या घरी रिसेप्शन पार्टी ठेवली होती.रमेश आपल्या काही नातेवाईकांना घेऊन पार्टीसाठी गेले.आज रुहीने पार्टीसाठी लाल रंगाचा गाऊन घातला होता.ती खूप सुंदर दिसत होती.
पार्टी एका मोठ्या हॉलमध्ये होती.सगळे नातेवाईक पाहुणचार बघून खूष झाली.रुहीला कांचन जवळ स्टेजवर जाऊन फोटो काढण्यासाठी बोलावले.रुही स्टेजवर जाऊ लागली तोच  एक तरुण मुलगा जो स्टेजवरून खाली उतरुन  खाली येत होता एकदम  तिच्या गाऊन मध्ये  त्याचा पाय अडकला आणि त्याचा एकदम तोल गेला आणि तो रुहीला धरुन खाली पडला.

 दोघेही असे अचानक पडल्या मुळे कावरे बावरे झाले.आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहून लाजेने गालात मंद लज्जेचे हसू दाटून आलेले आपापल्या नजरा चुकविण्यासाठी बालीश प्रयत्न करु लागले.
हे दोघे असे पडलेले पाहून कांचनचा नवरा स्टेजवरून पळतच आला.” ओहो महेश कसा काय अडखळलास”
” अरे नाही यार कसे काय अडकून पडलो हे कळलेच नाही मला.साॅरी मिस…’ म्हणत महेशने रुही कडे पाहून म्हटले.रुही पण स्वतः ला सावरत उभारली होती आणि म्हणाली ” इट्स ओके “
************************

आज कांचन आपल्या नवऱ्याबरोबर परदेशात जाणार होती म्हणून तिला भेटण्यासाठी रुही, तिचे आई वडील आणि भाऊ सगळे जण तिच्या घरी गेले.एयर पोर्ट पर्यंत यावे सगळ्या जणांनी हा हट्ट कांचन ने केला.
एका टॅक्सी मध्ये रुही आपल्या आई वडिलांच्या बरोबर बसली.सगळेजण एयर पोर्ट वर गेले.तिथे महेश म्हणजेच कांचनच्या नवऱ्याचा मित्र देखील आला होता.
रुहीला बघून तो ” हाय ..” म्हणाला.
रुही ने ही त्याला ” हैलो ” म्हटले.

कांचन आणि तिचा नवरा जाण्याच्या आधी सगळ्यांच्या पाया पडले.कांचन आपल्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली.रुही आणि तिचे वडिल देखील रडू लागले.
कांचन ची फ्लाईट गेल्या नंतर रुही आपल्या आई वडिलांच्या बरोबर बाहेर आली आणि टॅक्सी बुक करु लागली.तोच तिथे महेश आला आणि म्हणाला ” माझी कार आहे मी सोडतो तुम्हाला “
” अहो नको आम्ही जातो . तुम्हाला कशाला त्रास” रुहीचे वडील म्हणाले.
” त्यात कसला त्रास.चला ” म्हणत महेशने त्यांना आपल्या मोठ्या कारमध्ये बसविले.

” काय करतोस बाळ तू ? रुहीच्या वडिलांनी महेशला विचारले.
” मी इंजिनिअर आहे.”
महेशबरोबर बोलता बोलता कधी आपले ठिकाणी आलो हेच रुहीच्या वडिलांना कळले नाही.
” चला या चहा नास्ता करुन जा” रुहीचे वडील म्हणाले.
” नको काका.परत येईन.काम आहे मला.”

” ठिक आहे.बर तुमचा फोन नंबर द्या.रुही बेटा महेश चा फोन नंबर घे .”
महेशने आपला नंबर दिला आणि रुहीचा नंबर घेतला.
************************
रविवारी सूट्टी असल्यामुळे रुही जरा आरामात वेळाने उठली आणि आपल्या अंगणातील फुलांच्या झाडांना पाणी घालत उभारली तोच त्यांच्या दारात एक कार येऊन थांबली. आणि त्या कारमधून एक महिला उतरली आणि हळूहळू चालत रुहीच्या घराच्या दारात उभारली आणि दाराची बेल वाजवली.

 रुहीने दार उघडले.
” कोण हवंय?? ” रुहीने विचारले.
” बाळा तुझे आई बाबा आहेत का घरी? ” त्या महिलेने म्हटले.
” हो हो आहेत न. या न या आत या ” म्हणत रुहीने त्यांना आत नेले.
” बसा मी बोलावते आई ला” म्हणत रुही आत गेली.
” आई तुम्हाला भेटायला कोणीतरी आले आहे.मी तर आजच पाहिले यांना ” रुही म्हणाली.

 ” हो का?कोण आले आहे.?” म्हणतच आई बाबा बाहेर आले.त्यांना बघताच ती महीला अदबीने उठली आणि ” नमस्कार.मी मेघना.” ” नमस्कार “
” मी म्हणजे मी सरळ मुद्यावर येते.मी मेघना महेशची आई.महेशला ओळखता न तुम्ही.तर मी त्याची आई.महेश माझा मोठा मुलगा.मिताली माझी धाकटी मुलगी.महेश इंजिनिअर आहे.चांगल्या नामवंत कंपनीत नोकरी करत आहे.मिताली देखील इंजिनिअरिंग करत आहे.आणि तिचे अजून दोन वर्षे आहेत पूर्ण व्हायला.आमचा तिघांचेच कुटुंब.

महेशचे बाबा तो लहान असताना एका अपघातामुळे मृत्यूच्या छायेत गेले.नंतर मी एका खासगी कंपनीत नोकरी करत होते.आता महेश नोकरीला लागला मग मला नोकरी करु नये असे म्हटला.मग मी नोकरी सोडली.तर हे सगळे सांगायचे कारण एवढेच की माझ्या महेशच्या मनात रुही रुजली आहे.
मी महेश साठी रुहीला मागणी घालण्यासाठी आले आहे.आणि हो काही गडबड नाही.तुम्ही महेशची चौकशी करु शकता आणि तुम्ही सर्वांनी विचार करून निर्णय घ्यावा.आम्हाला काही नको.फक्त रुही आणि नारळ द्या.लग्न आम्ही अगदी थाटामाटात पार पाडू.तुम्ही रुही बदल काही काळजी करू नका.बघा तुम्ही विचार करा आणि आम्हाला काय तो निर्णय सांगा.”
क्रमशः
© परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा

Series Navigationरेशीम बंध भाग 2 >>

Leave a Comment

error: Content is protected !!