ना उम्र की सीमा हो ( भाग 14)

भाग 13 इथे वाचा

©स्वामिनी चौगुले
मैथिली विचार करत होती.
‛ मी तुझ्यावर कोणते ही संकट येऊ नये म्हणून  तुझ्यापासून लांब झाले संयम आणि तू स्वतः बरोबर काय करत होतास गेल्या सहा महिन्यांपासून? रोज स्वतःच्या जीवाशी खेळत होतास. तुला काही झाले तर? मीच मूर्ख आहे मी नाही जाणार आता सोडून तुला! मला माहित आहे तू रागावला आहेस माझ्यावर! तू किती ही झिडकारले तरी किती ही रागावलास तरी मी नाही सोडणार तुला आता! मी ही नाही राहू शकत तुझ्याशिवाय!’ ती विचार करत होती.

तोपर्यंत  संयमचा भाऊ तिथे आला.
भाऊ- “ मैथिली हॉटेलवर जाऊन आराम करायचा होतास ना जरा” ते म्हणाले.
मैथिली- “ नाही भाऊ संयम डोळे उघडत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार. काय करून घेतलं आहे याने स्वतःचे!” ती विषण्णपणे म्हणाली.
भाऊ- “ मैथिली संयम माझा भाऊ आहे मी त्याला चांगलंच ओळखतो. तो महाहट्टी आहे. मी तुझ्यापुढे हात जोडतो त्याच्यावरचे तुझे प्रेम स्वीकार! मला केतनने सगळं सांगितले आहे. मैथिली अगं एकदा दूध पिताना भाजले म्हणून माणूस दूध पिणे तर सोडत नाही ना! तू इतकी शिकली सवरलेली आहेस आणि शकुन अपशकुन, पायगुण या  अंधश्रध्देमध्ये कशी अडकून पडू शकतेस?

मला मान्य की तुझा पहिला नवरा गेला पण त्याच आयुष्य त्या परमेश्वराने तितकच लिहले असेल त्यात तुझी काय चूक?  संयम तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझं देखील त्याच्यावर प्रेम आहे पण त्याला तुझ्यामुळेच काही तरी होईल या भीतीने तू त्याच्यापासून दूर गेलीस ना? पण तू दूर गेल्याने त्याने स्वतःच काय करून घेतले आहे पाहतेस ना? तो कोणाचच ऐकणार नाही स्वतःचेच खरं करणार. या वेळी तो कसा बसा वाचला आहे पण पुन्हा जर तो ट्रेकिंगला गेला तर जिवंत परत येणार नाही.

प्लिज त्याला वाचव! आमचा खूप जीव आहे गं त्याच्यावर आई-बाबांना तर यातले काहीच माहीत नाही त्याला काही झाले तर या वयात ते हा धक्का नाही सहन करू शकणार.” ते डोळ्यात पाणी  आणून बोलत होते.
मैथिली- “ प्लिज भाऊ तुम्ही असे हात नका जोडू. माझंच चुकलं. मी माझ्या भूतकाळाला कुरवाळत बसले. भूतकाळात घडलेल्या दुर्घटनेला स्वतःला जबाबदार धरत आले. मला माझ्या आई, बाबा, वहिनी, दादा सगळ्यांनी समजावले पण नाही समजले मला! संयम माझ्या आयुष्यात आला आणि मी घाबरले. त्याला काही तरी होईल म्हणून दूर झाले त्याच्यापासून! त्याला झिडकारले!

खूप मोठी चूक केली मी! पण मला आता कळून चुकले आहे की संयमपासून दूर जाऊन मी चूक केली. मी ही नाही राहू शकत त्याच्याशिवाय!” ती म्हणाली.
भाऊ- “ तुला तुझी चूक कळली ना झालं तर मग! पण संयम इतक्या सहज तुला नाही माफ करणार! तुझी परीक्षा आहे आता!” ते गंभीरपणे म्हणले.
मैथिली,“ चूक माझी आहे तर परीक्षा ही मलाच द्यावी लागणार ना! भाऊ तुम्ही काळजी नका करू मी मनवेन त्याला! त्याने मला माफ नाही केलं तरी तो आपल्याबरोबर तर नक्कीच येईल मी त्याला आता इथे राहून स्वतःच्या जीवाशी नाही खेळू देणार तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर!” ती म्हणाली आणि ते  मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवून निघून गेले.
★★★

दिवस उजाडला.
संयम  दुपारी बारानंतर शुद्धीवर आला.
डॉक्टरांनी त्याला चेक केले आणि तिघांना त्याला भेटण्याची परवानगी दिली.
संयम केतन आणि भाऊला पाहून खुश झाला
भाऊ-“ कसं वाटतंय तुला आता संयु?” त्यांनी काळजीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले.

संयम-“ मी ठीक आहे पण तुम्ही इथे कसे?” त्याने विचारले.
केतन- “ शोधलं  तुला एकदाचे!” तो तोंड वाकडं करत म्हणाला
संयम- “ केत्या तू नको सुरू होऊस आता…(तो पुढे बोलणार तर केतनच्या शेजारी उभ्या असणाऱ्या मैथिलीकडे त्याचे लक्ष केले आणि तो चिडला.)
हिला इथे का घेऊन आला आहात तुम्ही हिला जायला सांगा इथून!” तो ओरडला.

मैथिली-“ ओरडू नकोस उगीच, शांत हो आणि हे घेऊन यायला मी काय लहान नाही मी स्वतः आले आहे इथे! ठीक आहे मी नको ना तुला इथे तर मी बाहेर जाते. केतन त्याला काही तरी खायला घाल.” ती बाहेर जात म्हणाली.
थोड्या वेळात केतन सूप घेऊन आला आणि संयमजवळ गेला.
भाऊ बाहेर आले.

भाऊ- “ मैथिली तू हॉटेलवर जा आणि काही तरी खाऊन आराम कर. किती थकली आहेस तू मी आणि केतन आहोत इथे.” ते म्हणाले.
तितक्यात केतन तिथे आला.
केतन- “ संया झोपला आहे. भाऊ तू ही जा मैथिलीबरोबर आराम कर उगीच सगळ्यांनीच कशाला थांबायचे इथे! संध्याकाळी आराम करून या तुम्ही मग मी आराम करायला जातो. आता मी थांबतो.” तो म्हणाला आणि दोघांना ही त्याचे म्हणणे पटले.

मैथिली- “ बरं पण जेवण कर केतन तू ही उपाशीच आहे कालपासून!” ती म्हणाली.
मैथिली आणि भाऊ निघून गेले.
मैथिली प्रवास आणि रात्र भर जागल्याने खूप थकली होती.
तिला भूक ही खूप लागली होती.
ती हॉटेलवर येऊन फ्रेश झाली आणि तिने जेवण मागवून जेवण केले. थकव्यामुळे आणि पोटात भर पडल्याने  तिला लगेच झोप लागली.

तिला जाग आली ती भाऊंच्या दार वाजवण्याने. तिने घड्याळात पाहिले तर संध्याकाळचे सहा वाजले होते. ती खडबडून उठली आणि दार उघडले.
भाऊ टेन्शनमध्ये दिसत होते.
भाऊ- “ मैथिली, संयम हॉस्पिटलमधून निघून गेला आहे. केतनचा फोन आला होता. केतनला डुलका लागला आणि हा माणूस हॉस्पिटलचे बिल भरून पसार झाला आहे. आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल तिथे तो कुठे गेला असेल हे कळले तर बरं होईल.” ते घाबरून बोलत होते.

मैथिली-“ काय? भाऊ अहो याला डिस्चार्ज मिळालाच कसा? त्याची तब्बेत किती नाजूक आहे. संयमने आता कहर केला आहे. चला जाऊन जाऊन कुठे जाणार आहे तो इथे कुठे तरी घर असेलच ना त्याचे! तिथेच गेला असेल. या अवस्थेत कुठे जाणार तो.”
ती म्हणाली आणि वॉशरूममध्ये गेली आणि फ्रेश होऊन आली तिने वाकून तिची पर्स घेतली आणि कळवळली.
भाऊ- “ काय झालं मैथिली तू ठीक आहेस ना?” त्यांनी तिच्याजवळ जात काळजीने विचारले.

मैथिली- “ हो भाऊ मी ठीक आहे.” ती स्वतःला सावरत म्हणाली.
भाऊ- “ काय गं पुन्हा असाच ड्रेस घातला आहेस तू काल अशाच ड्रेसमुळे पडता पडता वाचलीस. किती ढगळ आणि पाय घोळ आहे हा ड्रेस! चल पण सांभाळून चाल.” ते काळजीने बोलत होते.
मैथिली काहीच बोलली नाही.
दोघे ही हॉस्पिटलमध्ये गेले.
तिथे रिसेप्शनजवळच केतन उभा होता.

तो रिसेप्शनिस्टशी काही तरी बोलत होता.
मैथिली आणि भाऊ तिथे पोहोचले.
रिसेप्शनिस्ट- “सॉरी सर मी तुम्हाला असे आमच्या पेशंटचे डिटेल्स नाही देऊ शकत.” ती नम्रपणे बोलत होती.
केतन- “ या संयाने वैताग आणला आहे. माझा थोडा डोळा काय लागला हा माणूस पसार झाला आणि आता ही बाई त्याचा पत्ता देत नाही.” तो वैतागून दोघांना पाहून बोलत होता.

मैथिली- “ भाऊ तुमच्याकडे त्या डॉक्टरांचा फोन नंबर आहे ना त्यांना फोन लावा आणि माझ्याकडे द्या.(त्यांनी फोन लावून मैथिलीकडे दिला.) हॅलो डॉक्टर मैं मैथिली दरेकर बोल रही हूँ । संयम दरेकरकी बीवी! संयम  डिस्चार्ज लेकर चला गया। आपके हॉस्पिटलने उसे छोडा कैसे? उसकी हालत अभी भी ठीक नही थी!” ती विचारत होती.
डॉक्टर- “ मैडम ये पहली बार नही की संयमने ऐसा किया है। वो जीद पर अड़ जाता है। उसने हॉस्पिटल को लिखित रूप से दिया है कि अगर हॉस्पिटल में से जाने के बाद  उसे कुछ हुआ तो इसका जिम्मेदार वो खुद होगा। हॉस्पिटल नही। तो हमे उसे छोड़ना पड़ा।” ते म्हणाले.

मैथिली “ ठीक है। बस आप मेरी एक हेल्प कर दो। मुझे संयम के घर का  पता चाहिए आप रिसेप्शन को कहकर वो मुझे दिलवा दीजिए इट्स अ रिक्वेस्ट!” तिने विनंती केली.
डॉक्टर- “ठीक है। आप फोन रिसेप्शनिस्ट को दिजीए।”ते म्हणाले.
ते असं म्हणाले आणि मैथिलीने रिसेप्शनिस्टला फोन दिला.
रिसेप्शनिस्टने डॉक्टरच्या सांगण्यावरून मैथिलीला संयमचा पत्ता दिला.

मैथिली-“ भाऊ तुम्ही आणि केतन हॉटेलवर जा आणि आराम करा मी संयमकडे जाते. मी त्याला आपल्याबरोबर येण्यासाठी नक्की तयार करेन. तो माझ्यावर नाराज होऊनच इथे आला आहे ना आता त्याला परत घेऊन जाण्याची जबाबदारी माझी!” ती ठामपणे म्हणाली.
भाऊ-“ तू एकटीच कशी जाणार मैथिली? संयाचे कान पिळायला हवेत आता, त्याने खूपच वैताग आणला आहे.” ती नाराजीने बोलत होते.

मैथिली-“ काळजी  नका करू माझी मी सगळं हँडल करेन आणि त्याचे कान पुण्यात गेल्यावर पिळा भाऊ!” ती म्हणाली आणि मैथिली हॉस्पिटलमधून मिळालेल्या पत्त्यावर निघाली.
संयम मैथिलीला समोर पाहून कसा रियाक्ट होईल?
पाहू पुढच्या भागात
क्रमशः भाग १५ इथे वाचा
©स्वामिनी चौगुले
सदर कथा लेखिका स्वामिनी चौगुले यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला अवश्य फॉलो करा. 

Leave a Comment

error: Content is protected !!