ना उम्र की सीमा हो ( भाग 13 )

भाग 12 इथे वाचा

©स्वामिनी चौगुले
सहा महिन्यांनंतर…
आज सहा महिने झाले होते संयम गायब होऊन. तो कुठे आहे? कसा आहे? जिवंत तरी आहे की नाही कोणालाच माहीत नव्हते. त्या घटनेनंतर मैथिली पुण्याला निघून आली.
तिने राजीनामा दिला पण तिला सहा महिने नोटीस पिरेडवर काम करावे लागणार होते.
संयम केतन आणि  त्याच्या भावाबरोबर औरंगाबादला गेला होता. त्याला मॅनेजमेंटने एक महिन्याची सिक लिव्ह दिली होती. तो पुढचे पंधरा दिवस तिथे होता पण एक दिवस मला शोधण्याचा प्रयत्न करू नका अशी चिठ्ठी ठेवून गायब  झाला होता.

जो आज तागायत सापडला नव्हता. त्याच्या भावाने, केतनने आणि बाकी लोकांनी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सापडला नव्हता.
मैथिली मात्र त्याच्या आठवणीने आणि काळजीने तिळतीळ तुटत होती.
तिने तिचा राजीनामा मागे घेतला होता कारण केतन तिथेच कामाला होता आणि संयमबद्दल तिला काही माहिती मिळाली तर त्याच्याचकडून मिळू शकणार होती. केतन हा एकच धागा दोघांच्यामध्ये होता.
मैथिली तिच्या केबीनमध्ये तिच्याच विचारात मग्न होती की केतन तिथे आला.

मैथिली- “केतन काही कळले का त्याच्याबद्दल?” तिने विचारले.
केतन-“ नाही मॅडम काहीच कळले नाही अजून तरी. संयम खूप  हट्टी आहे मॅडम मी तुम्हांला सावध केले होते तेंव्हाच त्याच्याजवळ रहा म्हणून तो स्वतःला काय करून घेईल सांगू शकत नाही. पण तुम्ही नाही ऐकलं माझं! मला तर भीती आहे की तो जिवंत तरी…” तो पुढे बोलणार तर मैथिली खुर्चीतून उठली आणि त्याच्यावर रागाने ओरडली.
मैथिली-“ केतन काही होणार नाही त्याला! उगीच काही तरी अभद्र बोलू नकोस.”

केतन- “ मॅडम आपन सत्यापासून किती दिवस दूर पळणार आहोत. आपण कमी प्रयत्न केले का त्याला शोधण्याचे पण त्याचा काहीच पत्ता लागत नाही. तुम्ही त्या दिवशी त्याला झिडकारले नसते तर कदाचित माझा संय्या आपल्याबरोबर असता. आता पश्चात्ताप करून काहीच उपयोग नाही.” तो ही रागाने म्हणाला आणि निघून गेला.
मैथिली खुर्चीवर पुन्हा बसली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

‛मी खरंच खूप मोठी चूक केली त्यादिवशी त्याला झिडकारून! तो समोर होता तर वाटत होतं की मी त्याच्याशिवाय जगू शकेन पण मी चुकीची होते. मी नाही जगू शकत संयम तुझ्याशिवाय! माझ्या एका चुकीची आणखीन किती शिक्षा देणार आहेस तू मला! रोज मी तुला मिस करते. तू एकदा फक्त एकदा ये ना रे माघारी! केतन म्हणतो तसं तुला काही झालं नसणार. तू आहेस पण कुठे? ’ ती मनात स्वतःशीच बोलत होती.

 थोडावेळ  मैथिली आसवं ढाळत राहिली आणि तिच्या कामाला लागली. संयम कुठे होता हे कोणालाच माहीत नव्हते. केतन आणि त्याच्या घरच्यांना आता भीती वाटत होती की तो जिवंत तरी आहे की त्याने स्वतःच काही बरं वाईट करून घेतले.
पण मैथिलीला मात्र विश्वास होता की संयम असं काही करणार नाही तो कुठे तरी नक्कीच असेल.
संध्याकाळचे सहा वाजले  होते आणि ऑफिस सुटायची वेळ झाली होती.
मैथिली ही घरी जाण्याच्या तयारीत होती आणि तितक्याच केतन धावत पळत तिच्या केबीनमध्ये आला.

केतन- “ मॅडम ssss!” तो ओरडला.
मैथिली-“ केतन इतकं ओरडायला काय झालं.” तिने विचारले.
केतन- ,“ भाऊचा फोन आला होता मॅडम संयम सापडला पण…” तो पुढे बोलायचा थांबला आणि मैथिलीच्या काळजाचा ठोकाच चुकला.
मैथिली- “ काय? संयम सापडला? कुठे आहे तो? कसा आहे? आणि केतन पण काय? बोलायचा का थांबलास मला भीती वाटते रे बोल ना!” ती डोळ्यातले पाणी आडवत बोलत होती.

केतन-“ भाऊला फोन आला होता कुल्लूमधील हॉस्पिटलमधून की संयम हॉस्पिटलमध्ये आहे.” तो खाली मान घालून म्हणाला.
मैथिली- “ काय हॉस्पिटलमध्ये आहे? काय झालं आहे त्याला केतन?” तिने रडत काळजीने विचारले.
केतन- “ डिटेल्स माहीत नाहीत पण ही इज इन क्रिटिकल सिच्युएशन! त्याच्या मोबाईलमध्ये डॉक्टरांना भाऊचा मोबाईल नंबर मिळाला आणि डॉक्टरांनी फोन लावला भाऊला तेंव्हा कळले सगळे! भाऊ निघाला आहे पुण्याला तो आला की मी ही जाणार आहे त्यांच्याबरोबर तुम्ही येणार ना मॅडम?” त्याने विचारले.

मैथिली-“ काय संयम क्रिटिकल आहे? मी येणार का म्हणून काय विचारतोस! फ्लाईटची  तीन तिकिटे बुक कर आज रात्रीची.” ती डोळे पुसून म्हणाली पण तिला भोवळ आली केतनने तिला खुर्चीवर बसवले आणि पाणी दिले.
केतन- “ मॅडम तुम्ही ठीक आहात ना? मी बुक केली आहेत आज रात्री दहाच्या फ्लाईटची तीन तिकिटे तुम्ही घरी जा थोडा आराम करा आणि एअरपोर्टवर या!” तो काळजीने बोलत होता.
मैथिली- “ हुंम! बाकी काही कळले नाही का केतन? संयम क्रिटिकल आहे म्हणजे त्याला काही….” पुढचे शब्द तिच्या घशातच अडकून पडले. कंठ दाटून आला होता तिचा.

केतन- “आपण प्रत्यक्ष गेल्याशिवाय काही कळणार नाही. संया सापडला  आहे ना आपल्याला मग काही होणार नाही त्याला! तुमची तब्बेत ठीक दिसत नाही तुम्ही जा आराम करा.” तो काळजीने म्हणाला.
मैथिली घरी गेली आणि बरोबर नऊ वाजता ती एअरपोर्टवर हजर होती.
तिच्या आधीच केतन आणि संयमचा भाऊ देखील तिथे आले होते. सगळे फ्लाईटने कुल्लूला साधारण रात्री दोन वाजता पोहोचले. भाऊंनी टॅक्सी ड्रायव्हरला हॉस्पिटलचा पत्ता सांगितला आणि तिघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

मैथिली घाईघाईत रिसेप्शन जवळ जाणार तर तिने घातलेल्या ढगळ आणि पायघोळ  वनपीसमध्ये ती अडखळली ती पडणार तर भाऊंनी तिला सावरले.
भाऊ- “ सांभाळून मैथिली! पडली असतीस ना! तुम्ही हल्लीच्या मुली फॅशनच्या नावाखाली काय काय घालता तुम्हालाच माहीत.” ते काळजीने बोलत होते.
मैथिली- “ सॉरी!” 

 केतनने रिसेप्शनजवळ चौकशी केली आणि तिघे आय.सी.यु वॉर्डमध्ये पोहोचले.
तिघे संयमला काचेतून पाहत होते. तोपर्यंत डॉक्टर आले.
भाऊ- “ डॉक्टर मैं  संयम का बड़ा भाई हूँ। आपने मुझे ही फोन किया था। क्या हुआ है उसे” त्यांनी काळजीने विचारले.
डॉक्टर,“ अच्छा तो आप इनकी फैमिली है। आप इतने लापरवाह कैसे हो सकते है? आपका छोटा भाई कहाँ है क्या करता है? सब की खबर रखना  आपका फर्ज है ना! मैंने कितनी बार इसे समझाया की ट्रेकिंग इसके लिए जान लेवा है। संयम के लंग्ज बहुत कमजोर हो गए है। और इसके किए ट्रेकिंग जानलेवा है।

उसके लिए ट्रेकिंग पर जाना  याने खुदखुशी करना लेकिन उसने मेरी एक नही सुनी।  वो गाइड बन के ट्रेकिंग के लिए गया था और पिन पार्वती पॉइंट पर पहुँच कर बेहोश हो गया। कल  रात लोग इसे हॉस्पिटल लेके आए। मुझसे रहा नहीं गया और मैंने उसका मोबाइल चेक किया तो भाई के नाम से आपका नंबर मिला तो मैंने आपको फोन किया।” ते सांगत होते.
मैथिली- “ अब वो कैसा है डॉक्टर?” तिने विचारले

डॉक्टर,“ही इस इन क्रिटिकल सिच्युएशन! ऑक्सिजन लेवल बहुत लो है। ब्लड जम रहा था! बी.पी. बहुत ज्यादा है! हिमोग्लोबिन भी कम हो गया है।  पैर में भी गहरी चोट है! हमने उसे कल सुबह से ऑब्जर्वेशन में रखा है! कल सुबह तक उसे होश आना चाहिए। अभी वैसे तो वो स्टेबक है लेकिन ऐसे केसेस में पेशंट की तबीयत कभी भी बिगड सकती है उन्हे हाइपोथर्मिया का अटॅक आ सकता है। आप उन्हें देख सकते है। प्लीज उसे समझाकर यहाँ से ले जाईए। अच्छे घर का अच्छा लड़का है।” ते बोलून निघून गेले.

त्यांचे बोलणे ऐकून मैथिली तिथे खुर्चीवर बसली.इतकं सगळं होऊ पर्यंत पहाटेचे पाच वाजले होते.
केतन बुक केलेल्या लॉजवर बॅगा ठेवून आला.
संयमचा भाऊ संयमजवळ बसून होता.
मैथिलीची मात्र त्याच्याजवळ जाण्याची हिम्मत होत नव्हती. 
मैथिलीला तिच्या वागण्याचा पश्चात्ताप होत होता पण संयम तिला माफ करेल का?
पाहू पुढच्या भागात
क्रमशः भाग १४ इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

6 thoughts on “ना उम्र की सीमा हो ( भाग 13 )”

 1. झक्कास प्रेम कथानक, कथेत सुखांत व्हावा ही इच्छा

  Reply
 2. मनस्वी अभीनंदन ….
  नितांत सुंदर असे भाग
  ह्रदयास स्पर्श करणारे . पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटणारे कथानक सर्वच भाग मनोरम.
  लिहीतच रहाल
  प्रतिक्षेत पुढील भाग
  🙏🙏🙏

  Reply

Leave a Comment

error: Content is protected !!