शुगर

© तृप्ती देव
“आई! आई!” म्हणून संकु आवाज देत होता.
आई घर कामात व्यस्त. परत संकूनी आवाज दिला.
“आई लवकर बाहेर ये. मी काय आणलं बघ?”
“काय रे संकेत? थांब मी आलेच.” म्हणून ती स्वयंपाकघरातून आपली कामं सोडून बाहेर आली आणि घराचा दरवाजा उघडला. आणि पाहते तर काय बाहेर, संकेत एक छोट्याश्या कुत्राच्या पिल्लाला हातात घेऊन बाहेर उभा होता.

“अरे हें काय? कशाला आणलं हें पिल्लू? जा जिथून आणलं तिथेच सोडून ये. जा पटकन . पळ   ….नको आणून त्याला आपल्या घरात.” असं म्हणून आई त्याला रागावतच  होती.
पण संकेत आईच एक तो कुठे आहे !
“मला नही जमणार परत त्याला सोडून यायला.मी त्याला घरातच ठेवणार माझ्या सोबत..”
“अरे मीं नाही त्याला सांभाळणार बरं. तू शाळेत गेल्यावर.त्याचं कोण करेल???”

“ये आई नाही ग ! बघ ना, किती छोटंसं क्युट किती गोड आहॆ. ग ते!”
अगदी थोड्यावेळातच त्या पिल्लाला संकेतचा लळा  लागला.
अगदी त्याच्या हातात तो आईच्या कुशीत स्वतःला सुरक्षित असल्या सारखं समजतं होता.
संकेत त्या पिल्लाचे लाड करण्यात इतका मग्न होता. त्याचं माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं.
आणि त्याने हट्ट च केला मीं ह्याला सोडून नाही येणार. माझ्या जवळच राहणार तो आता. माझा मित्र म्हणून. त्याच्या हट्टापुढे मला झुकावंच लागलं.

त्या पिल्लापेक्षा संकेतच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ते छोटंसं पिल्लू माझ्या मनाजवळ केव्हा आलं ते कळलच नाही.
नाही नही म्हणत, संकेतसाठी त्याचा सांभाळ करायला लागली आणि एक दिवस त्याचं बारसही झालं.
त्याचं नाव ही ठेवलं “शुगर ” कारण ते दिसायला खूपच गोड होतं.
हळूहळू….. शुगर केव्हा घरचा सदस्य बनला आम्हाला कळलच नाही.
त्यांचे काळे भोर केस उंच. असा चेहऱ्यावरवरचे तांबूस रंगाचे  केस.

गब्बू गब्बू असणारा” शुगर ” घराची रखवाली करायला लागला.
कोणी दरवाज्यावर आलं तर त्यांच स्वागत “शुगर”च करायचा.
कधी भूंकून तर कधी मायेने जवळ जाऊन प्रत्येकाला आपलस करायचा..
शुगरची भीती होती सगळ्यांना. सहसा पटकन कोणी अनोळखी घराच्या दरवाज्या आता येण्याचं धाडस करत नव्हतं.
पण त्याचा लळा मात्र सगळ्यांनाचा होता.

तो लहान होता तर आजूबाजूला असेलेलं सगळे लहान मुलं त्यांच्या सोबत खेळायला यायचे.
कधी बिस्कीट तर कधी काही खायला घेऊन यायचे.
लहान मुलांचा तर तो चाहता झाला होता आणि शुगरला खूप मस्ती करायला आवडायचं.
आपण जी भाषा बोलायचं ती त्याला सहज कळून जायची.
रागवलं तर ऐकून घ्यायचा आणि प्रेमानं बोलवलं तर समजवून घ्यायचा.
कधी कधी वाटायचं त्याला तर वेळ पण कळायची.

संकेत शाळेतून केव्हा येतो. तर त्यांची वाट पाहत दरवाजा जवळ बसून राहायचा.
त्याचा येण्याचा आवाज आला की पटकन शेपटी हालवत धावत जायचा.
जोपर्यंत संकेत लाड नाही करणार, जवळ नाही घेणार तो स्वस्थ नाही बसायचा.
संकेतचा हट्ट होता म्हणून मी त्याला घरात ठेवलं होतं. पण शुगर माझ्या मनात कायमचा घर करून गेला.

हळू हळू दिवस जसे जात होते, तसं वाटायला लागलं शुगरला सांभाळायचं म्हणजे आपल्यावर कायमचं बंधनच आहॆ.
कारण त्याला सोडून कुठे जाता येणार नाही. मग त्याला कोणाकडे ठेवायचं? अचानक कुठे जावं लागलं तर कसं होणार.????
शुगर कुठे राहिल??? त्यांची काळजी कोण घेईल??
मग निर्णय घेतला की त्याला कोणाकडे तरी सोडून यायचं कायमचं. आपल्याला त्रास होईल पण लवकरच आपण बंधनमुक्त होऊन जाऊ.
मग एक दिवस ओळखीच्यांकडे संकेतला न सांगता त्याला हळूच सोडून आलो.

सोबत त्त्याच्या खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या वस्तू पण देऊन आलो, ज्यांची सवय त्याला होती. म्हणजे आमच्यापासून  दूर गेल्याचा त्याला भास होणार नाही.
आपलं नातं एवढंच होत असं समजून स्वतःला समजूत घातली आणि आम्ही निश्चिंत झालो.
फक्त एक दिवस झाला असेल. आणि दुसऱ्यादिवशी दारा समोर” शुगर” दिसला.
ज्यांच्याकडे ठेवला होता त्यांनी परत आणून सोडला आणि म्हणाले याला सांभाळणं सोपं नाही आहे. आम्ही नाही सांभाळू शकत याला आणि परत त्याला आम्ही घरात घेतलं.
तुटलेलं बंधन परत जुळलं.

जसं शुगर ठरवूनच आमच्याकडे आला होता. राहीला तर आमच्या सोबतच. नाहीतर कोणाकडे राहणार नाही. असंच काही..
परत बंध जुळेल.
असं करत काही काळ निघून गेला आणि परत एकदा दुसरीकडे सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.
संकेत पण तयार नव्हताच, पण समोर कोणताच पर्यायही नव्हता.
कारणही तसंच होतं. दुसरीकडे राहायला जायचं. तिथे जागा लहान मग शुगर ला कस ठेवणार.?
घराचं शिफ्टिंग झालं . दोन तीन दिवस सहज निघून गेले. कामाच्या व्यस्ततेत. पण ते दोन तीन दिवस रोजच शुगरची आठवण यायची..

त्याचा आवाज त्याचा भास. सारखं जाणवत होता. तो आपल्या आजूबाजूला आहेच असा स्पर्श होत होता.
तो घरात नव्हता पण तो सारखा समोर दिसत होता आणि मग नं राहून निर्णय घेतला त्याला परत आणण्याचा.
तीनचार दिवस दूर असलेल्या शुगरनी आम्हाला बघितलं आणि आमच्या आवाजावरून तो नुसता उच्छल कुद करायला लागला. आणि जोर जोरात ओरडायला लागला.
जणू त्याला खूप आनंद झाला. आम्ही आल्याने तो त्याच्या भावना व्यक्त करत होता. जणू तो आमचीच वाट बघत होता.
पण ज्याच्याकडे शुगरला सोडलं तो सहजतेने परत दयायला तयारच नव्हता…

मग आम्हालाच त्यांच्या पाया पडावं लागलं, विनवणी करावी लागली आमचा शुगर आम्हाला परत दे . “आम्ही त्याच्या शिवाय राहू शकणार नाही तोही आमच्या शिवाय”. खूप मिन्नते केली..मग त्याने ऐकलं.
जसं त्यानी त्याच्या गळ्यातली साखळी सोडली तसा तो आमच्याकडे वेगाने धावत आला आणि आम्हाला बिलगला.
त्याच्या डोळ्यातही आनंदाचे अश्रू  होते.
प्राण्यांनाही भावना असतात. माणसाची ओळख असते. कोणताही द्वेष न करता फक्त  प्रेम करणारे, ते मुके  प्राणी. माणसाला कधीच समजले नाही त्याचं प्रेम. आपण एकदा लळा लावला की ते कधीच आपल्याला विसरत नाही..

 त्याला जवळ घेतलं. त्याला कुरवाळलं.
“अरे आम्ही कुठे बाहेर जाऊ तर तुला कोण सांभाळणार या भीतीपोटी तुला आमच्यापासून दूर केलं. तुला सोडून आम्हाला जाता येत नाही. तुझी काळजी कोण घेईल हया काळजीने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.”
आणि परत तो आमच्या सोबत आनंदाने घरी आला.
जणू तो आमच्यापासून दूर झालाच नव्हत्ता असच वाटत होत…
“आपलं कोणतं नातं आहे रे हे कोणतं ऋणानुबंध आहे हे आत्म्याचे नात आहे” म्हणूनच  तुला आमच्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही..
हे नात्याचं बंधन कोणाला तोडता येणार नाही. तू आमचा आहे आणि आमचाच राहणार आहे.

नवीन घरातही तो पूर्वीसारखाचा रुळून  गेला.
आई एक एक गोष्ट आठवत होती.  “शुगर”  एक महिन्याचं असताना घरात आल्या पासून आतापर्यंत चा त्यांचा प्रवास … एकेक दिवस  समोर येत होता.
हातामध्ये शुगरला धरून रडत होती. त्याच्या अंगावरून हात फिरवत होती.असं वाटतंय तू परत धावून येशील.
“उठ! उठ शुगर उठ ! तुला काय झालं उठ डोळे उघड बघ. काय झालं तुला? उठ शुगर”
पण शुगर उठतो कुठे? तो आता कायमचा झोपून गेला होता. सगळ्यां बंधनातून कायमचा अचानक  मुक्त करून गेला होता.

दहा वर्षाचा त्याचा हा काळ जो आमच्यासोबत त्याने घालवला होता  तो सगळा डोळ्यासमोरून जात होता.
त्याच्या आठवणीनीं मनाला डोळ्यात अश्रू आणत होत्या. तुझा आणि आमचं रक्ताचं नातं नव्हतं पण तू आमचाच होता. तू कायम आमचाच राहशील….तू केव्हा आमचा झाला ते कळलच नाही .
तुला पाळताना नाही कळलं तू जेव्हा सोडून जाशील तर आम्हाला एवढा वेदना होतील. शुगरच्या डोक्यावरून शेवटचा हात फिरवत त्याला रिती  रिवाजाप्रमाणे घरच्या सदस्यासारखंच शेवटचे संस्कार केले.. 
किती वेळा तुला आमच्या पासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला. पण त्या वेळस नाही कळलं की तुला ही वेदना होत असतील. तुलाही भावना असतील..
पण तू स्वतःहून आज आमच्या पासून कायमचा वेगळा झाला. तुझ्या त्या गोड “आठवणीतून “आम्ही कधीच मुक्त होणार नाही.
© तृप्ती देव

सदर कथा लेखिका तृप्ती देव यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!