दशानन – Heroes Don’t Exist

©️ अभिजीत दत्तात्रय शिंदे
एका रात्री गाडीतून एक व्यापारी चालले होते. सिग्नलला गाडी थांबली असता एक फूगे विकणारा लहान मुलगा त्यांच्या गाडीजवळ येऊन त्यांना फूगे विकत घेण्यासाठी विनंती करू लागला.
ते व्यापारी नको नको म्हणत असताना चुकून त्यांच्या हाताच्या बोटाचे नख लागून एक फुगा फुटला आणि क्षणभरात तो मुलगा पण दिसेनासा झाला.
थोड दूर गेल्यावर त्यांनी चालकाला गाडी थांबवायला लावली व चालकाला तिथेच सोडून ते गाडी चालवत त्यांची मीटिंग होती तिथे गेले.

ते तिथे जाऊन बसले आणि समोरचा व्यापारी बोलत असताना अचानक त्यांनी पाणी प्यायच काचेच ग्लास हातात घेतलं आणि जोरात टेबलवर आपटलं आणि ते अर्ध तुटल. सगळे त्यांच्याकडे आश्चर्याच्या नजरेने बघायला लागले.
क्षणार्धात त्यांनी ते ग्लास समोर बसलेल्या व्यापाऱ्याच्या छातीमध्ये जोरात खुपसलं आणि रक्ताच्या चीळकांड्या उडाल्या. ते त्याच्यावर तोपर्यंत वार करत होते जोपर्यंत त्याचे प्राण जात नाहीत.
सगळीकडे हाहाकार झाला. हॉटेलचे कर्मचारी, तिथे आलेली लोक इकडेतिकडे घाबरून पळायला लागली.
ते व्यापारी सगळ्यांसमोर खून करून तिथून बिन्दास निघून गेले आणि कोणी काहीच करू शकल नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी शहराबाहेर एका मैदानातून त्यांना अटक केली.
सगळे पुरावे त्यांच्याविरुद्ध असल्यामुळे ते आणि त्याचा परिवार काहीच करू शकल नाही. त्यांना जवळजवळ तेथील सगळया लोकांनी खून करताना पाहिले होते आणि सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले होते.
महालक्ष्मी नावाची एक वकील होती. तिच्याजवळ रवींद्र नावाचा एक जुनियर वकील काम करायचा. तस पाहिलं तर तो सिनियर पाहिजे होता पण काय करणार ते दोघ एकाच हायस्कूल मध्ये होते आणि त्यानंतर कायद्याच शिक्षण घेतानासुद्धा एकत्रच होते आणि मुख्य म्हणजे रवींद्रच महाल्क्ष्मीवर प्रेम होतं.

पण तिने त्याच्यासोबत लग्न करण्याऐवजी एका स्थिर-स्थावर स्थायिक असलेल्या वकीलासोबत लग्न केले. त्यामुळे रवींद्र सिनियर असूनसुद्धा तिच्यासोबत वेळ घालवता येईल म्हणून तिच्या हाताखाली ज्यूनियर म्हणून काम करत होता.
एके दिवशी मेघा नावाची मुलगी महालक्ष्मीच्या ऑफिसमध्ये आली.
रवींद्रला बघताक्षणी मेघा आवडली. त्याने महालक्ष्मीला खूप विनंती केली कि हि केस मला हाताळू द्या.
कितीतरी विनंत्या केल्यानंतर तिने त्याचं ऐकलं आणि केस त्याला हाताळायला लावली.
तो उत्साहाने मेघाजवळ गेला आणि तिच्यासोबत गप्पा मारू लागला.

तो इतके प्रश्न आणि बडबड करत होताना कि बास ! तिनेच शेवटी मध्येच त्याला थांबवले आणि म्हणली “आपण केसबद्दल बोलायचं का ?”
तो म्हणला “हो, चालेल कि.” तेवढ्यात टी.व्ही. वर त्या व्यापाऱ्याने खून करतानाचे दृश्य दाखवत होते.
त्याने विचारले “केस काय आहे ?”
तेवढ्यात ती टी.व्ही. कडे बोट करत म्हणाली “ते जे आहेत ना ते माझे वडील आहेत.”
तो म्हणाला “हो का.” त्याला वाटले कि ज्याचा खून झालाय ते तिचे वडील आहेत. तो खुश झाला, त्याला खात्री वाटली कि आता हि केस आपणच जिंकणार कारण सगळे पुरावे आपल्याच बाजूने आहेत आणि एकदा का केस जिंकलो कि मेघाच्या नजरेत आपला मान वाढेल आणि तिला आपण आवडायलापण लागू.

तो तिला म्हणाला “हि केस आपणच जिंकू कारण सगळे पुरावे आपल्याच बाजूने आहेत आणि माझ्यासारखा वकील तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही !” तो तिच्यासमोर फुश्यारक्या मारू लागला.
तिला कळून चुकल कि ह्याला काहीतरी गैरसमज झालाय. ती म्हणाली “ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, ज्यांचा खून झालाय ते माझे वडील नाहीयेत ! ज्यांनी खून केलाय ते माझे वडील आहेत !”
हे ऐकून त्याला धक्का बसला. म्हणजे जी मुलगी एवढी सुंदर आहे, एकदम एखाद्या परीसारखी आणि हिचे वडील असे ! त्याला विश्वासच बसेना.

त्याने शेवटी हिम्मत करून विचारले “तुम्ही नक्की त्यांचीच मुलगी आहात ?” ती म्हणाली “हो, काही शंका ?”
तो म्हणाला “नाही शंका नाही पण तुम्ही अश्या एकदम स्वर्गातून आलेल्या परीसारख्या आणि वडील असे ?”
ती जरा रागातच म्हणाली “ असे म्हणजे ? नक्की काय म्हणायचं.. ?
तो तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच म्हणाला “नाही नाही, ते सगळ जाउद्या. तुम्हाला अस का वाटतय कि तुमचे वडील निर्दोष आहेत ? कारण सगळे पुरावे तर हेच सांगतायेत कि खून तुमच्या वडिलांनीच केलाय.”
ती म्हणाली “तुम्ही माझ्या वडिलांनी दिलेल विधान वाचा.” आणि तिने त्याच्यासमोर एक फाईल ठेवली.

त्यात त्यांनी दिलेला विधान असा होता कि,” माझी गाडी जेव्हा सिग्नलला थांबली होती तोपर्यंत सगळ ठीक होत. जेव्हा माझ्याकडून तो फुगा फुटला तेव्हापासून नंतर पुढे काय झाल मला काहीच आठवत नाही. जेव्हा शुद्धीत आलो तेव्हा शहराबाहेर एका मैदानात गाडी उभी होती. मी घरच्यांना फोन लावण्यासाठी फोन चालू केला आणि तेवढ्यात पोलीस आले आणि मला अटक केली. ह्यात माझी काहीच चुकी नाही. माझ्या मते कोणीतरी माझ्याविरुद्ध कट रचलाय.”
हे सगळ वाचून रवींद्रने मेघाला विचारलं,” कशावरून कि तुमचे वडील खर बोलत असतील ?”
ती म्हणाली “ मी त्यांना चांगल ओळखते, शेवटी माझे वडील आहेत ते. अस ते करूच शकत नाहीत.”

यावर तो म्हणाला “ठीके. महालक्ष्मी केस लढायला तयार झाल्यावर मी तुम्हाला काळवेल.” ती म्हणाली “चालेल, मी वाट बघेल.” ती निघून जाते.
ह्याच्या मनात विचार आला कि “समजा आमच लग्न झालं आणि माझ्याकडून काही चुकी झाली आणि हिच्या वडिलांना राग आला तर माझी तर काही खैर नाही. त्यापेक्षा मी महालक्ष्मीला हि केस लढण्यासाठी तयार करतो आणि तिच्या वडलांना फाशीची शिक्षा होईल असे काहीतरी करतो किंवा नाही केलतरी होईलच कारण सगळे पुरावे तर त्यांच्या विरूद्धच आहेत.” मनोमानीच तो खुश होऊ लागला.
खूप हाथ पाय जोडल्यानंतर महालक्ष्मी तयार झाली केस लढायला पण तिला माहित होते कि हि केस जिंकण खूप अवघड आहे पण काय करणार आता तयार झालोय लढायला म्हणल्यावर प्रयत्न केलाच पाहिजे. असे तिने स्वतःलाच समजावलं.

दुसऱ्या बाजूला पोलिसांनी त्यांचे बेस्ट पोलीस अधिकारी हनुमंतराव यांना हि केस सोडवण्याची जबाबदारी सोपवली. हनुमंतराव हे खूप तल्लख बुद्धीचे होते. त्यांनी पूर्ण केसचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली कि काहीतरी ह्या केसमध्ये संशयास्पद आहे. त्यांनी सगळे जुने असे खून झालेल्या केसेसच्या फाईल्स पाहिल्या त्यापैकी त्यांना एक अश्याच प्रकारे खून झालेली केस आढळली. त्यांनी सगळी शहानिशा केली आणि त्यांना एक सुगावा भेटला.
सहा महिन्यांपूर्वी अश्याच प्रकारे एका पैलवानाचा खून झालेला आणि विशेष म्हणजे त्याच्या भावानेच त्याचा खून केलेला.

हनुमंतराव त्याच्या भावाला कारागृहात जाऊन भेटले व त्याचि विचारपूस केली. विचारपूस केली असता त्यांना कळले कि जेव्हा पैल्वानाचे परिवार त्याचा वाढदिवस साजरा करत होते तेव्हा त्याचा भाऊ थोड्या वेळासाठी फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेला असताना अचानक त्याच्यासमोर एक फुगा फुटला व त्यानंतर काय झाले त्याला कळलेच नाही.
जेव्हा तो शुद्धीत आला तेव्हा तो शहराबाहेर एका मैदानात होता. त्याला नंतर कळले कि त्याच्या भावाचा खून झालाय व तो त्यानेच केलाय पण त्याच म्हणने अस होत कि त्याने खून केलेलाच नाही नक्कीच काहीतरी संशयास्पद आहे.

हनुमंतरावांना खात्री पटली कि ह्या दोन्ही केसचा एकमेकांसोबत संबध आहे. त्यांनी ह्या केसेस सोडवण्याचे नक्की केले. त्यांनी त्या पैलवानाच्या घराचे व आसपासच्या परिसरातले सगळे सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची पाहणी केली व त्यांना एक संशयास्पद व्यक्ती आढळली. सगळी शहानिशा केली असता त्यांना कळाले कि पैलवानाचा खून ह्वायाच्या काही दिवस आधी तो व्यक्ती पैलवानाच्या भावाचा पुतळा बनवायचा म्हणून त्याच्या चेहऱ्याचे माप घेण्यासाठी आला होता. त्या व्यक्तीची सगळी माहिती हनुमंतरावांनी काढली. त्या व्यक्तीचे नाव होते शिवा. शिवा याने न्यू योर्क फिल्म अकॅडेमीतून मेकअप कलाकाराची पदवी घेतलेली. तो नुकताच त्याच्या प्रेयसीसोबत भारतात आला होता. हनुमंतरावांनी त्याचा शोध घ्यायचे ठरवले.

त्यांनी ठरवल्याप्रमाणे लवकरच त्याचा शोध लावला व त्याला मोठ्या चतुराईने पकडले. थोड्याच वेळात त्यांना कारागृहातून माहिती मिळाली कि पैलवानाचा भाऊ फरार झाला आहे. त्यांनी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. त्यांनी शिवाची विचारपूस चालू केली पण शिवा त्यांना काही सांगणार तेवढ्यात पैलवानाचा भाऊ मोठ्या धैर्याने पोलीस स्थानकामध्ये आला व हनुमंतरावांवर बंदूक ताणली आणि शिवाला बाहेर गाडीत जाऊन बसायला लावले पण हनुमंतरावांनी अचानक पलटवार केला.
त्यात पैलवानाच्या भावाच्या हातावर त्यांच्या खिशातल्या पेनाने वार केला. त्यातून तो कसाबसा सावरला व हनुमंतरावांना धक्का मारून ते दोघ तेथून पसार झाले.

आता मात्र हनुमंतरावांना खात्री पटली कि खून शिवानेच केला आहे व त्यात त्याला त्याच्या भावाने साथ दिली आणि पैलवानाचा भाऊ खोट बोलतोय. शिवा आणि पैलवानाचा भाऊ शिवाच्या घरी गेले. तिथे पैल्वानाच्या भावाने त्याच्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढला आणि जाणून आशर्य होईल कि त्या मुखवट्याच्यामागे रवींद्र होता.
तोच रवींद्र जो महालक्ष्मीकडे ज्यूनियर वकील म्हणून काम करत होता. रवींद्रनेच पैलवानाला त्याच्या भावाचा मुखवटा घालून मारले
होते व त्या व्यापाऱ्याला मेघाच्या वडिलांचा मुखवटा घालून मारले होते.
शिवा मुखवटा तयार करून देण्याच काम करत पण हा त्याचा नाईलाज होता कारण रवींद्रने त्याच्या प्रेयसीला बंदी बनवून शिवाकडून काम करवून घेत होता.

शिवाला त्याच्या प्रेयसीला सोडवायचे होते म्हणून हे काम करत होता. रवींद्र हे सगळ का करत होता ह्याच कारण मात्र शिवला त्याने नव्हतं सांगितलं.
त्याच रात्री पैलवानाच्या भावाचा मृतदेह शहराबाहेर एका मैदानात आढळला. दुसऱ्या दिवशी हनुमंतराव वकील महालक्ष्मीच्या कार्यालयात केसबद्दल माहिती गोळा करण्यासाठी गेले. तिथे त्यांना रवींद्र भेटला व त्याचं त्याच्यासोबत बोलणे चालू असताना त्याचं लक्ष त्याच्या हाताकडे गेले. त्यांना संशय आला कि मी काल पेनाने वार पैलवानाच्या भावावर केलेला पण त्याच्या हातावर काहीच निशाण नव्हत.

त्यांनी पटकन रवींद्रच्या बाह्या वर केल्या व त्याला विचारलं “ हे कसे लागले मला जरा सांगशील का?” रवींद्रला कळून चुकल कि त्यांना कळल आहे कि आपणच काल शिवला सोडवायला गेलो होतो.
शिवा म्हणाला,“ ओह, तर तुम्हाला कळलंच. हो मीच तो. सगळ्यामागे मीच आहे. पैलवानाला मारल मीच. त्या व्यापाऱ्याला मारल
मीच. पैलवानाच्या भावालासुद्धा मारलं मीच. पण तुम्ही माझा गुन्हा कोर्टामध्ये सिद्ध नाही करू शकणार. काय पुरावा आहे कि हे सगळ मीच केलाय म्हणून ?”
त्यावर हनुमंतराव म्हणाले,” पुरावा भेटेलच. कारण प्रत्येक गुन्हेगार काहीना काही पुरावा सोडतोच.”

त्यावर रवींद्र म्हणाला,” ठीक आहे तुम्ही पुरावे शोधा. पण एक विसरू नका, जेव्हा तुम्ही माझ्यातल्या गुन्हेगाराला पकडायला जाणार तेव्हा माझ्यातला वकील त्याला वाचवायला येईल. थोडक्यात तुम्ही मी गुन्हेगार आहे हे सिद्धच नाही करू शकणार.” यावर काय
प्रतिउत्तर द्याव हे त्यांना कळलच नाही कारण रवींद्र ज्याप्रकारे बोलत होता व त्याचे ते स्मितहास्य पाहून ते घाबरले होते.
त्यांना पहिल्यांदा अस वाटल कि आपण चुकीच्या माणसासोबत पंगा घेत आहोत.
ते तिथून काहीच न बोलता निघून गेले.

त्यांनी रवींद्रची पूर्ण माहिती काढली.
गायत्री नावाची एक डॉक्टर होती. तिच्या हॉस्पिटलमध्ये एके दिवशी १०-१२ लहान मुल पेशंट आले. त्यांची परिस्थिती खूपच गंभीर होती. तिने सगळी पडताळणी केली असता तिच्या एक गोष्ट लक्षात आली कि हि सगळी मुल वजन वाढाव व त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून ते एक गोळी दुधामध्ये घेत होते. तिने खूप प्रयत्न केले पण त्या मुलांना ती वाचवू शकली नाही कारण ते मुल खूप दिवसांपासून गोळी खात होते त्यामुळ त्यांचे अंतरइंद्रिय काम करण बंद झाले होते. दुर्दैवाने त्या सगळ्या मुलांचा मृत्यू झाला. गायत्रीने हे प्रकरण उचलून धरले व तिने त्या गोळी बनवणाऱ्या कंपनीवर केस केली. ती कंपनी दोघ मित्र मिळून चालवत होते.

त्यांना जस जस कळायला लागल कि आपली कंपनी लवकरच बंद होईल आणि आपण कंगाल होऊ. तेव्हा त्यांनी त्या पैलवानाला व त्याच्या भावाला तिला मारायची सुपारी दिली आणि तो खून वाटावा नाही म्हणून तिचा बलात्कार व खून करायला लावला म्हणजे कोणाला संशय येणार नाही कि हा खून मुद्दामून केलाय म्हणून.
त्या दोघांने तिचा बलात्कार केला व तिचा खून केला. ती मेल्यामुळे कोर्टामध्ये पूरावे सादर नाही झाले व ती कंपनी केस जिंकली. रवींद्र गायत्रीचा भाऊ होता. त्याला हे सगळ कळाले कि तिचा खून कशासाठी केला गेलाय. त्याने ठरवलं कि आपण ह्या गुन्ह्यामध्ये असलेल्या कोणालाच सोडायचं नाही.

त्याने एक योजना केली कि कोणालाच संशय न येता आपण हे सगळ करायचं व गुन्हेगारांना शिक्षा द्यायची कारण पोलीस काहीच करणार नाहीत कारण त्यांच्याकड काहीच पुरावा नाहीये. त्याने मग सगळ त्याच्या योजनेप्रमाणे त्या व्यापाऱ्याच्या मुखवट्याचा वापर करून त्याच्या दुसर्‍या व्यापाऱ्याला मारले व पैलवानाला व त्याच्या भावाला सुद्धा तसेच मारले.
हे सगळ हनुमंतरावांना कळल्यावर त्यांनी रवींद्रची भेट घेतली व त्याला म्हणाले,” मला सगळ कळाले कि तू हे का केलयस. तुझ कौतुक केल असत मी पण मी एक पोलीस आहे आणि तू एक गुन्हेगार. तू जास्त वेळ वाचू शकणार नाहीस.”

यावर रवींद्र स्मितहास्य करत म्हणाला,” तुम्ही स्वतःला राम समजताय पण मी रावण आहे आणि तुम्हाला विभिषण शोधूनसुद्धा सापडणार नाही जो तुम्हाला मदत करेल. मी माझ कर्तव्य करत राहणार, अश्या गुन्हेगारांना शिक्षा देत राहणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा मला थांबू नाही शकणार.”
त्यावर ते म्हणाले,” मी कोण तुला थांबवणारा, उलट तू ते केलयस जे पोलीससुद्धा करू शकले नसते. आता मला विश्वास बसलाय कि HEROES DO EXIST.” यावर रवींद्रने तेच स्मितहास्य केल व त्याने पुढे त्याच काम चालू ठेवलं आणि शिवाला त्याची प्रेयसी सोपवली. व त्यालासुद्धा रवींद्रच हे सगळ करण्यामागच कारण कळाले होते त्यामुळ तोसुद्धा रवींद्रला मुखवटा बनवण्यात मदत करू लागला आणि हनुमंतराव काहीच करू शकले नाहीत.
©️ अभिजीत दत्तात्रय शिंदे

सदर कथा लेखक अभिजीत दत्तात्रय शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!