आरंभ ( भाग 1)

©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
सुलभाताई सकाळ सकाळ घरात बडबड करत होत्या – घरी म्हातारे सासू-सासरे आहेत याचं तरी भान ठेवा, लवकर उठून आवरत जा, घरातली मोठी माणसं उठण्याच्या आधी चहा करून ठेवायचा, एवढं पण रोज सांगून पण रोज हिला उशीर होतोच, असं अजून बरंच काही त्या बडबडत होत्या.
चहा करायला उशीर झाला म्हणून सुलभाताई चिडल्या होत्या, सारिका आपलं कामं बरं आणि आपण बरं अशा अविरभावात भाजी चिरत होती.
तेवढ्यात सारिकाचा नवरा सागर उठून बाहेर आला आणि सारिकाला बोलला काय झालं, तीने डोळ्यांनीच त्याला काही नाही असं खुणावलं, पण तो समजून गेला आई रोजसारखी सारिकाला बडबडते आहे.

दुपारचे जेवण पण थंड असते. बाई सकाळीच करून ठेवतात ना, कपडे सुकत घालणे, ते वाळल्यावर घडी करून ठेवणे, हि सर्व कामे कायम माझ्याच नावावर नां, मी थकून जाते. होत नाही आजकाल आणि रात्रीच्या जेवणासाठी ही बाईसाहेबांची वाट बघावी लागते आम्हाला दोघांना.
रात्रीसुद्धा बाई आल्यावर फ्रेश होणार मग जेवणाला लागणार. एकपण गोष्ट हि आल्यापासून मनासारखी झाली नाही एकतर हिला मुलगा नाही, किती नवस केले पण शेवटी मुलगीच झाली, तिचं चं कौतुक हिला.
सुलभाताई बोलतच होत्या. सारिकाने चपात्या करायला घेतल्या होत्या.
हे सर्व ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं.

सारिकाने श्रेयाला शाळेसाठी तयार केले आणि डोळ्यातली आसवं लपवत ती श्रेयाला घेऊन शाळेत सोडून ऑफिसला जायला निघाली.
दुपारचे जेवण झाल्यावर सुलभाताई आणि अशोकराव सहज बोलत बसले होते.
अशोकरावांनी सकाळचा विषय ऐकला होता, पण सकाळी मुलगा, सून कामावर जाण्याच्या गडबडीत असताना अजून गोंधळ नको म्हणून ते काहीच बोलत नसतं.
अशोकरावांनी दुपारी विषय काढला, आपली सून ऑफिस, घर, आणि श्रेयाला कित्ती छान सांभाळते, कर्तबगार आहे ती, कधी तुला उलटं बोलत नाही, सगळं गप्प ऐकून घेते, तू तीला समजून घेत जा ना जरा, काय होतं एक दिवस तुला चहा उशिरा मिळाला तर.
जरा तिची बाजू पण समजून घे नां, ती सकाळी ऑफिसला जाते ती रात्री येते, आल्यावर लगेचं स्वयंपाक करते.

पुरे झाले सुनेचे कौतुक, ऑफिसमध्ये काय ती ओझी उचलत नाही, दिवसभर कॉम्पुटरवर तरंच कामं असतं तिचं. पगार पण भरपूर आहे तीला, तुम्ही उगाच तिची बाजू घेऊ नका, मी तीला धाकात ठेवलीय ना म्हणून सगळं नीट करतेय ती समजलं तुम्हांला…..आपला एकुलता एक लेक आहे. त्याला तीने तिच्या तालावर नाचवले तर म्हणून तीला धाकातच ठेवते मी, माझ्या हुशारीमुळे हे घर नीट चालतंय… सुलभाताई बोलत चिडून आत निघून गेल्या.
संध्याकाळ झाली सारिका साडे सातला घरी आली आणि तीने फ्रेश होऊन नेहमीप्रमाणे स्वयंपाकाला सुरुवात केली रात्रीचे जेवण झाल, सारिका किचनचं कामं आवरत होती आणि तेवढ्यात सुलभाताईनी सागरला आपल्या खोलीत बोलावून घेतलं आणि बोलू लागल्या.

किती काम करतो माझा लाडका लेक, थकत असशील ना,मी पण थकते रे आता घरातले सगळे संभाळून. तुझ्या बायकोचाही सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा वेळ ऑफिसमध्ये. त्यातून वेळ मिळाला आणि लवकर आलीच ती कधी तर श्रेयाच्या मागे असते.
सुलभाताई लाडात येऊन बोलू लागल्या, मी काय म्हणतेय, कंटाळा आलाय रे, एक कामं करूया कां, आपण कुठेतरी बाहेर जाऊया कां रे पंधरा दिवसांसाठी, श्रेयाला पण सुट्टी पडेल आठ दिवसांनी आणि तुझ्या बायकोला काय नेहमीप्रमाणे सुट्टी मिळणार नाही. तर आपण चौघेच जावून येऊ.
सागर बोलू लागला, आई मी सारिकाला ह्यावेळी सुट्टी मिळते कां ती बघतो मग आपण एखाद्या ठिकाणी दहा – पंधरा दिवसांसाठी रहायला जाऊ, असं तो बोलल्यावर सुलभाताई मनातल्या मनात चडफडल्या, ह्याला आपण सारिकाला वगळून जाऊ असं बोलले मी तरी ह्याला बायकोच बरोबर हवी.

दोन दिवसांनी सागर सुलभाताईना बोलला आई मला आणि सारिकाला दहा दिवसांची सुट्टी मिळाली आहे आपण एका नवीन ठिकाणी जाऊ, एका मित्राने हे ठिकाण सुचवलं आहे, छान मोठा वाडा आहे एक गावात, छान मोकळ्या वातावरणात जावू, तुला छान वाटेल. हिरव्यागार शेतात घर आहे ते, सगळ्या सुखं सोयी आहेत, छान वाटेल तुला, गावचा फील आहे तिथे.
सुलभाताई बरं एवढंच बोलल्या.
त्यांना मनातून वाटलं, की बरं झालं त्या सारिकाची जिरली ते…..सागर गावच्या सारख्या ठिकाणी घेऊन चालला आहे, त्या सारिकाला वाटलं असेल हिल स्टेशनला नेईल हा. पण तिथे जाऊन हिला गाव चा फील काय आवडणार मुंबईची मुलगी हि…

आठ दिवसांनी सगळे त्या वाड्यात आले, खूप मोठा वाडा होता, खूप सुंदर निसर्गाच्या सानिध्यात ते घर होते, सगळ्यांना खूप आवडले. सुलभाताई आणि अशोकरावं खूप खुश झाले, पण सारिकाला मात्र त्या घरात खुपचं निगेटिव्ह वाटतं होतं…
तीने तसं सागरला बोलुनही दाखवले पण सागर तीला म्हणाला असं काही नसतं अगं तू अशी गावच्या ठिकाणी कधी येत नाहीस म्हणून तुला तसं वाटतं असेलं…
रात्री आठच्या सुमारास सगळे पोहोचले होते त्यामुळे जेवून सर्व जण झोपी गेले, खूप खोल्या होत्या वाड्याला, सुलभाताई आणि अशोकराव एका मोठ्या खोलीत झोपायला गेले.
सुलभाताईना झोप लागतच होती तो पर्यंत त्यांना कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला, त्या चिडल्या काय झालं ह्या श्रेयाला रडायला.

अशोकरावं म्हणाले श्रेयाला तर मी आताच पाणी पियायला गेलो होतो तेव्हा बघितलं, ती तर गाढ झोपली आहे, प्रवासाने दमली होती. आणि तू देवाचं नाव घेत जा मग काही होतं नाही आपली सारिका बघ एवढी शिकलेली आहे तरी देवाचं सगळं आवडीने करणार, सकाळी बत्ती करते, तिचं उपसानेच पुस्तक वाचते आणि तू बघ..आणि तिथे कोण नव्हतं अगं, मी तर आत्ताच तिथून आलोय, मला तर कुणीच दिसले नाही. त्या सारिकाला सारखं ओरडत असतेस म्हणून तुला भास होतात झोप तू, ऐकवत असते.
म्हणून काय झालं सासू आहे मी तिची, त्या ओरडून बोलल्या.
सुलभा ताई बोलल्या – पण खरंच अहो आता थोड्या वेळापूर्वी कोणाच्यातरी चालण्याचा पण आवाज आला मला, आणि आता रडण्याचा.

तू आराम कर आता, सकाळी इथे जवळच दत्ताचे मंदिर आहे. खुप सुंदर आहे. आपणही जाऊ सकाळी तुला फ्रेश वाटेल बघ. अशोकराव बोलले.
काही नको. मला नाही त्या सारिकासारखं देव – देव करायला आवडत.
तेवढ्यात लाईट्सगेले. म्हणून अशोकराव बॅटरी आणायला बाहेर गेले, आणि त्या काळोखात सुलभाताईना दरवाज्यावर एक स्त्री उभी आहे असं भासलं.
त्यांना वाटलं सारिका आहे, त्या सारिका सारिका बॅटरी आणं अगं असं ओरडू लागल्या, पण ती आवाज देत नव्हती.
अरे…. हि सारिका हाक कां देत नाही आहे आता उठावंच लागेल असं बोलत त्या जागेवरून उठल्या, दाराकडे बघितले आणि ओरडून बोलल्या ये सारिका, तेवढ्यात त्यांना कोणीतरी ढक्कल्यासारखं झालं आणि त्या तिथेच धडपडल्या. आणि ती सारिकासारखी दिसणारी आकृती गायब झाली.

जोराची हवा सुटू लागली, वातावरणात अचानक गारवा वाढला, सुलभाताईना खुप भीती वाटायला लागली.
अहो….,सागर कोण आहे कां या इकडे कोणीतरी.
सागर आणि अशोकरावं दारातून आत आले.
सुलभाताई बोलल्या ती सारिका तिथे समोर उभी होती पण हाक देत नव्हती.
सागर बोलला आई अगं ती कशी असेल ती आणि श्रेया कधीच्याच गाढ झोपल्यात.
सुलभाताई खूप घाबरल्या…
तेवढ्यात लाईट आले म्हणून सागर, सुलभाताई आणि अशोकराव त्याच रूममध्ये बोलत बसले, तेवढ्यात पुन्हा अचानक कोणीतरी किंचाळतंय असं ऐकू आलं आणि तिघेही दचकले.

तिघेही दरवाज्याच्याकडे बघू लागले..पण आवाज बंद झाला.. तिघेही खूप घाबरले. पुन्हा सुलभाताईना ती आकृती त्यांच्याकडे नजर रोखून बघतेय असं वाटू लागले, त्या ह्या दोघांना सांगेपर्यंत ह्या दोघांना पण ती बाई दिसू लागली. कशाचीही परवा न करता ते तिघे घराबाहेर पळाले.
धावतधावत तिघेही बाजूलाचं असणाऱ्या दत्त मंदिरात पोचले.
आपली सून आणि नात तिथेच राहिले की अशोकराव घाबरून बोलले.
आपलाच जीव धोक्यात होता. कसेबसे वाचलो आपण. त्या दोघी गाढ झोपल्या होत्या…उदया सकाळी बघू काय ते त्याजागी काही केल्या मी आता सकाळशिवाय जायची नाही आणि
तुम्हाला दोघानाही जाऊ देणार नाही, समजलं तुम्हांला सुलभाताई ओरडून बोलल्या.
क्रमश:
काय असेल त्या आकृतीमागचं सत्य?? आणि श्रेया आणि सारिका त्यातून कशा वाचतील ?? यासाठी वाचा उद्याचा भाग.
भाग 2 इथे वाचा
©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.

सदर कथा लेखिका सौ. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “आरंभ ( भाग 1)”

Leave a Comment

error: Content is protected !!