रेशीम बंध भाग 2

This entry is part 2 of 2 in the series रेशीम बंध


भाग १ इथे वाचा
© परवीन कौसर
मेघना बोलत होती आणि रुही व तिचे आई वडील आ वासून उभे राहिले होते. त्यांना हे काय ऐकतोय आपण हेच कळत नव्हते. मेघना ने देखील त्यांच्या मनातील चलबिचल ओळखली.आणि ती म्हणाली ”  माफ करा मी अशी अचानक आले आणि एकदमच लग्नाची गोष्ट सुरू केली.आता तुम्हाला मी सविस्तर सांगते.
ज्या दिवशी कांचनचे रिसेप्शन होते तेव्हा आम्ही पण तिथे होतो.त्यावेळी रूही आणि महेश पडले आणि त्यावेळी मी रुहीला पाहून हि कोण ? आणि कोणाची मुलगी ?? असे कांचनच्या सासुबाईंना विचारले.तेव्हा कांचन ची ही बहीण आहे असे समजले.

‌त्यानंतर मी रुहीला माझ्या सुनेच्या रुपातच पाहीले. महेशला देखील मी रुहीबद्दल विचारले तर त्याने ही होकार दिला.आता तुमचा पत्ता महेशनेच सांगितला. दुसऱ्या कोणाला मध्यस्थी घेऊन लग्नाची बोलणी करावी तर इतका वेळ नाही.कारण दोन महीन्यांनी महेश परदेशात जाणार आहे. नंतर तो तिथे सेटल झाला कि आम्हाला पण तिथेच नेणार आहे. म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर लग्न करायचे आहे महेशचे आणि रुहीच आमच्या घरी सून म्हणुन यावी ही माझी इच्छा आहे.”

हे ऐकताच रुहीची आई रडूच लागली.आणि म्हणाली ” चिमणी माझी एवढी मोठी झाली .आताच तर कुठे आपल्या हाताने खाणे शिकली तोच घरटे सोडून जाणार.”
रुहीला तर काहीच सुचेना.आणि तिचे वडील पण स्तब्ध होऊन बसले.
जसे कांचन चे लग्न थाटामाटात केले तसेच रुहीचे पण लग्न करून दिले.
पण कांचनला येणे जमले नाही . कारण तिच्या नवऱ्याला सुट्टी मिळाली नाही. नुकतेच तिच्या लग्नानंतर तिच्या नवऱ्याने आॅफिस जाॅईन केले होते म्हणून.

रुहीचा गृहप्रवेश झाला.महेशची बहीण मिताली नंणंद नव्हे तर एक जीवलग मैत्रीणी सारखी रुही बरोबर राहायची.वहीनी वहीनी म्हणत तिच्या आजूबाजूला असायची.मेघना तर मिताली सारखेच रुहीला प्रेम करायची.
महेश हा एकदम साध्या स्वभावाचा मुलगा. त्याला आपल्या नोकरीचा किंवा शिक्षणाचा काडीमात्र गर्व नव्हता. सगळ्यांशी अगदी प्रेमाने आपुलकीने वागायचा. आई, बहीण हेच त्याचे विश्व होते. प्रामाणिकपणे काम करत होता.
आई , बहीण आणि आता त्याच्या आयुष्यात आलेली रुही. रुहीवर तो आतोनात प्रेम करु लागला होता. रुही पण त्याच्यावर जीव ओवाळून टाकत असे.
रुही त्याची अर्धांगिनीच नव्हे तर एक मैत्रीण पण झाली होती.महेश तर तिच्या प्रेमात वेडा झाला होता.
दोघा राजाराणीचा स्वप्नात पाहिले नसेल असा संसार रुपी नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती.

बघता बघता एक महिना संपला.आता महेशची परदेशात जाण्याची तयारी सुरू झाली होती. तिकीट आले होते.
रुहीच्या  देखील पासपोर्टसाठी अर्ज केला होता.मितालीचे राहीलेले दोन वर्षे तिथेच पूर्ण करायचे हा देखील प्लान होता

 ” ऐक न रुही.तुला सोडून जाण्याची इच्छा होत नाही.” रुहीला आपल्या बाहू पाशात ओढत महेश म्हणाला.
” महेश कोणीतरी पाहील ओ.”
” पाहीले तर पाहू दे.तू बायको आहेस माझी एकूलती एक.” असे म्हणत महेशने तिच्या ओठांवर ओठ टेकवत प्रदीर्घ चुंबन घेतले.
” हं…हं….दादुटल्या दार आहे खोलीला तुझ्या.जरा लावत जा.आणि हो तसे मी काही पाहीले नाही हो .” म्हणत. हसत हसत मिताली पळाली.
रुही लाजेने चूर चूर होऊन आपल्या हातात चेहरा लपवून उभारली.

रात्री रुही आणि महेश दोघेही जागेच होते.कितीही प्रयत्न केला तरी त्यांना झोप येईना कारण दुसऱ्या दिवशी दुपारी महेशची फ्लाईट होती.
मेघना ने सकाळी महेशच्या आवडीचा स्वयंपाक केला.सगळेजण एकत्र जेवायला बसले.रुहीला काही केल्या जेवण जाईना.अगदी पाण्याबरोबर एक एक घास गिळू लागली होती.
” आई आता अर्ध्या तासात आपल्याला निघायला हवे. तयार व्हा तुम्ही लवकर.” महेश म्हणाला.

हे ऐकून रुहीला हुंदकाच आवरता आला नाही. ती रडू लागली.
तिला रडताना पाहून महेश ने तिला जवळ घेतले आणि म्हणाला ” ये वेडू.रडतेस काय लहान बाळासारखे.अरे मी गेलो कि लगेच तुम्हा सर्वांना बोलावून घेणार आहे. तोपर्यत तुझे पण पासपोर्ट चे काम होईल आणि तुझी डिग्री पण मिळेल. मग तू देखील तिथेच नोकरी कर. आणि हो इथे आई आणि मिताली आहेतच न .डोन्ट वरी डियर. प्लिज मी जाताना असे रडलेला चेहरा नको गं.हसरा चेहरा असू दे.”
रुहीचे आईं वडील आणि भाऊ पण महेशला सोडण्यासाठी एयर पोर्ट वर आले होते.

महेशला जड अंतःकरणाने रुहीने  स्माईल दिली. महेशची फ्लाईट डोळ्याआड होईपर्यंत रुही बघत उभी राहिली.
रुहीला ही संध्याकाळ खाण्यास उठली. तिला महेशची एकसारखी आठवण येऊ लागली. ती शून्य नजरेने खिडकीतून बाहेर बघत बसली होती.
” रुही बेटा चल जेवायला.” मेघनाच्या आवाजाने रुही एकदम भानावर आली.
” अं …हो…हो…आले आले आई ” म्हणत आपले ओले डोळे पुसत ती बाहेर आली.

डायनिंग टेबलावर मेघना ने जेवणाची ताटे वाढून ठेवली होती.” मिताली  ये गं.”
” आई तुम्ही कशाला ताटे वाढतं आहात. बसा मी वाढते.” रुहीने मेघना ला म्हटले.
” अरे त्यात काय.तू वाढले काय आणि मी एकच.चल बस” म्हणत मेघना पण तिच्या समोरच्या खुर्चीवर बसली.
मिताली पण हातात पुस्तक घेऊन जेवायला बसली.

” तू तर बापाचीच लेक आहेस.पुस्तकी किडा. कितींदा मी सांगायचे आधी जेवण करा. मग निवांत वाचन करा. पण ऐकतील तर शप्पथ.”
” ये आई तुला नाही कळायचं.पुस्तकांचा छंद.”
मेघना व मिताली बोलत होत्या पण रुही एकदम शांत बसली होती.
तिला आपल्या शेजारी महेश बसलेला आहे आणि तो तिच्या बरोबर लाडिक लळीवार डोळ्यांच्या डोळ्यात इशाऱ्याने चाळे करतो आहे हेच दिसत होते.आणि एकदम ती ” अहो महेश आई बघतील ना …..” असे म्हणाली.

तिचे बोलणे ऐकून मेघना आणि मिताली दोन्ही चकीत झाल्या .
” रुही. ये रुही काय झाले.”
************************
रात्र भर रुहीला झोपच लागली नाही.एकसारखे तिला महेशची आठवण सतावत होती. ती वारंवार आपला फोन चेक करत होती.कि महेशचा फोन येऊन गेला कि काय. किंवा काही मेसेज नवा. आलेले त्याचे मेसेज पुन्हा पुन्हा वाचत होती.
सकाळी महेशचा जाऊन सुखरूप पणे पोहोचल्याचा फोन आला.
रुही आणि मेघना मिताली सगळ्या खुप खुश झाल्या.

आता रुही आपल्या पासपोर्टसाठी लागणारे सर्व डाॅक्युमेंट आणण्यासाठी माहेरी जाणार होती.
” लवकर ये गं रुही. महेश पण नाही आणि तू पण नाही म्हणजे घर खायला उठेल बघं. ही तर पुस्तकांच्या दुनियेत असते. मी आपली एकटीच .” मेघना म्हणाली.
” आई नाही तर असे करा तुम्ही पण चला माझ्या बरोबर.आपण राहू दोन-चार दिवस तिथे.मग येऊ.म्हणजे तुम्हाला देखील चेंज थोडा.” रुही म्हणाली.

” छे गं मी कशी येईन.मितालीला सोडून. तू जा आणि तूच जरा आरामात ये.कारण आपण पण जाणार महेश जवळ. मग भारतात कधी येणे जमेल काही सांगता येत नाही”
************************
रुहीच्या निर्जीव चेहऱ्यावर महेशच्या विरहाची किनार होती तिला तिचे मन कशात ही रमवता येत नव्हते. तसे तर लग्न होऊन फक्त दोनच महीने झाले होते पण या दोन महीन्यात हे दोघे एकमेकांत असे गुंतले होते जसे खूप जुने ऋणानुबंध जुळलेले होते असे.
दोन महीन्यात या दोघांनी जितका मिळेल तितका वेळ एकमेकांना दिला होता.आपल्या आवडी निवडी एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बदलल्या होत्या.दोघांना पाहून सगळे म्हणायचे ” मेड फॉर इच अदर अशी जोडी आहे.”
रुहीच्या आईने तिच्या आवडीचा स्वयंपाक केला होता.

“आई ऐक ना ही भाजी नको न मला.”
” काय ???? ही भाजी आणि तुला नको.अगं शुद्धीवर आहेस न तू.ही भाजी शिजे पर्यंत तुला राहावयाचे नाही. किती गडबड करायची तू ही भाजी खाण्यासाठी.आणि मला जरा शिल्लक ठेव आई रात्री खाण्यासाठी .म्हणणारी तू आणि आज तू नको म्हणतेस .कमाल आहे तुझी.”
” आई खरंच नको गं मला.महेशंना अजिबात आवडत नाही ही भाजी.”
ती महेश बदल बोलत होती आणि एकदम तिच्या डोळ्यात पाणी आले.

आईला समजण्यास वेळ लागले नाही कि रुही आणि महेश चे बंध रेशमाचे आहेत.दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंतले आहेत.आईला हे बरे वाटले.मनोमन ती खूप खुश झाली.आणि देवाला धन्यवाद करत यांचे प्रेम असेच राहू दे रे देवा परमेश्वरा म्हणाली.
************************
रोज प्रमाणे रुही सकाळी लवकर उठून आंघोळ करून ओले केस टाॅवेल मध्ये लपेटून ड्रेसींग टेबल समोर येऊन उभारली.आणि हळूच आपल्या ओल्या केसांना बांधलेला टाॅवेल काढला आणि आपले ओले लांब सडक केस मोकळे सोडले आणि त्यांचा गुंता हळूवार सोडू लागली तोच मागुन तिच्या मानेवर हळूच एक गरम श्वासात ओठ टेकवत तिला आपल्या बाहू पाशात ओढत महेश म्हणाला ” गुड मॉर्निंग माय स्वीट बायको….” आणि एकदम लाजेने चूर चूर होऊन आपल्या हातात चेहरा लपवून रुही उभारली.।” अरे लाजतेस का मी नवरा आहे तुझा.” म्हणत तिला आपल्या मिठीत घेतले.
“सोडा न कोणीतरी बघेल.अहो …अहो..सोडा न…महेश …सोडा न…..

…..” ये रुही काय झाले.असे काय बोलत आहेस.कोणाला म्हणते सोडा सोडा….”
आईच्या आवाजाने रुही एकदम भानावर आली आणि तिच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडू लागली.
************************
जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपली पासपोर्ट ची कामे, काॅलेज मधील सगळी कामे उरकून घेण्यासाठी रुही आपल्या वडिलांच्या बरोबर धावपळ करु लागली.
महेशने देखील तिकडे आपल्या फॅमिली साठी चांगले घर घेतले.आपली आई, बहीण आणि रुही यांना परदेशात आणण्यासाठी ज्या ज्या प्रोसेस करायला लागते त्या त्या पूर्ण केल्या.
रुहीचे पासपोर्ट आणि डिग्री चे काम पूर्ण झाले.मेघनाने पण जाण्याची तयारी सुरू केली.मितालीने ही आॅनलाईन काॅलेजची इंट्रन्स परीक्षा दिली.जवळ जवळ सर्व कामे झाली होती.
************************

आणि आज हे कुटुंब महेश जवळ जाण्यासाठी तयार झाले.
रुहीचे आई वडील आणि भाऊ , महेश चे काही मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळेजण भेटायला आले होते.
रुही आपल्या आई वडिलांच्या गळ्यात पडून रडू लागली.
” अरे वेडीच आहे.इतके दिवस तू महेश च्या विरहात रडत होती.आता तर तुला खूष व्हावे लागेल.तुझे विरहाचे दिवस संपले.आता तू तुझ्या महेशजवळ निघाली आहेस.तर आनंदी चेहऱ्याने हसत हसत जा.तू काय एकटीने च विरह सोसला नाही तर तुझ्या बरोबर महेश देखील या वेदनेत जळला आहे. जा बाळा सुखी रहा.असेच हे तुमचे रेशीम बंध आयुष्यभरासाठी एकमेकांना साथ देत गुफुंन राहू दे.” म्हणत आईने रुहीचे डोळे पुसले.
समाप्त
© परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार.अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा

Series Navigation<< रेशीम बंध (भाग 1)

Leave a Comment

error: Content is protected !!