©®तृप्ती देव
सुहा नी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला. उगाच समीर चा आवाज रूमच्या बाहेर नको जायला.
त्यांची कोणतीही एखादी वस्तू जागेवर सापडली नाहीं की त्यांचा ओरडा आरडा सुरु व्हायचा. आणि त्यांचा आवाज रूमच्या बाहेर जायचा इतक्या मोठयाने त्यांचं ओरडण असायचं.
समीरला त्याचं काहीच वाटायचं नाहीं. घरात म्हातारे आईवडील आहॆत त्यांना काय वाटेल.
आजूबाजूच्या लोकांनाहीं ऐकायला जातं. याची काही काळजीच नाही.
मागच्या महिन्यात पण असाच प्रसंग घडला आणि तो तिच्यावर चिडला होता.
कुठल्यातरी गोष्टी वरून आणि ती मध्ये बोलली तर त्याने तिच्या थोबाडीतच मारली. असे अधून मधून खटके उडायचे.
संसाराचे सूर जुळतच नव्हते.
नात्यांत आंतरिक ओढ नव्हती जणू.
गेल्या वर्षभरात असे अनेक प्रसंग आले. तो तिला नको नको ते बोलायचा.
छोट्या छोट्या गोष्टी वरून वाद घालणं. तिची चूक नसतानाही तिला दोषी ठरवणं.
आज परत तोच प्रसंग. ती दूरच उभी होती. तिने सगळ त्याचं बोलण काही नं बोलता ऐकून घेतलं.
तिची चूक नसतानाही तिला कित्येकदा मानसिक त्रास सहन करावा लागत होता. एकीकडे आईवडील, दुसरीकडे सासु सासरे. त्यांचा विचार मनात आला की ती शांत होऊन जायची.
तिचा स्वभाव शांत, सगळं सहन करणारी. समजवून घेणारी. आहॆ त्या परिस्थिती जुळवून घेणारी.
समीर आईवडिलांचा एकलूता एक. तो ही लग्नाच्या दहा बारा वर्षांनी झालेला. कदाचित त्यांचे जास्त लाड झाले, अत्याधिक काळजी घेतली गेली म्हणून असा स्वभाव झाला असेल. पुढे होईल बदल.
लग्नाला दोन वर्षेही पूर्ण व्हायची आहॆत. लग्न ठरलं आणि अवघ्या दोन महिनातच अक्षदा हीं पडल्या. दोघांना जास्त वेळ एकत्र नाहीं मिळाला. भेटीगाठी झाल्या पण फार कमी. त्यांत त्यांचा स्वभाव कसा उमजलाच नाहीं.
आईवडिलांसोबत त्यांचा व्यवहार वेगळाच होता. कदाचित त्यांचा मुलगा म्हणून त्यांना त्रास झाला तरी दुर्लक्ष करत असतील.
माझ्यासाठी एक कोडंच होत त्यांच्या विचित्र स्वभावाचं.
पण सासरे खूप चांगल्या विचारांचे होते. कधी हीं अपशब्द नं बोलणारे, समजून घेणारे. सून म्हणून मला कधीच अंतर दिलं नाहीं. त्यांचा तो स्वभाव हीं नव्हत्ता. कोणलाही त्रास देणे हें त्यांना कधीच जमलंच नसेल. इतके वैचारिक होते.
सुहा रूम मधून बाहेर पडली. आपल्या रोजच्या कामाला लागली. समीरचा आणि सगळ्यांचा नास्ता, जेवणाच्या तयारी लागली.आणि स्वतःला गुंतवून घेतलं. नक्कीच पुढं चांगले होईल हया आशेने.
टेबलावर तिने सगळ्यांचा नास्ता ठेवला. सासू सासरे सगळ्यांना समोर तीने स्वतःला आनंदी आहॆ असं दर्शवलं. जणू काही घडलंच नाहीं असं.
पण सासऱ्यांनी तिच्या चेहरा कडे बघितलं, दरवाजा बंद होता पण समीरच्या ओरडण्याचा आवाज रूम च्या बाहेर आलाच.
ती काहीच बोली नाही. पण तिच्या मनातलं त्यांनी ओळखलं.
आपल्या मुलामुळे तिची होणारी घुसमट आणि मानसिक त्रास. तीला कोणा जवळच बोलता येत नाही.
सुहाचा काहीच दोष नाहीं तरी पण ती त्रास सहन करते. ह्याचं सासऱ्यांना खूप वाईट वाटायचं.
घरात सगळ वैभव असनुही ती दुःखी.. का? तर समीरचा स्वभाव.
सुहा बाकीचं कामे आवरायला आत गेली. समीर ऑफिस ला गेला. आणि समोर टेबलावर नास्ता करत बसलेल्या समीर च्या आईला सासऱ्यांनी म्हटलं, “तू का नाहीं बोलत समीर शी?
किती दिवस तू हया सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करशील? आपल्या मुलाला पाठीशी घालशील. का म्हणून तिने त्यांचा त्रास सहन करायचा? तू पण एक स्त्री आहॆस. पण तरी तिचं दुःख तुला कसं कळत नाही?
लग्नाला अजून किती वर्ष झाली, जेमतेम दोन वर्ष पण पूर्ण नाही झाली.
पुढचं उभ आयुष्य ती समीर सोबत कसे काढेल? सून म्हणून तिला हीं हया घरातआत्मसन्माना सोबत आनंदी आणि सुरक्षित जगण्याचा हक्क आहॆ.
तुला समीर शी बोलावा लागेल. एक स्त्री म्हणून, आई म्हणून नाही.
त्यांचं हें काळजातलं बोलण सुहा नीं ऐकलं, ती टेबल वरच्या प्लेटा न्यायला आली होती.
ती आत गेली आणि आपल्याच विचारातच होती.
किती नशीबवान आहे समीर ! त्याला इतके चांगले आई वडील मिळाले. एका सुनेचा मुलीसारखा विचार करतात, आणि समीर आहे एक बायको म्हणून बायकोचा कधीच विचार करत नाही.
सुहा परत आली आपली काळजी करणाऱ्या सासऱ्यांना तिने धीर दिला, “बाबा नका तुम्ही इतकी. काळजी करू. तुमची तब्येत पण आजकाल चांगली राहत नाही.”
तिच्या डोळयांतले अश्रू आणि तिचं दुःख समोर बसलेल्या सासूबाईंनी बघूनही नं बघतल्या सारख केल आणि….लगेच बोलल्या, “हा तुमच्या नवरा बायकोचा “व्यक्तिगत ” मामला आहे आम्ही तरी काय करणार?
एकमेकांना समजवून घ्या. कोणाला दोष देण्यात काय अर्थ?”
उंच आवाजात सासरे लगेच बोलले, ” हा व्यक्तीगत प्रश्न नाही आहे. आपल्या मुलाचा दुर्व्यवहार आहे. मग हा व्यक्तिगत कसा होईल?प्रत्येकाने असाच विचार केला तर समस्या सुटणारच नाही . तिची कायम घुसमट होईल हया घरात.
दोन्ही परिवार मिळून आनंदाने, स्वखुशीने सगळं रीतसर विधिविहित, पूर्ण समाजा समोर, नातेवाईक, आप्तसंबंधी, देव ब्राह्मण, अग्नीला साक्ष ठेवून आपण वाजत गाजत स्वागत करत हिला सून म्हणून घरी आणल आहे आणि त्यात तुझा लाडका मुलगा त्यांची पण संमती होतीच.
लग्न हा तिच्या एकटीचा निर्णय नव्हत्ता, हा निर्णय सगळ्यांचा होता. मग हा वैयक्तिक प्रश्न कसा झाला ?
तिने एकटीने त्रास का सहन करायचा? तू सासू म्हणून अनेक निर्णय घेशील. तिच्या बाबतीत आणि घेतले हीं आहॆस.
मग आपल्या मुलाची पण जबाबदारी घे .
त्याचं चुकीचं हे वर्तन आहे. हे समजून सांग त्याला. त्याचा विरोध क.र तू एक स्त्री आहेस एका स्त्रीच मन ओळख ..
जसं सुनेकडून बदल अपेक्षित आहे, तसंच आपल्या मुलां मध्ये पण बदल गरजेचा आहॆ..
“ही जबाबदारी आपल्या दोघांची आहे “. लग्न हे दोन कुटुंबांचं मिलाप आहॆ. नात्यांचा सामायिक जीवनाचा प्रवास आहॆ.
सासरी आलेल्या मुलीला झालेला त्रास मग तो कोणत्याही स्वरूपात असो. मान अपमान का असो! मानसिक शारीरिक छळ कोणताही, तिने हें का सहन करायचं?
दुसऱ्या कुटुंबातील आलेला मुलीचा हा, वैयक्तिक विषय कसा?
समाजातील अनेक मुलींचा हाच प्रश्न आहॆ. ज्या दिवशी सुहा हया घरचा उंबरठा ओलांडून आली, त्याच दिवशी ती या घराची कायद्याने सून झाली. ती सून म्हणून तिला या घरचे हक्क नकोत?
एक सून म्हणून आपण तिला सगळे अधिकार दिले. पण समीर नीं पणे सुहाला एक बायको म्हणून तिचे अधिकार नको दयायला?
तिच्या “मान अपमाना “चा विचार नको करायला? त्याचं वागण मनाला किती खटकतं !”
शेवटी सुहा च्या सासऱ्यांनी एक निर्णय घेतला.
सगळ्यांना फोन करून दुसऱ्या दिवशी बोलवून घेतलं , सुहाचे आईवडील, मोठा भाऊ वहिनी. तिच्या मायेचे जवळचे.
आणि सुहाला बोलवून सांगितलं , “सुहा शांतपणे तुझ्या आयुष्याचा तू विचार कर! म्हणूनच मीं तुझ्या घरच्यांना उद्या बोलवलं आहे. समीर बद्दल स्पष्ट बोलायला. त्यांच्या हया स्वभावाने होणार तुला मानसिक त्रास आणि वेदना हया बद्दल मीं स्पष्ट बोलणार आहॆ.
सुहा च्या डोळ्यात अश्रू आले. तर सासऱ्यांचेही डोळे पाणवले. सुहा सून म्हणून आली पण मी तिचा बाप केव्हा झालो कळलंच नाही.” तिच्या खांद्यावर हात ठेवत सुहाच्या सासऱ्यांनी खंबीर स्वरातच म्हटलं, “तुला तुझा तो योग्य निर्णय घायचा आहॆ. त्या निर्णयाचा मीं आनंदाने स्वागत करेल.
माझ्या मुलांच्या वागण्याची जवाबदारी मलाच घ्यावी लागेल. काही कठोर निर्णय घ्यावे लागले मला तरी मीं ते नक्कीच घेईन.
मी तुझ्या निर्णयाचा नक्कीच आदर करेल.
तुझी काहीच चूक नसतानाही तुला झालेला हा मानसिक त्रास आणि वेदना ही तुझी वैयक्तिक बाब नाही आहे. गेल्या दीड वर्षाच्या संसारात सुखद क्षण आठव ज्यांची सुंगधी स्मृती जपून ठेवावी. मग तुझा निर्णय घे. आणि स्वतःला न्याय दे.
आपला समाज आणि कुटुंब कधी काही जवाबदारी घेणार की नाहीं?
अलगद तिच्या खांदावरचा हात बाजूला काढून ते आपल्या खोलीत गेले.
******
खरंच, आपण लग्न ठरवताना माणसांच्या शरीराची उंची, शरीराचा रंग पाहतो. पण मनाचा रंग यांचा आपण कधीच विचारच करत नाही. संसारात मनं खरच महत्वाचं असते.
©®तृप्ती देव
सदर कथा लेखिका तृप्ती देव यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.