दृष्टी

© डॉ राजेश शांताराम जोशी
ब-याच दिवसांनी माधव अमेरिकेतून भारतात आला होता. पंधरा दिवसांचा दौरा होता त्याचा मुंबईतील काही कामे आठवडाभरात आटोपून आणि पुण्यातल्या काही मित्रांबरोबर एक दिवस स्नेहमिलनाचा कार्यक्रम करून ठरल्याप्रमाणे साताऱ्यात दोन-तीन दिवस घालवायचेच अशा इराद्याने तो सातारला येणार होता.
त्यानं ठरवलं होतं की आल्यावर लगेचच बाबासाहेब आणि माईना भेटायचं. अहो मानलेले असले तरी आईवडीलच होते ते त्याचे. नाहीतर स्वतःला मुलगा असलाना कोण एका अनाथ मुलाच्या शिक्षणाचा खर्च करेल आणि तोही इंजिनिअरिंगपर्यंत त्यानंतर देखील माधवला अमेरिकेत जाण्यासाठी त्यांनीच प्रोत्साहन दिले होते.

माधव इतक्या लांब जायला सहजासहजी तयारच नव्हता. तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते ‘पोरा, नासासारख्या जगप्रसिद्ध संस्थेत काम करण्याची संधी तू सोडू नकोस. भावनेच्या भरात तू चुकीचा निर्णय घेऊ नकोस. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते हे लक्षात ठेव. शेवटी त्यांचे म्हणणे ऐकून माधव अमेरिकेला गेला आणि नासामध्ये संशोधन कार्य करू लागला होता. परंतु तीन वर्ष प्रोजेक्टचं काम आणि त्यानंतर कोरोना निर्बंध त्यामुळे त्याला भारतात परत येणं शक्यच झालं नव्हतं. जी काही भेट व्हायची ती आभासी माध्यमातूनच त्यांच्या मुलाकडून, रविकडून, कधीकधी ख्यालीखुशाली कळत होती. आता मात्र त्यांची प्रत्यक्ष भेट होणार होती आणि त्यांना सरप्राईज द्यायचं म्हणून मुद्दामच माधवनं कुणालाच कळवलं नव्हतं.

भारतातली खरी परिस्थिती कळावी म्हणून त्याने एसटीनेच जायचं असं ठरवलं सातारच्या स्टँडवर तो उतरला आणि लगेचच रिक्षा करून बाबासाहेबांच्या बंगल्यावर जायला निघाला. रिक्षातून त्याने बाहेर पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की भारतातली लहानलहान शहरेसुद्धा फार बदलली आहेत. सगळीकडे चकचकीत रस्ते, पॉश मोटारी, महागडे मोबाईल दिसत होते. लोकांचं लक्ष एकमेकांकडे आणि समोर कमी होतं आणि हातातल्या मोबाईलकडे जास्त होतं. माधवच्या मनात विचार आला पाश्चात्य आणि आधुनिक संस्कृतीतल्या वाईट गोष्टी किती लवकर उचलतो आपण आणि चांगल्या गोष्टी?

त्या देतो सोडून परदेशातील संस्कृती आपण स्वीकारली पण तिथली स्वच्छता, टापटीप, तिथल्या नागरिकांचे वागणं, बोलणं या चांगल्या गोष्टींचा स्वीकार आपण कधी करणार कुणास ठाऊक,’ असा विचार करता करता बाबासाहेबांचा बंगला आला आणि रिक्षावाल्याच्या हाकेने माधवची तंद्री भंगली. तो रिक्षातून उतरला आणि रिक्षावाल्याला त्याने पैसे दिले. उरलेले सुट्टे पैसे त्याने प्रामाणिकपणे माधवला परत केले. माधवच्या मनात परत विचार आला चला, थोडा तरी चांगुलपणा शिल्लक आहे म्हणायचा. नाहीतर सुटाबुटातला माणूस पाहिला की लुटायला टपलेले असतात हे लोक’.

बंगल्याचं फाटक उघडून माधव आत शिरला आणि समोरचं दृश्य बघून हादरलाच. ‘रविराज’ या बंगल्याच्या पाटीच्या जागी नवीन पाटी होती ‘रवि अनाथाश्रम माधवला काहीच समजेना. हे काय झालं? कसं झालं? बाबासाहेबांनी किती कौतुकाने हा छान बंगला बांधला होता आणि त्याला आपल्या मुलाचं नाव दिलं होतं. माधवसुद्धा होस्टेलमधून उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत कितीतरी वेळा इथे येऊन राहिला होता. इथल्या रम्य आठवणी त्याच्या मनात नेहमीच रंजी घालत. त्यामुळे असं काही होईल अशी कल्पना त्यानं स्वप्नात देखील केली नव्हती.
माधवनं खिन्न मनानं दरवाज्यावरची बेल वाजवली. एका मध्यमवयीन महिलेने दार उघडलं. माधवने त्यांना नमस्कार केला. त्या बाईनी माधवला आत बोलवून बसायला खुर्ची दिली. आतल्या खोल्यांमधून मुलामुलींचा एकच गलका येत होता, त्यामुळे माधव चुळबुळत होता.

ते पाहून त्या बाई आत जाऊन मुला-मुलीवर ओरडून, त्यांना शांत बसवून परत बाहेर आल्या. त्यांनी माधवला विचारलं ” कोण तुम्ही? काय हवंय तुम्हाला?” बाबासाहेब आणि माई इथेच राहतात ना? ” माधवने मोठ्या आशेने विचारलं. बाई उतरल्या नाही. आता ते इथे राहत नाहीत त्यांनी अत्यंत कमी किमतीत आमच्या अनाथाश्रमाला हा बंगला विकला आहे दोन वर्षांपूर्वी आता ते वृद्धाश्रमात राहतात. माधववर तर जणू आभाळच कोसळलं.
त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. “बरं, त्यांचा पत्ता, फोन नंबर काही आहे का? ” त्यानं विचारलं. ” नाही व्यवहार झाल्यानंतर त्यांनी काही संपर्क ठेवला नाही. पण थांबा. त्यांच्या मुलाचा नंबर आहे. तो देते मी. अहो त्यांनीच तर सर्व पुढाकार घेऊन हा व्यवहार पूर्ण केला ना आणि त्यानंतर लगेचच ते मुंबईला निघून गेले. पण मी त्यांचा नंबर घेऊन ठेवला ” असं म्हणत त्या बाईनी एक नंबर कागदावर लिहून तो चिटोरा माघवेकडे दिला.

माधव जड पावलांनी बंगल्याचं फाटक उघडून रस्त्यावर आला.
माधव विचार करू लागला रवि पक्का व्यवहारी निघालास रे स्वतःचं नाव लावून बंगला अनाथाश्रमाला विकलास आणि आई-वडिलांना पाठवून दिलंस वृद्धाश्रमात कुठे फेडशील हे पाप ? आई-वडील आयुष्यभर या मुलांसाठी खस्ता खातात आणि अशी कशी वागतात ही मुलं? ‘ माधवनं विचार करत करत रविला फोन लावला. बराच वेळ त्याचा फोन वाजला पण त्यानं फोन उचललाच नाही. माधवनं दुसऱ्यांदा फोन लावूनसुद्धा रविनं फोन उचलला नाही. माधव देखील इरेला पेटला होता. त्यानं रविला मेसेज केला आणि वृद्धाश्रमाचा पत्ता त्याला विचारला, थोड्या वेळानं त्याचे उत्तर आलं मी मीटिंगमध्ये आहे. नंतर बोलेन, पण नशीबा वृद्धाश्रमाचा पत्ता त्याने पाठवला होता.

तो पत्ता पाहून माधवनं रिक्षा पकडली आणि तडक तो वृद्धाश्रमाकडे निघाला. वाटेत त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरूच होतं. ‘ आता काही झालं तरी मी बाबा आणि माईना इथे ठेवणार नाही. त्यांना माझ्याबरोब अमेरिकेला घेऊन जाणार. आता राहिलं काय त्यांचं इथे त्या कृतघ्न मुलाशिवाय? पण बाबासाहेबांनीसुद्धा मला आपलं समजून कळवायला नको का? ते दोघेसुद्धा असे कसे वागले माझ्याशी?
रिक्षा वृद्धाश्रमाच्या फाटकापाशी थांबली आणि माधवची तंद्री भंगली, थोडा राग, थोडं दुःख आणि थोडी निराशा अशा संमिश्र भावनेने माधवने उधाश्रमात पाऊल टाकलं तिथलं एकंदर वातावरण आणि परिसर बघन त्याला माधव विचार करू लागला रवि, पक्का व्यवहारी निघालास रे. स्वतःचं नाव लावून बंगला अनाथाश्रमाला विकलास आणि आई-वडिलांना पाठवून दिलंस वृद्धाश्रमात कुठे फेडशील है पाप ?

आई-वडील आयुष्यभर या मुलांसाठी खस्ता खातात आणि अशी कशी वागतात ही मुलं?’ माधवनं विचार करत करत रविला फोन लावला. बराच वेळ त्याचा फोन वाजला पण त्यानं फोन उचललाच नाही. माधवनं दुसऱ्यांदा फोन लावूनसुद्धा रविनं फोन उचलला नाही. माधव देखील इरेला पेटला होता. त्यानं रविला मेसेज केला आणि वृद्धाश्रमाचा पता त्याला विचारला.
थोड्या वेळानं त्याचे उत्तर आलं मी मीटिंगमध्ये आहे. नंतर बोलेन.’ पण नशीब! वृद्धाश्रमाचा पत्ता त्याने पाठवला होता. तो पता पाहून माधवनं रिक्षा पकडली आणि तडक तो वृद्धाश्रमाकडे निघाला. वाटेल त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरूच होतं. ‘ आता काही झालं तरी मी बाबा आणि माईना इथे ठेवणार नाही. त्यांना माझ्याबरोबर मी अमेरिकेला घेऊन जाणार. आता राहिलं काय त्यांचं इथं त्या कृतघ्न मुलाशिवाय? पण बाबासाहेबांनी सुद्धा मला आपलं समजून कळवायला नको का? ते दोघेसुद्धा असे कसे वागले माझ्याशी?

रिक्षा वृद्धाश्रमाच्या फाटकापाशी थांबली आणि माधवची नंदी मंगली थोडा राग, थोडं दुःख आणि थोडी निराशा अशा संमिश्र भावनेने माधवने वृद्धाश्रमात पाऊल टाकलं तिथलं एकंदर वातावरण आणि परिसर बघून त्याला हायसं वाटलं. फाटकापाशी स्वागत कक्ष, तिथून पुढे छोटसं लॉन, शेजारी जेवणाची खोली, विश्राम कक्ष आणि छोटं थिएटरसुद्धा.
दुसऱ्या बाजूला वाचनालय आणि काही बेंचेस पूर्ण परिसर दाट झाडी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रसन्न आणि रम्य वाटत होता. माधवचा राग आता थोड़ा निवळला होता. स्वागत कक्षात सही करून तो तड़क बाबासाहेबांच्या खोलीवर गेला. त्याने बाबासाहेब आणि माईना नमस्कार केला, माधवला पाहून त्या दोघांचा आनंद गगनात मावेना.

बाबासाहेबांनी माधवला मिठीच मारली आणि माईनी तर त्याच्या गालावरूने हात फिरवत त्याची दृष्ट काढली. माधवलाही मनातून खूपच आनंद झाला होता, परंतु लटक्या रागाने तो म्हणाला ” बाबासाहेब, मी रुसलो आहे तुमच्यावर एवढं सगळं झालं तरीही तुम्ही मला काही कळवलं नाही, रविने तुम्हाला घराबाहेर काढल आणि सरळ वृद्धाश्रमात पाठवलं. मी कोणीच नाही का तुमचा? हा तुमचा दुसरा मुलगा अजून जिवंत आहे.
आता तुम्ही इथे राहायचं नाही. चला माझ्याबरोबर अमेरिकेला. मी उद्याच तुमची तिकीटे बुक करतो. त्यावर बाबासाहेब हसत हसत म्हणाले ” अरे माधवा, इथे बस माझ्या शेजारी. तू समजतो आहेस तसं काहीही झालेलं नाही, मी माई आणि रवि आम्ही ठरवूनच हा निर्णय घेतला आहे. रविला मुंबईत चांगली नोकरी मिळाली. पण जागेची समस्या, जागा फारच लहान होती त्याची.

आम्ही दोघे इथल्या मोठ्या बंगल्यात एकटेच होतो आम्हाला बंगल्याची दुरुस्ती आणि स्वच्छता जमतच नव्हती बघ. मग मीच रविला सुचवलं आणि मग आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला. आम्ही इथे अगदी मजेत आहोत. तू पाहिलास ना वृद्धाश्रम? किती छान आहे इथला परिसर. काहीतरी विचार करत बसतोस. वेडा कुठला!” असं म्हणून बाबासाहेबांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला.
तेवढ्यात माधवचा फोन वाजला. रविचा फोन होता. तो म्हणाला ” माधव दादा, माफ कर मला. अरे फारच महत्त्वाची मीटिंग होती. त्यामुळे फोन नाही घेऊ शकलो तुझा आता दोन-तीन दिवसाची रजा टाकली आहे मी. आज रात्रीच आम्ही सगळे येतोय तिकडे. मग आपण सगळे मिळून महाबळेश्वरला जायचं आणि खूप धम्माल करायची बरं का आणि हो सातारच्या सगळ्यात महागड्या हॉटेलमध्ये तुझी रूम बुक केली आहे बघ आज मुक्कामासाठी. अगदी जवळ आहे तिथून म्हटलं, आपल्या अमेरिकन ड्रीमरची गैरसोय नको”

रवि हसत हसत म्हणाला, बघ बाळा” बाबासाहेब म्हणाले ” अरे आपण सगळेजण हे समोरचं जग आपापल्या चष्म्यातून बघतो. मग आपल्याला ते लहान, मोठं, पिवळं, लाल, जांभळं काळं असं दिसतं. खरं स्वच्छ आणि नितळ जग दिसतच नाही आपल्याला. म्हणूनच हा गैरसमज आणि पूर्वग्रहाचा चष्मा काढून बघायचं असतं हे जग म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं ” आणि बाबासाहेब आणि माई हसू लागले आणि माधवही थोड़ा खजील होऊन हसू लागला. तो बाबासाहेब आणि माईचा निरोप घेऊन हॉटेलकडे निघाला.

चालता चालता वाटेत त्याला एक गॉगलवाला दिसला सुटाबुटातला माणूस बघून गॉगलवाला त्याच्या मागे लागला “घ्या हो सर, गॉगल घ्या ना” माधव नाही म्हणाला आणि स्वतःशीच हसला. त्याच्या मनात विचार आला मोठमोठ्या दुर्बिणीतून या ब्रम्हांडाला पाहणाऱ्या या नासाच्या शास्त्रज्ञाला आता जगाकडे पाहण्यासाठी कुठल्याच चष्म्याची गरज नव्हती. बाबासाहेबांनी त्याला हे जग पाहण्यासाठी एक नवीन दृष्टी दिली होती. गैरसमज आणि पूर्वग्रह नसलेली चष्माविरहित, स्वच्छ, नितळ दृष्टी!
© डॉ राजेश शांताराम जोशी
सदर कथा लेखक डॉ राजेश शांताराम जोशी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!