सावली प्रेमाची ( भाग 3 )

भाग 2 इथे वाचा

©अपर्णा देशपांडे
सायलीला डिव्हिजनल मॅनेजर HR ने बोलावले .
” मिस सायली ,राईट ?” 
” येस सर “
“आपल्या कंपनीला नव्या commutation सर्विसेस ची गरज आहे . साडे आठशे कर्मचारी हे अशी बस सेवा वापरतात . आता काही बसेस आहेत तरीही किमान वीस तरी हॅचबॅक आणि सेदान पाहिजेत . तर लवकर सर्व्हे कर आणि संध्याकाळ पर्यंत रिपोर्ट कर .” 

अशी संधी !! सायलीने ताबडतोब AT&T च्या ऑफिस ला फोन केला , आणि आपल्या कंपनीचा रेफरन्स दिला .
” हॅलो ,  आनंद मोकाशी हिअर !!”
तशी कंपनीच्या कामात ती फारच प्रॉम्प्ट आणि ठाम होती ..पण आता इथे मात्र तिची बोबडी वळली .
” हॅलो , सायली बोलताय ,मी मोकाशी ,..सॉरी GBIS .. सर मी ….”
हाय रे देवा , का परीक्षा घेतोएस ?

” हाय मिस सायली . कूल डाउन ! बोला , कसा फोन केला ? “
तोपर्यंत ती सावरली होती .
” सर , आमच्या कंपनी ला 20 गाड्या हव्या आहेत . मी तुमच्या कंपनीचे नाव सुचवले . तर आम्हाला …
“थॅंक्यु सो मॅच ,पण त्यासाठी मीटिंग करावी लागेल मिस …सायली .” त्याने पटकन बोलून टाकले . 
” मी येते , ऑफिस ला “
” ड्रायव्हर पाठवू ? “
” न ..न नको !! मी कंपनीच्या गाडीने येतेय ” 

आनंद उत्साहात उठला .
बॉय ला सांगून एक गुलाबाच्या फुलांचा बुके मागवला .
स्वतःच कपडा घेऊन साफसफाई करायला लागला …आज पहिल्यांदा सायली त्याला ‘ आनंद मोकाशी   म्हणून भेटणार होती . 
सायली आली .
तुकाराम ने केबिन चे दार उघडले ..
” या सायली मॅडम. वेलकम “

” प्रशांत ? तुझी एवढी हिम्मत की आज साहेबांच्या केबिन मध्ये साहेब बनून बसलाय ? त्या आनंद मोकाशीला किती बदनाम करणार तू अजून ? माझ्या मागे काय लागतोस ? इथे काय बसतोस ..थांब तुला न ..”
” सायली , सायली प्लिज..प्लिज ओरडू नकोस ,सगळं ऑफिस इथे गोळा होईल …..”
ती मोठ्या ने हसायला लागली ..
” नाटक काय फक्त तुम्हालाच करता येतं का मिस्टर आनंद ? ” 

“ओहहह !! काय झाशीची राणी आहेस ग !! जाम टरकलो मी !! सॉलिड आहेस हं ! ” तो एकटक तिच्याकडे बघत होता … राहिला पण  नजरेत नजर मिळवायची होती , पण पापण्यांनी संप पुकारला होता ..नजर उचलेचना . 
” लग्न ठरले म्हणून खोटं बोललीस न ?” 
” नाही ..ठरलंय .लग्न .”
” काय ?”
तिने पटकन वर पाहिले तो खट्याळ नजरेने बघत होता ..

आई ग s s सगळ्या अंगावर एक वेगळाच गोड रोमांच उठला ..हे कांय होतंय ? तिला वास्तवाचे भान आले , आणि म्हणाली ,” आम्हाला तुमच्याकडून 20 गाड्या हव्या आहेत .”
” दिल्या …सगळ्या दिल्या ..”
” ड्राइवर सहित पर मंथ कसे चार्जेस असतील ? ” मला सगळं कॉस्टिंग द्यावं लागेल 
“…….”
” मिस्टर  आनंद ?”
“………”
एका वेगळ्याच जगात गेला होता आनंद . एकदम खुश.

सायली मुळे त्याला खूप मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते ,दोन वर्षांसाठी . 
यानंतर दोघे वारंवार भेटू लागले . 
दोघेही एकमेकांना पसंत होते .
आनंद ने कितीदा तिला प्रपोज करायचा प्रयत्न केला , पण हिम्मतच होत नव्हती . 
” सायली , “
” हं ? बोल न “

”  कंपनीला मालकिणीची गरज आहे आता .”
” अच्छा ? मग आण ना ..मालकीण !!” ती मुद्दाम चिडवत म्हणाली.
” मालकीण बाई तयार आहेत ? GIBS सोडून यायला? ” 
” त्यासाठी AT&T ला आमच्या घरी यावे लागेल .” 
” बघ हं उद्याच येईल मी “…तिच्या डोळ्यात खोल पहात म्हणाला ,” येऊ न? “

” असे नको पाहुस ,  मला कसं तरी….” ती जातेय पाहून त्याने पटकन तिचा हात पकडला .
” अ हं ..आता उद्याच भेटू ..घरी ” आणि ती हात सोडवून पळाली.
*******
रविवार चा दिवस म्हणून सायली आणि मनू निवांत होत्या .
अचानक बेल वाजली तर दारात आनंद ! 
” तू ? इथे ? खरच आलास की ! “
” मग !! मला चांगलच माहितेय तुझं घर !! काल म्हणालो न ,येईन म्हणून ?”

” कोण ग सायली ?” आई ने आतून विचारले . 
” मी , आनंद मोकाशी ! ” त्यानेच उत्तर दिले . 
आई भर भर बाहेर आली .
” या न . या , बसा ..पाणी आण ग मनू ..” 
आतून बाबांनी हाक मारली .” प्रमिला s s “

सायलीचे बाबा काही वर्ष आजारी होते आणि गेल्या दोन वर्षांपासून तर झोपूनच होते .
त्यांचे कमरेखाली पूर्ण शरीर लुळे  पडले होते .
आई धावतच आत गेली .
” कोण आलंय प्रमिला ? “
” अहो , मोठ्ठ्या कंपनीचे मालक आहेत ते . आनंद मोकाशी .” 

” आनंद मोकाशी ? संजय मोकाशींचा मुलगा ? ” ते जोरात ओरडले , तसा आनंद आत आला . 
” तू ..संजय मोकाशीचा मुलगा ? “
” हो , तुम्ही ओळखता ?”
” सायली , यांना सांग आत्ताच्या आत्ता इथून जा !!! “
” बाबा , “
” सांगितलं न एकदा ? आत्ता बाहेर काढा ह्याला .”

” काय झालं बाबा ?”
“…..”
” It’s ok  , ठीक आहे सायली ,मी जातो , पण नेमके कारण मला समजले पाहीजे. ”  तो शांत पणे निघून गेला .
” काय झालं बाबा ? तुम्ही अचानक ..
“” ह्या मुलाला तू पुन्हा कधीच भेटायचं नाही !!!”
बाबांचे बोलणे ऐकून अजिबात न चिडता आनंद निघाला .
” आनंद , मी ..

” इट्स ओके सायली , उगाच नाही रागावले ते . काहीतरी कारण असेल. नीट शांतपणे बोल त्यांच्याशी , उद्या फोन वर बोलू , पण भेटायचं नाही सध्यातरी .” 
सायली सुन्न होऊन घरात आली .
मनू तर नुसती पुतळ्या सारखी उभी होती . 
” दीदी , सॉरी यार ..असं का वागले बाबा ? ” 
” मी बोलते त्यांच्याशी , आत्ता नाही , नंतर .”  

सगळा दिवस सायली संयम ठेवून होती . 
”  आई , बाबा आणि संजय मोकाशी यांचं नेमकं काय झालं होतं ? या आधी तू कधीच बोलली नाहीस ? ” 
” माहिती आहे मला सगळं , पण तू त्यांच्याशीच बोल . ” 
********
सायली ला आतून उन्मळून येत होतं , इतक्यात आनंद चा कॉल आला . थरथरत्या हातानेच तिने कॉल घेतला . 
” सायली , काळजी करू नकोस .ठीक होईल सगळं . “
” ……”
” बरं मला सांग , काही वर्षांपूर्वी बाबा मुंबई ला कामाला होते ? ” 
” हो , जवळपास दहा वर्षांपूर्वी . पण नंतर  आम्ही इथे नाशिक मध्ये आलो , करण इथे आमचं वडिलोपार्जित घर आहे …..का ? “

” नाही ग , आमच्या मालकीण बाईंना सन्मानाने आणायचं तर हे सगळं करावं लागेल नं ! ” तो हसला .
” तू ऑफिस मध्ये असशील न , ठेव फोन ” 
*********
थकून सायली घरी आली . आता कंपनी ची बस होती त्यामुळे तसे सोपे झाले होते . 
” काय म्हणताय बाबा , औषधे घेतली का वेळेवर ? मी घेतलीये अपॉइंटमेंट डॉ . खाद्रा ची . ते एक महिन्या करता भारतात येत आहेत आत्ता ऑगस्ट मध्ये. तुम्हाला नक्की बरं करतील ते बाबा .”

” माझा सगळा पैसा ह्या ट्रीटमेंट मध्येच गेला बेटा . मी तुमचा अपराधी आहे ,.”
” बाबा , ही भाषा कुठून आली अचानक ? मी MBA HR झालेय , मनू आत्ता hotel and tourism मॅनेजमेंट पूर्ण करतेय …ते तुम्हीच करवलं न? आम्ही दोघी सक्षम आहोत आता . सगळं एज्युकेशन लोन आम्ही फेडू . तुम्ही काही काळजी करू नका .” 
” प्रमिला , तिची उपम्याची प्लेट इथेच आण ग . भूक लागली असेल पोरीला .” 
मनू पण हळूच येऊन बसली .

” तुम्हाला माहितेय आधी आपण मुंबई ला होतो . मी ‘मोकाशी कन्स्ट्रक्शन ‘ मध्ये मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह होतो . बाराव्या मजल्याचे काम सुरू होते . माझ्या सोबत एक क्लाएंट होते . त्यांना आमच्या टाऊनशीप  मध्ये फ्लॅट बुक करायचा होता . मी त्यांना फ्लॅट दाखवत होतो . आम्ही गॅलरीत आलो आणि  पूर्ण  गॅलरीच कोसळली . बाराव्या मजल्यावरून तो सरळ खाली पडला ,आणि जागीच …” त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या . 
” तुम्ही बाबा ? तुम्ही ..” मनू चाचरत म्हणाली .
” मी माहीत नाही कसा ,पण एका बारीक लोखंडी बार मध्ये आधी अडकलो , तो वाकला ,आणि मी आपटत आपटत खाली आठव्या मजल्याच्या तिथून बाहेर आलेल्या सळाकांवर पडलो . “

” मग ?”
” जाग आली तर हॉस्पिटलमध्ये!! समोर तुमचा रमेश मामा आणि आई ! अनेक ठिकाणी हाडं मोडले होते . जवळपास अडीच महिने मी हॉस्पिटलमध्ये होतो . लाखो रुपये खर्च झाले .” 
” मग कंपनीने भरपाई ..”
” पाच हजार !! माझ्या उर्वरित आयुष्याची किंमत !! “
” माझ्या कडून लढायला तुझा मामा बिचारा एकटा …मालकाने अक्षरशः हाकलून लावले त्याला . ” 

एक दिवस पेपर मध्ये बातमी आली तेवढंच . बाकी मालकाने मॅनेज केलं सगळं .”
”  आणि मालक म्हणजे संजय मोकाशी ….बरं  सायली , आई पहिल्यांदा बोलली .. 
” आधी थोडं थोडं चालता येत होतं ,मग हळू हळू जाणिवा बंद होत गेल्या .आम्ही कितीतरी डॉक्टर पालथे घातले . तुम्ही एकट्या घरात रहायच्या ,आम्ही हॉस्पिटलमध्ये च असायचो . मग मुंबईत रहाणे अशक्य झाले . इथे निदान वर छत तरी आहे .” 
”  माझं वाटोळं करून तमाशा बघणाऱ्या त्या संजय मोकाशीला  मी कधीच माफ नाही करणार !!”

” तुम्ही केस केली कंपनी वर ? तुम्हाला कायद्या प्रमाणे  नुकसानभरपाई मिळायलाच हवी  बाबा .” 
” आधी खूप खेटे घातले कोर्टात , पण नंतर ताकद नाही राहिली .  मोकाशी एक बडी आसामी बेटा . त्यांच्या पुढेआम्ही हार मानली. त्या क्लाएंटच्या नातेवाईकांनी पण केस केली . त्यांना मिळाले बहुतेक कंपेनसेशन .
” दीदी , आपण लढू केस ! नक्की जिंकू बघ  . “
” नक्की  मनू .” 
*********
क्रमश:
काय होईल बाबांच्या केसचे? आनंदला हे समजल्यावर त्याचे आणि सायलीचे नाते कसे वळण घेईल? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी वाचत राहा कथेचा पुढील भाग… आपल्याच ‘माझी लेखणी’ पेजवर
©अपर्णा देशपांडे
सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करू नये.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …

4 thoughts on “सावली प्रेमाची ( भाग 3 )”

Leave a Comment

error: Content is protected !!