ना उम्र की सीमा हो ( भाग 12 )

भाग 11 इथे वाचा

©स्वामिनी चौगुले
संयमने दुसऱ्या दिवशी दुपारी डोळे उघडले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
मैथिली आणि केतन त्याला भेटायला गेली.
मैथिली- “ कसं वाटतंय तुला आता?” तिने आवंढा गिळत विचारले.
संयम- “ मी ठीक आहे. आपले सगळे क्लायंट आणि टीम मेंबर सुरक्षित आहेत ना?” त्याने तुटक तुटक बोलत विचारले.

मैथिली- “ हो सगळे सुरक्षित आहेत आणि त्यांच्या त्यांच्या घरी देखील पोहोचले.
तू आराम कर. कोणता ही विचार करू नकोस.” ती काळजीने म्हणाली.
संयम- “ बरं तुम्ही ही जा मॅडम! मी ठीक आहे.” तो म्हणाला 
आणि मैथिलीला मात्र भरून आले तिला त्याच्याजवळ राहायचे होते पण तिने तसे केले तर संयमला कळेल की तिचं ही प्रेम आहे त्याच्यावर म्हणून तिने केतनला डोळ्यांनीच काळजी घे म्हणून सांगून लॉजवर गेली.

केतन संयमची काळजी घ्यायला हॉस्पिटलमध्ये थांबला.
हवामान आणखीन बिघडल्यामुळे कुल्लूला येणारे रस्ते बंद आणि फ्लाईट्स कॅन्सल झाल्या होत्या.
त्यामुळे सी.ई. ओ साहेब आणि संयमचा भाऊ दोघे ही उद्या सकाळपर्यंत पोहोचणार होते.
संयमला संध्याकाळी डिस्चार्ज त्याच्याच हट्टामुळे डॉक्टरांना द्यावा लागला.
मैथिली हॉस्पिटलमध्ये त्याला घ्यायला आली होती.

मैथिली- “ डॉक्टर वो ठीक है ना? आप उसे इतनी  जल्दी डिस्चार्ज मत दिजीए !” ती काळजीने बोलत होती.
डॉक्टर-“वो अब ठीक है। लेकिन हमने उन्हें हॉस्पिटल में रहने के लिए बहुत समझाया लेकिन ओ माने तब ना! वो जिद पकड़ के बैठे है जाने की तो हम क्या कर सकते है! आप उनका खयाल रखिए प्लीज!
आज बर्फ बहुत गिर  रही है, ठंड भी बहुत है और ऐसी हालत में उन्हें हाइपोथर्मिया हो सकता है। जो उनके लिए जानलेवा भी हो सकता है। अगर ऐसा कुछ हुआ तो उन्हें तुरंत हॉस्पिटल लेके आईए। वो शादीशुदा होते तो अलग बात थी। उनकी बीवी उन्हें ऐसी हालत में संभाल लेती।” ते म्हणाले.

मैथिली-“ मैं समझ रही हूँ आप क्या कहना चाहते है। आप चिंता मत किजिए मैं संभाल लुंगी सब!” ती म्हणाली.
केतनने संयमचे आवरले. त्याला बराच अशक्तपणा जाणवत होता.
मैथिली आणि केतन त्याला हॉटेलवर घेऊन आले.
मैथिलीने केतनला त्याच्याजवळ थांबायला सांगितले.
केतनने संयमला जेवायला घातले त्याला औषधे दिली आणि झोपवले.

मैथिली त्याची दोन वेळा चौकशी करून गेली.
ती तिच्या रूममध्ये होती पण तिला झोप लागत नव्हती. संयमची काळजी तिला सतावत होती.
आता रात्रीचे  एक वाजून गेले होते आणि बाहेर सतत बर्फ पडत होता.
केतन ही संयम झोपला म्हणून त्याच्या शेजारी झोपला होता पण अचानक त्याला जाग आली ती संयमच्या आवाजाने थंडीने त्याचे दात एकमेकांवर आपटत होते.
हात पाय गार पडले होते. तो थंडीने कुडकुडत होता.

केतनने त्याला दोन ब्लॅंकेट पांघरून घातले.
त्याचे हातपाय घासले पण काही उपयोग होत नव्हता शेवटी त्याने मैथिलीला फोन केला.
मैथिली जागीच होती ती धावतच तिथे आली.
केतन- “ मॅडम आपल्याला संयमला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल. मी टॅक्सी पाहतो तुम्ही इथेच थांबा.” तो म्हणाला आणि निघून गेला.
मैथिली त्याचे हातपाय घासत होती.रूममध्ये हिटर देखील सुरू होते  पण संयम मात्र आणखीनच थंडीने गारठत होता.

थोड्या वेळाने केतन आला.
मैथिली- “ मिळाली का टॅक्सी?” तिने विचारले.
केतन- “ नाही मॅडम बाहेर वातावरण खूप खराब आहे. एक ही टॅक्सी मिळत नाही आणि हॉस्पिटलच्या रस्त्यात दरड कोसळली आहे त्यामुळे अंब्युलन्स देखील येऊ शतक नाही आणि त्याच भागात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत.
मॅडम संयाला काही होणार तर नाही ना! मला खूप भीती वाटत आहे.” तो रडत बोलत होता.

मैथिलीला मात्र डॉक्टरांचे शब्द आठवले “ इनकी बीवी होती तो सब संभाल लेती!” तिने काही तरी विचार केला आणि ती केतनला म्हणाली.
मैथिली- “ माझ्यावर विश्वास आहे ना?”
केतन- “ असं का विचारताय मॅडम?” तो म्हणाला 
मैथिली- “ संयमला काही होणार नाही. मी त्याला काही होऊ देणार नाही. तू माझ्या रूममध्ये  जाऊन झोप मला काय करायचं ते माहीत आहे.” ती म्हणाली आणि केतन काय ते समजून जास्त वेळ तिथे न थांबता निघून गेला.

संयम थंडीने आणखीन जास्त कुडकुडत होता.
मैथिलीने तिचे कपडे काढले आणि ती संयम शेजारी ब्लॅंकेटमध्ये  झोपली. तिने संयमला मिठी मारली आणि संयमचा हात आपसूकच तिच्या पाठीवर गेले.
मैथिली त्याला तिच्या शरीराची ऊब देण्याचा प्रयत्न करत होती आणि संयम तिला प्रतिसाद देत होता.
संयमचे कपडे देखील केंव्हाच गळून पडले होते. तो अर्धवट ग्लानीत आणि अर्धवट शुद्धीत मैथिलीशी एकरूप होत होता आणि मैथिली त्याला साथ देत होती.

मैथिलीच्या उबदार स्पर्शाने आणि साथीने त्याची थंडी  हळूहळू कमी होत गेली आणि तो तिच्यात समरस होत गेला.
संयम- “ आय लव यु मैथिली!” तो गुंगीतच बोलत होता.
याच एका निसरड्या क्षणी मैथिलीचा ही तोल ढळला आणि ती त्याच्या कपाळाचे चुंबन घेऊन भावनेच्या भरात बोलून गेली.
मैथिली- “ माझं ही तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला काही होऊ देणार नाही.” ती म्हणाली आणि तिने तिची मिठी आणखीन घट्ट केली. त्याने तिच्यात आणखीन समावण्याचा प्रयत्न सुरू केला आणि मैथिलीने त्याला साथ दिली.

सकाळी नऊ वाजता संयमला जाग आली तेंव्हा मैथिली त्याच्या बाहुपाशात होती. तिने ही त्याला घट्ट मिठी मारली होती. संयमच्या चेहऱ्यावर तिला तसं पाहून हसू फुटले.
त्याने  स्वतःला  तिच्या  मिठीतुन सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या चुळबुळीने तिला जाग आली. तिने डोळे उघडले तर तो तिला रोखून पाहत होता. त्याला तसं पाहताना पाहून ती लाजली आणि उठण्याचा प्रयत्न करू लागली पण संयम तिला सोडायला तयार नव्हता.
मैथिली-“ सोड संयम मला! ” ती म्हणाली.

संयम- “ तुम्ही इथे माझ्या रूममध्ये काय करताय? मॅडम तुम्ही किती ही लपवले तरी तुमचे प्रेम तुमच्या डोळ्यात तुमच्या कृतीत दिसते. तुम्ही ते काल व्यक्त ही केले आहे मग आता कोणती गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करताय?” तो तिच्या डोळ्यात पाहून बोलत होता.
मैथिली- “हे बघ संयम तुझा काही तरी गैरसमज होतोय. काल मी म्हणाले ते चुकून भावनेच्या भरात बोलून गेले माझ्या मनात तुझ्या विषयी तसं काही नाही.” तिने स्वतःला सोडून घेतलं आणि ती बेडजवळ पडलेले तिचे कपडे घेत म्हणाली.
संयम- “ अजून ही माझाच गैरसमज होतो आहे का? मग काल तुमच्यात आणि माझ्यात जे झाले ते प्रेम नाही तर काय होत मॅडम?” त्याने उठून तिचा हात धरून विचारले.

मैथिली- “ ते तुझा जीव वाचवण्यासाठी मला करावे लागले संयम!  तुला हाइपोथर्मियाचा अटॅक आला. काल रात्री  खूप बर्फ पडत होता त्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये न्यायला वाहन मिळत नव्हते.
रस्त्यात दरड कोसळली होती त्यामुळे रस्ते देखील ब्लॉक होते.
तुझा जीव वाचवण्यासाठी मला तुला माझ्या शरीराची ऊब द्यावी लागली. जे झालं ते विसर संयम तू आराम कर.” 

ती वॉशरूमकडे वळणार तर संयमने तिला भिंतीला टेकवले आणि तिचे दोन्ही हात घट्ट धरून तिच्या अगदी जवळ जाऊन तिच्या डोळ्यात पाहत बोलू लागला.
संयम- “ विसरून जाऊ? इतकं सोपं आहे का ते? तुम्ही काल रात्री तुमच्या प्रेमाची कबुली दिली आणि आज म्हणताय की आपल्यात जे झालं ते विसरू? का मैथिली का वागत आहेस तू माझ्याशी असं? आपल्यात काल रात्री जे झालं ते खरंच प्रेम नव्हतं?” तो चिडून बोलत होता.
मैथिली-“ मी जे बोलले ते  माझा नवरा समजून बोलले. जो या जगात नाही. माझं फक्त त्याच्यावर प्रेम आहे तुझ्यावर नाही कळलं तुला! मी जे केलं ते तुझा जीव वाचवण्यासाठी केलं.” ती म्हणाली.

संयम- “ असंच होत तर मग का वाचवले मला? तुम्हाला कोणी अधिकार दिला माझ्या भावनांशी आणि माझ्या शरीराशी खेळण्याचा? मरू द्यायचं होत मला!” तो चिडून तिचे हात दाबून बोलत होता.
मैथिली- “ मी कोणाच्याशी भावनांशी खेळले नाही संयम! तू माझा जीव वाचवला त्याची परत फेड समज ही आणि सोड मला!” ती स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
संयम- “ अच्छा म्हणजे तू माझ्या उपकाराची परत फेड अशी केली का? किती खोटं बोलावं मैथिली तुझे डोळे तुझ्या ओठांना साथ देत नाहीत.” तो तिच्या डोळ्यात पाहत चिडून बोलत होता.

मैथिली-“ सोड मला संयम उगीच काही तरी बरळू नकोस. आपल्यात जे झालं ते तुझी गरज आणि माझा नाईलाज होता बाकी काही नाही. विसर सगळं!” 
ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत बोलत होती आणि संयमचा संयम आता सुटला होता.
त्याने तिच्या मानेत हात घालून तिलाजवळ ओढले आणि तिच्या ओठावर हार्डली किस करू लागला.
मैथिली थोडावेळ त्याच्याबरोबर वाहवत गेली पण भानावर येत तिने त्याला जोरात धक्का दिला आणि आधीच अशक्त झालेला संयम तिच्या धक्क्यामुळे बेडजवळ जाऊन पडला.

तिथे असलेल्या कॉर्नर पिसच्या कोपऱ्यावर त्याचे कपाळ जोरात आपटले. त्याला कॉर्नत पिसचा कोपरा कपळावर चांगलाच लागला आणि त्यातून रक्त येऊ लागले.
दोन मिनिटं संयम खाली बसला त्याला गरगरत होते.
ते पाहून मैथिली त्याच्याजवळ जाणार तर तो रागाने तिच्यावर ओरडला.
संयम-“ खबरदार माझ्याजवळ आलीस तर! झालं तेव्हढं पुरे आहे.” 

मैथिली मात्र त्याच्या विरोधाला न जुमानता त्याच्याजवळ गेली आणि  संयमने चिडून  तिथेच असलेला काचेचा ग्लास हातातच फोडला. त्याचा हात रक्तबंबाळ झाला.
त्याने ग्लासची एक काच हातात धरली आणि ती स्वतःच्याच गळ्याला लावली.
आधीच त्याच्या कपळाला लागल्यामुळे  रक्तचे ओघळ वाहत होता. आता हाताला काच लागल्याने त्यातून ही रक्त कोपरापर्यंत ओघळत होते आणि त्याने त्याच हाताने स्वतःच्या गळ्याला काच लावली होती.
त्याचा तसा अवतार पाहून मैथिली घाबरली.

संयम- “ खबरदार माझ्याजवळ  येशील तर मी स्वतःचा जीव घेईन मैथिली! आत्ताच्या आत्ता निघ इथून तुझं तोंड ही पहायचं नाही मला आणि माझं ही तोंड तुला कधीच दिसणार नाही याची खबरदारी मी घेईन.
खोटं बोलण्याला आणि वागण्याला हद्द असते. तू ती आज पार केलीस.” तो त्याच स्थितीत बोलत होता.
त्याला काच त्याच्या गळ्याला रुतून तिथून ही रक्त येतय याचे ही भान नव्हते.
मैथिलीला कळून चुकले होते की संयमच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आहे. ती तिथून नाही गेली तर तो खरंच स्वतःच बरं वाईट करून घेईल म्हणून ती त्याला समजावत म्हणाली.

मैथिली-“ मी नाही येणार तुझ्याजवळ पण तू ती काच गळ्यावरून काढ संयम अरे रक्त येतय तिथून, मी जाते.” ती म्हणाली आणि तिने कसे बसे कपडे चढवले. 
संयमच्या हातातून काच कळून पडली आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. 
मैथिलीने घाबरून केतनला बोलावून घेतले.
त्याचा अवतार पाहून तो बेशुद्ध असून देखील तिची हिम्मत त्याच्याजवळ जायची झाली नाही.
केतन आला आणि संयमला पाहून काही तरी गंभीर झाले आहे त्याला कळून चुकले.

मैथिलीने डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतले.
दुपारी संयमचा भाऊ आला.
केतन मैथिलीच्या रूममध्ये गेला.
त्याला पाहून बॅग भरत असलेल्या मैथिलीने अधिरपणे विचारले.
मैथिली-“ संयम कसा आहे केतन? त्याला हाताला आणि कपाळाला खूप लागलं आहे. गळ्याला ही! मूर्ख कुठला स्वतःला किती दुखापत करून घेतली त्याने!” ती रडत बोलत होती.

केतन-“ मॅडम संया वेडा नाही स्वतःलाच इतकी दुखापत करून घ्यायला. तुमच्यात आणि त्याच्यात नक्कीच काही तरी गंभीर घडले असणार. मॅडम तो तापाने फणफणला आहे. कोणत्या अपराधाची शिक्षा देताय तुम्ही त्याला?” तो रागाने विचारत होता.
मैथिली-“ त्याच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. म्हणून तर मी त्याच्यापासून लांब राहत होते ना! मी त्याच्यापासून दूर जाणेच त्याच्या भल्याचे आहे.” ती डोळे पुसत म्हणाली.
केतन- “ काय बोलताय तुम्ही?” त्याने विचारले.

मैथिली,“हो मी जबाबदार आहे सगळ्याला! मी एक पांढऱ्या पायाची बाई आहे एक विधवा जीचा नवरा तिच्याच वाईट पायगुणामुळे लग्नाच्या सहाच महिन्यात अकाली गेला. मला हक्क नाही पुन्हा कोणाचा तरी जीव धोक्यात घालायचा!
तरी मी संयमकडे आकर्षित झाले. म्हणूनच संयमवर एकदा सोडून दोन वेळा जीव घेणे संकट आले.
आज तर तो माझ्यामुळे स्वतःचा जीव द्यायला निघाला होता. मीच अपशकुनी आहे. त्याच्यापासून मी दूर गेलेलेच बरे आहे.” ती रडत बोलत होती.

केतन-“ म्हणून तुम्ही संयमपासून  दूर पळत होता मॅडम? अहो कोणत्या जगात वावरताय तुम्ही? इतक्या शिकलेल्या असून असल्या गोष्टी मानता कमाल आहे तुमची? आत्ता सगळ्यात जास्त संयमला कोणाची गरज असेल तर ती तुमची आहे.
तुमच्या त्याच्यावरच्या प्रेमाची कबुली द्या मॅडम प्लिज!
त्याला माहित नव्हतं तोपर्यंत ठीक होतं पण आता त्याला कळले आहे की तुमचं ही त्याच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही खोटं बोलताय. तो महाहट्टी माणूस आहे मॅडम! तो स्वतःबरोबर काय करेल कोणीच  सांगू शकणार नाही.
प्लिज तुम्ही उगीच अंधश्रद्धा मनात बाळगून स्वतःच्या आणि त्याच्या प्रेमाचा बळी देऊ नका. या सगळ्यात संयमचा बळी जाऊ शकतो मॅडम तुम्हाला कळत कसं नाही.” तो कळकळून तिला समजावत होता.

मैथिली-“ उगीच काही तरी अभद्र बोलू नकोस केतन! मी त्याच्यापासून दूर गेले की काही होणार नाही त्याला!” ती ठामपणे म्हणाली आणि बॅग घेऊन निघून गेली.
कधी कधी माणूस काय चूक काय बरोबर याच्यापलीकडे जातो. त्याच्या मनात असणारी भीती त्याच्यावर ताबा मिळते आणि तो त्या भितीपोटी  चुकीचे निर्णय घेतो. मैथिली देखील याच मानसिक अवस्थेतुन जात होती. तिच्या मानत ती अपशुनी आहे आणि तिच्याचमुळे संयमवर संकटे आली आहेत ती त्याच्याजवळ राहिली तर त्याच्या जीवाला धोका आहे अशी अंधश्रद्धा घर करून राहिली होती.

तिला त्या भीती  पुढे काहीच दिसत नव्हते.
तिला हे ही कळत नव्हते की संयम सध्या ज्या मानसिक आणि शारीरिक अवस्थेतुन जात आहे त्याला सगळ्यात जास्त गरज तिची आहे.
उलट ती तिच्या मनातील अंधश्रध्देमुळे त्याचा विचार न करता निघून गेली होती.
संयम आणि मैथिलीची प्रेम कहाणी इथेच संपली होती का? पाहू पुढच्या भागात!
क्रमशः
भाग 13 इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!