©स्वामिनी चौगुले
असेच काही दिवस निघून गेले. संयम ही मैथिलीने त्याच्यावर लावलेल्या आरोपांमुळे चांगलाच दुखावला गेला होता त्यामुळे तो ही आता त्याच्या कामास काम ठेवून वागत होता.
मैथिली तर त्याच्यापासून फटकूनच वागत होती.
आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मिटिंग होती कारण कंपनी पहिल्यांदाच एक एडवेंचर ट्रिप प्लॅन करणार होती आणि त्यासाठीच आजची मिटिंग होती.
त्यासाठी आज कंपनीचे सी.ई.ओ येणार होते आणि त्यासाठी संयमला डायरेक्ट हेड ऑफिसमधून प्रेझेन्टेशन तयार करायला सांगण्यात आले होते. मैथिलीला फक्त संयमला काही दिवस दुसरे काम देऊ नये अशी सूचना देण्यात आली होती.
त्यामुळे मैथिलीने सुटकेचा निःश्वास सोडला किमान काही दिवस तरी तिला संयमशी डिल करावे लागणार नव्हते.
संयम आज खूपच गडबडीत होता. त्याने त्याची पी.पी.टी आणखीन एकदा चेक केली आणि तो केतनबरोबर ऑफिसमध्ये आला. बरोबर अकरा वाजता सी.ई.ओ. चव्हाण आले आणि काही जुजबी चर्चा करून सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले.
मिस्टर चव्हाण- “ मिस्टर दरेकर प्लिज स्टार्ट द प्रेझेंटेशन!” ते म्हणाले आणि संयम जाऊन स्क्रीनच्यासमोर उभा राहिला.
संयम- “ गुड मॉर्निंग एव्हरी वन! आपली कंपनी पहिल्यांदाच एडवेंचर ट्रिप आयोजित करणार आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली त्यासाठी मी चव्हाण सरांचे आभार मानतो.
खरं तर आपण अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी साहसी खेळ पाहत असतो आणि तिथे गेले की ते खेळून त्यातला थ्रिल अनुभवत असतो. बंकी जंपिंबिंग, स्कुबा ड्रायव्हिंग, पॅरासेलिंग,रॉक क्लायंमिंग आणि ट्रेकिंग या सगळ्या खेळामधून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे थ्रिल आणि किक मिळते तर या साहसी खेळामधील ट्रेकिंग या साहसी खेळाचा आपण आपल्या क्लायंटला आनंद देणार आहोत.
ही आपल्या कंपनीची अशा प्रकारची पहिलीच ट्रिप असल्याने आपल्याला आपल्या क्लायंटमध्ये आपल्या विषयी विश्वास निर्माण करावा लागेल.
तर चव्हाण सरांनी मला सांगितल्या प्रमाणे मी अनुभवलेल्या ट्रेकिंगच्या स्थळाचा यात समावेश असणार आहे.
मी गेल्या वर्षी कुल्लू मनालीला गेलो होतो. तिथे मी पिन पार्वती ट्रॅकला गेलो होतो. हा भारतातील सगळ्यात अवघड ट्रॅक पैकी एक मानला जातो. या ट्रॅकसाठी 10 ते 12 दिवस लागतात. पिन पार्वती ट्रॅकची उंची5,319 किमी म्हणजेच 17,457 फूट आहे कुल्लूपासून 110 किमी आहे.
हा ट्रॅक निसर्गरम्य आणि अनेक धार्मिक स्थळांसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्यात मनाली,टुंडा भुज, माणिकरण साहिब गुरुव्दारा,ठाकूर कुंवा,बर्षेनी, ऑड थाच आणि मानतलाई ही सुंदर पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळे येतात.
पिन पर्वती ट्रॅक हा क्लायंटसाठी अविस्मरणीय आणि थ्रिलिंग ट्रेकिंग अनुभव होणार आहे. पण हा हिमाचल प्रदेश मधील आणि हिमालय पर्वत रांगामधील सगळ्यात अवघड ट्रॅक आहे. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत असणाऱ्या लोकांसाठीच आहे कारण हा ट्रॅक आपली मानसिक आणि शारीरिक परीक्षा घेणारा आहे त्यामुळे ज्या लोकांना खरंच धाडसी काही तरी करायचे आहे त्यातले थ्रिल अनुभवायचे आहे त्यांच्यासाठीच ट्रॅक आहे.
बाकी या ट्रॅकमध्ये जीवाला ही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे क्लायंटला सगळ्या गोष्टीची कल्पना आधीच द्यावी लागेल. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता.” त्याने स्किनवर वेगवेगळे फोटो दाखवत. तिथली सविस्तर माहिती दिली होती.
मैथिली- “ अशा ठिकाणी लोकांना न्यायचे म्हणजे त्यांची मेडिकल टेस्ट करून घ्यावी लागेल तसेच ज्यांना या आधी ट्रेकिंगचा अनुभव आहे असे लोक असतील तर बरं होईल कारण अशा ठिकाणी लोकांना घेऊन जाणे म्हणजे आपली जबाबदारी आणि जोखीम देखील आहे.
संयम- “ हो मॅडम बी.पी, शुगर, अस्थमा असणाऱ्या लोकांना आपण नाही घेऊन जाऊ शकत. त्यासाठी त्याचे मेडिकल चेकअप करून काही निवडक लोकच आपण घेऊन जाणार आहोत. त्यात ही सगळे चाळीशीच्या आत असलेले लोक असतील.” त्याने तिच्या शंकेचे निरसन केले.
चव्हाण-“ मिस्टर दरेकर या आपल्या ट्रिपची पूर्ण जबाबदारी तुमची असेल तुम्ही टीम लीडर असाल तुमच्याबरोबर तुमच्या मदतीसाठी मिस जाधव, मिस्टर केतन मेहता, मिस मेधा राणे येतील. मिस जाधव तुम्ही तिघे मिस्टर दरेकरांची टीम असाल.” ते बोलत होते.
मैथिली- “ ठीक आहे सर!” ती म्हणाली.
चव्हाण- “ ठीक आहे तर पुढच्या दोन महिन्यात ही ट्रिप अरेंज करू आणि घेऊन जाऊ पण जास्तीत जास्त 30 लोकच या ट्रिपमध्ये असतील.” ते म्हणाले आणि मिटिंग संपली.
दोन महिने सगळी तयारी झाली. या काळात संयमने ही त्याच बोलणं मैथिलीशी कामा पूरते ठेवले आणि मैथिली देखील तसेच वागत होती.
संयम मैथिलीने त्याच्यावर केलेल्या आरोपांमुळे चांगलाच दुखावला होता आणि त्याने मैथिलीचा विषय कुठे तरी मनातून काढून टाकला होता.
मैथिलीच्या मनात मात्र संयमबद्दल कटुता होती. तिला संयमने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला आहे असा मेधाच्या सांगण्यावरून पक्का समज झाला होता पण प्रत्यक्ष सी.ई.ओने सांगितल्यामुळे ती नाईलजास्तव त्याच्याबरोबर काम करत होती.
ट्रीपला निघायला एक आठवला राहिला होता आणि संयमने त्यांनी निवडलेल्या क्लायंटची आणि या तिघांची मिटिंग आज ऑफिसमध्ये ठेवली होती. त्याने बोलावल्या प्रमाणे सगळे अगदी वेळेवर हजर झाले.
संयम- “तर आज मी तुम्हांला सगळ्यांना इथे काही आवश्यक सूचना देण्यासाठी आणि ट्रिपला निघताना काय सामान घ्यायचे याची यादी सांगण्यासाठी इथे बोलावले आहे. यादी व्हॉट्स अप पण करता आली असती पण तुमच्या सगळ्यांना काही सूचना द्यायला बोलावले आहे.
ही एक ट्रॅकिंग ट्रिप आहे. या ट्रिपचा आनंद तर सगळ्यांनीच घ्यायचा आहे पण ही ट्रिप जितकी थ्रिलिंग असणार आहे तितकीच ती धोकादायक आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर कोणतीच गोष्ट कॅज्युअली घेऊ नका.
आणखीन एक या ट्रिपमध्ये आपण एकमेकांना आधार देणार आहोत आणि पुढे जाणार आहोत त्यामुळे आपापसात भांडणे आणि हेवेदावे नको आहेत मला! तुमच्या सगळ्यांची जबाबदारी टीम लीडर म्हणून माझ्यावर आहे. मी जी वस्तूंची यादी देणार आहे त्या सगळ्या वस्तू तुम्ही सगळ्यांनी काटेकोरपणे आणल्याच पाहिजेत. हे लक्षात ठेवा. बाकी निघण्या आधी दोन-तीन दिवस आठवणीने भरपूर पाणी प्या.ज्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.
रेनकोट
फुल स्लीव्ह पात्तळ जॅकेट
मंकी कॅप
ट्रेकिंग शूज
गरम मोजे हाताचे आणि पायाचे ही
टॉवेल्स
स्वेटर्स
काळे गॉगल्स
कोल्ड क्रीम
लीप बाम
ट्रॅकिंग पोल
एल.ई. डि टॉर्च
प्राथमिक औषधे
आणि अशाच काही वस्तूंची यादी आहे जी मी आपल्या व्हॉट्स ग्रुपवर पाठवेन.” तो सांगत होता आणि सगळे लक्ष पूर्वक ऐकत होते.
मैथिली- “ आठ दिवसांनी म्हणजे दहा तारखेला आपण दुपारी दोनच्या फ्लाईटने कुल्लूसाठी निघणार आहोत तशी सगळी बुक्कीग आपली झाली आहे तर भेटू आठ दिवसांनी.” ती म्हणाली आणि मिटिंग संपली.
★★★
आठ दिवसांनंतर…
सगळे पुणे एअरपोर्टवर ठरल्याप्रमाणे पोहोचले. कुल्लूला सगळे दुपारी दोनला पोहोचले.
एका हॉटेलमध्ये सगळ्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली गेली होती.
आज आराम करून दुसऱ्या दिवशीपासून ट्रॅकिंगसाठी निघणार होते.
सगळे आराम करायला गेले.
संयम मात्र ट्रॅकिंगमध्ये लागणारे खाद्यपदार्थ आणि बाकी गोष्टींची व्यवस्था करण्यात बिझी होता.
मैथिली त्याचे निरीक्षण करत होती आणि विचारात पडली होते तिला प्रश्न पडला होता की
‛इतका डेडिकेटेड माणूस असा वागू शकतो का? त्याला कोणाच्या ही शिडीची गरजच काय?आपण त्याला ओळखण्यात गफलत तर करत नाही ना?
मेधा जे बोलली ते खरं आहे की खोटं पण मेधा इतकं मोठं खोटं का बोलेल माझ्याशी?’
तिला अनेक प्रश्नांनी घेरले होते आणि संयम मात्र सगळं विसरून त्याच्या कामात मग्न होता.
मनाने स्वच्छ आणि निर्मळ असणारी व्यक्ती कायम मनाने शांत असते. त्याला चांगलं माहीत असतं की आपण काहीच चुकीचे केले नाही त्यामुळे त्याच्या मनाचा डोह कायम नितळ आणि शांत असतो.
संयम अशीच व्यक्ती होती तर या उलट मैथिली मात्र बेचैन होती कारण तिला कळत नव्हतं की तिचं मन तिला संयम विषयी जे सांगत आहे ते खरं आहे की तिचं डोकं आणि मेधा जे सांगत आहे ते खरं आहे या मानसिक द्वंद्वात ती अडकली होती.
मैथिलीला संयमची खरी ओळख पटेल का?
पुढे काय होणार आहे पाहू पुढच्या भागात
क्रमशः भाग ९ इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा.