पोशाख

©® Adv. Vinita Zade Mohalkar
सकाळी जरा उशिरा उठलेली रीमा घाईघाईने तिचे कामे आवरून ऑफिसला निघण्याची तयारी करत असते.
ती स्वतःसाठी आणि रोहन साठी डब्बा बनवते (रोहन म्हणजे रीमाचा नवरा). डबा बनवल्यानंतर ती तिच्या घरातील सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला सुध्दा ती विसरत नाही.
हे सगळे करेपर्यंत साडेनऊ झालेले असतात आणि ती पटकन तिच्या ऑफिसची बॅग घेऊन ऑफिसला निघणार, तोच तिच्या सासूबाई तिला, “अग रीमा कुठे चाललीस? आज घटस्थापना आहे ना देवीची पूजा आणि घटस्थापना झाल्यानंतर ऑफिसला जा.”
(असा जवळजवळ त्यांनी हुकूम सोडला).

सगळी तयारी झाल्यानंतर सुद्धा रीमाला उशिरा ऑफिसला जावे लागणार होते.
तोंड पाडून ती घरात येऊन बसली आणि सासूबाई सांगतात ती सर्व कामे करू लागली.
सासूबाई तिला हळूहळू पूजेचे सर्व सामान काढायला सांगतात.
नंतर किचनमध्ये जाऊन, “अग हे काय नाश्ता का केलास आज? तूला माहिती नाही का आज आमचा उपवास असतो ते?
उगी ऐवढे अन्न वाया घातलेस.”
आता हे ऐकून ती रीमा रडायची बाकी राहिली होती.

एक तर तिची आज खूप महत्त्वाची मिटिंग असते आणि मिटिंगला येणारे क्लाइंट हे परदेशातून खास या मीटिंगसाठी येणार असते. रीमाचे  प्रमोशनही या मिटींग वरच अवलंबून असते, त्यामुळे तिने स्वतःहून बॉस कडून आजच्या मीटिंगची सर्व जबाबदारी घेतली होती आणि अपेक्षेप्रमाणे तिने ऑफिसमध्ये आज सर्वांचे आधी पोहोचणे गरजेचे होते.
पुढे सासुबाई म्हणतात, “आम्हा दोघांचा उपवास असतो ना, आता तु जाताना दोघांसाठी डब्बा बनवलास तोही घेऊन जा आणि हो तो नाश्ता केलास तो पण तुमच्या दोघांसाठी घेऊन जा.”
रीमा बिचारी खाली मान घालून सगळे ऐकत असते.

एक तर ऑफिसला झालेला उशीर आणि त्यात सासूबाईंच्या सूचना रीमाला हे सगळे नकोसे वाटत असते पण करणार काय मन मारून ती हे सगळे करत होती.
शेवटी पूजेसाठी बोलवलेले गुरुजी घरी येतात आणि पूजेला सुरुवात होते .ही पूजा लवकर संपवावी म्हणून रीमा देवीकडे प्रार्थना करत होती, कारण तिला समोर तिच्या मिटींगचे टार्गेट दिसत होते.
गुरुजींची पूजा तासाभरात संपली. गुरुजी आपल्या पुढील कामासाठी गेले .
गुरुजी गेले हे दिसतात रीमा आपला डबा घेऊन पटकन ऑफिसला निघाली.

तोच पुन्हा सासूबाई, “अग जरा पाच मिनिटे थांब आताच पूजा झाली. एवढी कसली गडबड असते?”
रीमा- “आई प्लीज मला लवकर जाऊ द्या. आज माझी खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे.”
सासुबाई- “हे तुझे नेहमीच झाले बघ, नेहमी आपले काही काम आहे हे सांगायचे आणि घरातून बाहेर पडायचे. आत्ताच पूजा झाली देवीला पाठ लावून लगेच घरातून बाहेर जाऊ नये.”
आता मात्र रीमा चांगली चिडली.
रीमा- “तुम्हाला काय समजाचे आहे ते समजा, मी चालले मला उशीर झालाय असे म्हणून ती पटकन बाहेर आली.”

ती पटकन आपल्या कार मध्ये बसून ऑफिसला पोहोचली.
तोपर्यंत दूपारचे 12 वाजलेले असतात आणि आता मिटींगला दोन तासच शिल्लक राहिलेले असतात.        
ती ऑफिसला जाताच, संपूर्ण स्टाफ तिची वाट पाहतच उभा असतो.
तिला झालेला उशीर आणि सगळ्यांच्या बदलेल्या नजरा भेदत ती आत केबिनमध्ये पोहचते.
कुठल्याही क्षणी क्लाइंट येऊ शकतील याची तिला पुर्ण जाणिव झालेली असते.

तोच क्लाइंट एअरपोर्टवर आलेले आहेत. ते फ्रेश होऊन लगेच मीटिंगसाठी येणार आहेत. हा मेसेज तिला मिळतो.
लगेचच ती तिच्या टीम मेंबर्सला आपल्या केबिन मध्ये बोलावून आवश्यक तेवढ्या सगळ्या सूचना देते आणि मीटिंगसाठी ची रूम तयार करण्यास सांगते.
अगदी अर्ध्या तासात सगळी तयारी पुर्ण होते.
पुढे काही वेळातच रीमाला तिच्या बॉसचा निरोप येतो क्लाएंट ऑफिसच्या बाहेर आले आहेत.
रीमा अगदी अगत्याने त्यांच्या स्वागतासाठी बाहेर गेली आणि त्यांचे आपल्या भारतीय पद्धतीने खूप छान स्वागत तिने केले.

परदेशी पाहुण्यांचा तिने आपल्या देशी पद्धतीने चांगलाच थाट केला. त्यात सकाळी सासूबाईंनी गडबडीत घालायला लावलेल्या साडीमुळे रीमा आज साडी घालूनच ऑफिसला पोहचली होती, खरे तर तिला त्या परदेशी पाहुण्यांसमोर या साडी मध्ये खूप वेगळे वाटत होते, पण करणार काय ना?
काहीच वेळात मिटींगला सुरुवात झाली रीमाने तिचे सगळे पॉईंट्स आणि त्यांचे अपकमिंग प्रोजेक्ट इत्यादी बद्दल क्लाइंटला खूप छान माहिती दिली. आम्ही तुमच्या सोबत काम करायला कसे कॅपॅबल आहोत याची खूप छान माहिती तिने क्लाइंटला दिली.
खरेतर रीमाचे प्रेझेंटेशन खूप आगळेवेगळे आणि इम्प्रेसिव्ह होते. त्यानंतर तिने क्लाइंटच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.

एकूणच काय  रीमाचा मिटिंग मधला कॉन्फिडन्स आणि तिची आपल्या कंपनी प्रति असणारी भावना हे सगळेच त्या मीटिंगमध्ये जाणवले.
मीटिंग नंतर रीमा थोडी रिलॅक्स झाली होती. दरम्यान संध्याकाळी सहा वाजता रीमाला एका वेगळ्या नंबर वरून कॉल आला आणि समोरचा व्यक्ती आज रात्री डिनर मीटिंग ऍडजेस्ट होईल का तुमच्या टीम सोबत?अशी विचारणा करत होता.
रीमाने क्षणाचाही विचार न करता लगेचच या मीटिंगसाठी होकार दिला आणि फोन ठेवताच तिने आपल्याच टीम मेंबर्सला परत एका मीटिंगसाठी बोलवले. या मीटिंगमध्ये डिनरच्या जागेपासून ते आपली प्रेझेंटेशन अजून वेगळ्या पद्धतीने क्लाइंट समोर कसे मांडता येईल याचे सगळे मनसुबे आखले.

आता रीमाची टीम या मीटिंगसाठी पूर्णपणे तयार झालेली असते.
डिनर मीटिंग सुद्धा वेळेवर चालू होते.
मीटिंग चालू होताच रीमा तिच्या प्रेझेंटेशन बद्दल बोलण्यास सुरुवात करते तोच समोरून रिप्लाय येतो, ‘रिलॅक्स मॅम, आज आपण इथे कोणतीही ऑफिशियल मीटिंग करणार नाही आम्ही जस्ट तुम्हाला आणि तुमच्या टीमला इथे जेवायला बोलवले आहे.
खरे तर मला तुमच्या कंपनीसोबत हे काम करायला काहीच हरकत नाहीये आम्ही आमचा हा प्रोजेक्ट तुमच्या कंपनीला दुपारच्या मीटिंगमध्येच द्यायचे ठरवले होते. आताची मीटिंग म्हणजे आज पासून आपल्या कामाची सुरुवात झाली हेच आम्हाला तुम्हाला सांगायचे आहे.’

क्लाइंटचा होकार ऐकताच रीमा आणि तिच्या टीमला प्रचंड आनंद होतो.
क्लायंट सोबत डिनर झाल्यानंतर रीमा क्लाईंटला विचारते, “सर तुम्हाला आमच्या टीम मध्ये असे काय आवडले की तुम्ही हा इतका मोठा प्रोजेक्ट आम्हाला दिला?”
त्याचे उत्तर त्या परदेशी पाहुण्यांनी खूप छान दिले. “हा आपला प्रोजेक्ट एक संस्कृतीला धरून आहे. अगदी सकाळपासून तुमच्या वागण्यात जो आदर आणि संस्कृतीची जाण होती ती आम्हाला इतरत्र कुठेही पाहायला मिळाली नाही. तुम्ही आल्यापासूनच ज्या प्रकारे आमचे स्वागत केले आणि आम्हाला भारतीय संस्कृतीचे खूप छान दर्शन घडवून दिले.

तुम्ही आज केलेला विशेष पोशाख हा पोशाख पाहून तुम्ही आपल्या संस्कृतीला किती जपता आणि विशेष प्रसंगी आपल्या संस्कृती प्रमाणे पोशाख करता हे सगळेच आम्हाला एकंदरीत खूप आवडले आणि तुमचे टीम वर्क ही आम्हाला खूप आवडले त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट तुम्हाला द्यायचे ठरवले.
आपल्या क्लाइंट कडून आपल्या पोशाखावर इतकी छान टिपणी रीमाला आयुष्यात पहिल्यांदाच मिळालेली असते, मीटिंग नंतर रीमा धावत जाऊन तिच्या सासूबाईंचे पाय धरते आणि त्यांचे खूप आभार मानते.
©® Adv. Vinita Zade Mohalkar
सदर कथा लेखिका Adv. Vinita Zade Mohalkar यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही. या कथेचे अभिवाचन करण्यासाठी आणि यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी लेखिकेची परवानगी नाही याची व्हिडिओकारांनी नोंद घ्यावी.
कथेचे वाचन केलेला कुठलाही व्हिडीओ ( नावासकट असला तरीही) आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!