भेटवा मजला पुत्र माझा


©® वैभवी आंबेकर
“मला माझं बाळ हवयं…सोडा मला …बाळ हवयं माझं…पदर पसरते मी बाळ द्या माझं…तो …तो…घुसमटेल…मला जायला हवं…माझी गरज आहे त्याला.. please सोडा मला..जा…उ…द्या…म..ला…बा..ळ…”तीच्या हातावर सुई टोचल्यागत तीला जाणवलं आणि ती निपचित बेडवर पडली‌‌….
इतक्यात फोन वाजला…
” काय रे .. अजुन गोंधळ घालतेय कि ती”..पलिकडुन..
“आताच injection दिलयं …झोपली आता…काय करु समजत नाहीय…”तो..

दोन वर्षांपूर्वी….
निशा – समर्थ… सुखी जोडपे..वाद ना विवाद अगदी सगळं मनाप्रमाणे जगत आलेले.. फक्त कमी एकाचीच ती म्हणजे लग्नाला दहा वर्षे उलटून गेली तरी अजुन त्यांच्या संसारवेलीवर कळी उमलत नव्हती…
Dr..देव ..नवस…सगळं करुन झालं होतं.. दत्तक घ्यायचं म्हटलं तर घरातील वडीलधारी माणसांंचा अजुनतरी नकार होता…कारणं असं कि… अजुन वेळ आहे…अगदीच वेळ निघुन गेलेली नाहिय…
दिवस चालले होते…त्यांचे प्रयत्न सुद्धा सुरु होते…

अश्यातच निशाची periods date चुकली…समर्थला सांगताना तीला झालेला आनंद तीच्या शब्दांतच ओसंडुन वाहत होता…dr. कडे जाऊन confirmation झालं…निशा आई होणार बघता बघता दोन्ही घरात ही बातमी पसरली…
सगळेच भलत्याच जोशमध्ये होते… समर्थ आईवडीलांचा एकुलता एक असल्यामुळे त्यांना अजुन नातंवडाच सुखं मिळालं नव्हतं.. समर्थांच्या आईने सगळ्या देवांना नवस बोलून मोकळी झाली…
दिवसामागुन दिवस चालले होते…पाच.. सहा.. सातवा महिना.. डोहाळे जेवण…ओटी भरण्याचा कार्यक्रम सुद्धा दणक्यात पार पाडला..अगदी दृष्ट लागण्याजोगा त्यांचा संसार चाललेला..कि…आठव्या महिन्याच्या सुरुवातीलाच निशाच्या पोटात अचानक दुखायला लागलं…

घरच्यांनी घाईगडबड करुन तीला दवाखान्यात भरती केलं..dr.नी पुर्ण bedrest सांगितला….
पुढे काहीच risk नको म्हणुन घरच्यांनी सुद्धा होकार दिला…निशाचा एक ..दिड महिना दवाखान्यातच गेला.. समर्थ..dr.. प्रत्येक जण परोपरीने काळजी घेत होते…
आणि ती वेळ…..तीच्या delivery ची…निशाच्या पोटात कळा मारायला सुरुवात झाली होती…निशा कळवळत होती… समर्थ खुप घाबरला होता..निशाची अवस्था त्याला पाहवतं नव्हती…
तीला आतमध्ये नेऊन अर्ध्या तासात तीची normal delivery झाली….पण बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता…dr. नी लगेच शिशु दवाखान्यात भरती करायला सांगितलं…

समर्थ आणि घरचे लागलीच बाळाला घेऊन शिशु दवाखान्यात गेले…
बाळाच्या आनंदाजागी आता प्रत्येकाच्या मनात काळजी..चिंतेची जागा घेतली होती…
समर्थ तर जाम घाबरला होता… बाळ जन्माच्या आधीच निशा आणि बाळाचं नातं त्याने पाहिलं होतं…तीच्या चेहऱ्यावरचा आनंद ..तीच वागणं बोलणं..उत्साह त्याच्या झरकन नजरेसमोरुन तरळुन गेला…
शिशु दवाखान्यात बाळाला काचेत ठेवुन दोन दिवस झाले होते… बाळाच्या तब्येतीत सुधारणा होत होती..

निशा.. घरचे .. खुप आनंदात होते..निशाला दवाखान्यात येऊन आता दोन महिने झाले होते..आणि या दोन महिन्यांत घरातील देव पाण्यात होते…
निशाजवळ समर्थ…आणि बाळाजवळ समर्थंचे आई -बाबा..असे राहत होते…
एका दुपारी समर्थ बाहेर औषधं आणायला गेला होता..मोबाईल निशाजवळ राहिला होता..
आणि मोबाईलची रिंग वाजली..
निशा नुकतीच उठुन बसली होती…तीने call उचलला…

“समर्थ.. समर्थ आपलं बाळं..आपलं बाळ गेलं रे…” समोरुन बाबा अगदी रडवेल्या सुरात म्हणाले..
आणि निशाच्या हातुन मोबाईल खाली पडला…डोळे स्तब्ध…ती तशीच बेडवर स्थिर बसुन..काहीच हालचाल न करता किती वेळ होती तीचं तीलाही माहित नाही…
थोड्या वेळाने समर्थ औषधं घेऊन आला…निशा अजुन तशीच स्तब्ध होती..
“निशा..निशा..” समर्थ च्या हाकेला निशाचा काहीच प्रतिसाद नव्हता…
त्याची नजर तीच्या हातात असणाऱ्या मोबाईल वर गेली…

त्याने पटकन तो on करुन पाहिला तर नुकतेच बाबांचे एक -दोन missed call येऊन गेले होते..त्याने लगेच call back केला..
“Hello बाबा.. तुम्..” समर्थ अजुन काही बोलणार..तेच त्याच्या कानावर रडण्याचा आवाज आला..
समर्थच्या काळजात धस्स झालं..समोर निशाची हि हालत..आणि मोबाईलवर रडारड ऐकुन त्याच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले…
त्याने तसाच मोबाईल ठेवुन लगेच शिशु दवाखान्यात गेला तरी त्याला पोहचायला १५-२० मिनिटे लागलीच‌…
समोरचं दृश्य पाहुन त्याला काही कळायला मार्ग नव्हता..आजुबाजुची गर्दी… ambulance …रडण्याचे आवाज..fire alarm..
तो सगळ्यांना मागे टाकत आत गेला..आणि बाबांना शोधु लागला..

पण बाबा कुठेच दिसत नव्हते..त्याने call केला पण call सुद्धा received होत नव्हता‌…
“बाबा” त्याने सभोवताली नजर फिरवत मोठ्याने हाक मारली‌…
“माझं बाळं गेलं माझं बाळ” आजुबाजुच्या गर्दीतुन आवाज ऐकु येत होते …इतक्यात nurse staff जो सगळ्यांना बाहेर काढत होता त्याने समर्थला मागे ढकललं..
तसाचं हात धरुन समर्थने त्या मुलाला मागे ढकलुन दिलं…समर्थ तसाच बेभान होऊन.. जिथे बाळाला ठेवलं होतं तिथे पोहचला …
त्या department मधुन सगळीकडुन धुर येत होता..तरीही तो आत गेला..‌काय शोधतोय त्याचं त्याला कळतं नव्हतं ..

रुमची अवस्था बेकार झाली होती..धुराने सगळचं काळवंडून गेलं होतं..श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता..
तरीही समर्थ त्या रुममध्ये इकडुन तिकडे सगळं उलथापालथ करुन शोधत होता… 
“ओ sir please तुम्ही बाहेर चला..” दोन मुलगे समर्थच्या हाताला ओढत बाहेर घेऊन जायला आले..
“माझं बाळं कुठाय…?” …दम टाकतच..खोकतच त्याने त्या मुलांना विचारलं..
ते काहीही न बोलता त्याला जबरदस्तीने बाहेर घेऊन गेले..एव्हाना पोलीस आले होते .. त्यांनी जबरदस्तीने सगळ्यांना बाहेर काढलं…

समर्थ हताश होऊन गुडघ्यावर बसुन समोर पाहत होता…
“समर्थ”..त्याला त्याच्या खांद्यावर हात जाणवला..त्याने मागे वळुन पाहिलं ती आई होती..त्याने तसचं मागे वळुन आईच्या कमरेला विळखा घालुन रडु लागला…
“आई..आ..पलं बाळं कुठेय..आपलं बाळं..”त्याला भरुन आलेल्या कंठातुन बोलवलं सुद्धा जात नव्हतं..आईने तसाच त्याला उराशी कवटाळलं….
“आम्ही इथेच बाहेर बसलेलो होतो अचानक आतुन धुर यायला लागला..आधी काही समजलचं नाही नंतर आतुन एक नर्स आग आग म्हणुन ओरडत आली..आम्हाला कुणालाच आत जायला देत नव्हते रे…त्यांनी दरवाजा उघडताच आतुन एकदम भडका उडतो तसा धुराचा लोळ बाहेर पडला…

थोड्याच वेळाने त्यांनी आत जाऊन बाळांना ambulance मधुन दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेले…मी आतापर्यंत तिकडेच होतो‌…पण काहीच उपयोग नाही झाला रे…श्वास कोंदटुन आपलं बाळं..”..इतकं बोलुन बाबांनी चेहऱ्यावर हात घेऊन हमसुन रडायला लागले..
“निशा कुठे आहे..तीला काही सांगु नकोस” अचानक आठवण व्हावी तसं बाबांनी समर्थला विचारतं बजावत होते…
निशा….निशाचं नाव ऐकताच त्याचं काळीज परत धडधडायला लागलं…
“बाबा तुमचा पहिला call तिनेच उचलला… ती ..ती कशी असेल …मी पण..तीला तीथे… ती एकटी..बाबा‌….” 
समर्थ आणि आई बाबा लगेच संजीवनी दवाखान्यात निघाले…

 तिथे येताच त्यांना निशाचा ओरडण्याचा आवाज ऐकु आला.. समर्थ धावत निशाच्या रुमजवळ आला..नर्स आणि dr . जबरदस्तीने निशाला पकडुन होती…निशाच्या हातात चाकु होता…हातातुन थोडं थोडं रक्त सुद्धा निघालं होतं…
ते पाहुन समर्थ पटकन निशाजवळ गेला लगेच त्याने तीच्या हातातुन चाकु फेकुन दिला…
तस नर्सने तीला सोडलं..ती उभी राहुन पुन्हा चाकु घ्यायला धावली समर्थने मागुन तीला घट्ट पकडलं..
“सोड सोड मला…मी माझ्या बाळाला आणायला जातेय..बाळ हवयं माझं..तु देणार आहेस ..देणार .. नाही ना..कसा देशिल..नाहिच आहे ते या जगात.. ” विचित्र हातवारे करत ती हसत अचानक रडु लागली..

“माझं बाळ…” तीने मोठ्याने टाहो फोडला..समर्थने तीला जवळ घेतलं तस तीने त्याला ढकललं ..आणि परत चाकु घ्यायला गेली …इतक्यात नर्सने तीच्या हातावर injection दिलं..ती डोळ्यांची उघडझाप करत खाली पडली…
समर्थ ने तीला बेडवर नीट झोपवलं..नर्सने समर्थला dr. च्या cabin मध्ये जायला सांगितलं…
समर्थ लागलीच dr.च्या cabin मध्ये गेला….
Dr. त्याचीच वाट पाहत होते…
“Mr. जोशी ..ऐकुन खुप वाईट वाटलं…पण ती बातमी direct अशी तुमच्या पत्नीला समजायला नको होती… खुप जास्त त्या बाळात involved झाल्या होत्या..

त्यामुळे असं अचानक त्यांना समजणं त्यांच्या mentally health ला नुकसानकारकं ठरलं..त्या mentally खुप disturb झाल्यात.. स्वतः ला नुकसान सुद्धा करुन घेऊ शकतात.. तुम्हाला त्यांची खुप काळजी घ्यावी लागेलं..”
“पण ती बरी होईल ना dr.”..समर्थने काकुळतीला येतं विचारलं…
“हे बघ स्पष्ट सांगतो ..हे आताच नाही सांगु शकतं..त्या औषधांना किती प्रतिसाद देतात..किती स्वतः हुन यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात यावर depend आहे…”dr.एवढं बोलुन त्याला काही औषधं व मानसिक संतुलन तज्ञ dr.चे suggestions देतात..

सद्यस्थिती….
निशा शांतपणे बेडवर झोपली होती…थोडीफार सुधारणा असली तरी अजुनही तीचे डोस चालुच आहेत..
कदाचित पुन्हा ती आई झाली असती तर जास्त लवकर बरी झाली असती …पण नियतीने तीला ते सुख सुद्धा पुन्हा दिलं नाही…बाजुला समर्थ तीची डायरी वाचत होता.. कितीही पानं चाळली तरी त्याची नजर त्या एकाच कवितेवर जाऊन स्थिरावायची..
दोन मिनिटं पाहिला मी श्वास रोखून 
अनुभवली जिवाची तडफड 
तुही असाच ना रे घुसमटला असशील काढत माझी आठवण
फक्त तुझाच नव्हता जन्म झाला           
जन्मले होते मी सुद्धा नव्याने
आईपणाची भावना प्रत्यक्ष अनुभवत होते 
कान आतुरलेत माझे पुन्हा तुझा आवाज ऐकण्यासाठी
डोळ्यांतील पाणीही सुकलय पुन्हा तुला पाहण्यासाठी
किती वर्षांनी उजवली होती कुस माझी 
शेवटी अर्धवटच राहिली रे तुझ्यासाठी          
केलेल्या नवसाची तयारी
तु अन् तुझ्यासहित हरवलय माझ आईपण
तुच सांग कस सहन करु आता हे जिवंतपणीच मरण…
*****
©® वैभवी आंबेकर
सदर कथा लेखिका वैभवी आंबेकर  यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!