आरंभ ( भाग 2)

भाग 1 इथे वाचा.
©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.
सारिका सकाळी उठली आणि बाजूला बघितले तर सागर नव्हता, ती मनातल्या मनात बोलली रात्रीच बोलत होता सकाळी फ्रेश वातावरण अनुभवण्यासाठी इथे मॉर्निंग वाॅकला जायला पाहिजे, गेला वाटतं तो, असं बोलून ती उठली.
आज इथे खुप छान वाटतय. खूप फ्रेश वाटतंय , काल या वाड्यात आले होते तेव्हापासूनच काहीतरी निगेटिव्ह वाटत होते. पण आता तसं काहीच वाटतं नाही आहे. बरं झालं वरच्या माळ्यावर झोपलो ते छान गॅलरी आहे तिथे जाऊन कोवळ्या उन्हात जरा उभी राहते. असं ती मनाशीच बोलत राहिली.
तीने खाली कोण बोलतयं कां आवाज घेतला कोणीच बोलत नव्हते ती स्वतःशीच बोलली आई, बाबा ,सागर तिघेपण गेले वाटतं राऊंड मारायला.

तसंही सागर कायम आईच्याच बाजूने, मला पण येतेस कां विचारलं असतं तर चाललं असतं पण तो मला दुय्यम मानतो ना..
लग्नाला सात वर्ष होतं आली हे असं सगळं चालू आहे. जाऊ दे.. नशीब मानावे आणि गप्प राहावे, असंच मी ठरवलं आहे, बोलूनही काय होणार, काय झालं की सासूबाई लगेचं माझ्या आई, बाबांना माझ्याबद्दल काहीही वाईट सांगणार, बोलणार त्यापेक्षा राहु देत.
त्या देवाला मनातले सगळे सांगते आणि मन शांत होते. मला विश्वास आहे, देव आहे माझ्या पाठीशी आहे, माझे स्वामी पण आहेत.
ती अंघोळ करून खाली आली तेवढ्यात तीला सागर, अशोकरावं, सुलभाताई हे तिघे येताना दिसलें.
ती सगळ्यांना म्हणाली, मॉर्निंग वाॅकला गेलेलात वाटत, घाईघाईत सागर बोलला.
“कशी आहेस? श्रेया कुठे आहे? ”
सारिका गोंधळली आणि म्हणाली, ”मी ठीक आहे. श्रेया झोपली आहे, कां काय झाले? तुम्ही तिघे एवढे दमलेले, घाबरलेले कां दिसत आहात?”

“तुम्हांला दोघींना काल रात्री काही झाले नाही ना,” सागर काळजीने म्हणाला.
“काल ? कां काल काय झाल? आम्ही दोघी छान झोपलो होतो.” आता मात्र सारिका घाबरून म्हणाली कां काय झालं काय होतं, सांगाल कां….
तेवढ्यात दत्तमंदिरातून एक माणूस घरी आला आणि बोलला, काल रात्री तुम्ही तिघे रात्रभर मंदिरात होतात असं समजलं. मी सकाळी लवकर मंदिरात जाताना तुम्हांला बघितलं मग समजलं की रात्रभर तिथेच होतात असं. कां सहजचं थांबलात ना तिथे.सगळे ठीक आहे ना?
सारिका बघतच बसली. “रात्रभर मंदिरात? का?” सारिका बोलली काका तुम्ही आत या, चहा घेत बोलू .
मी आत येणार नाही. मी ह्या वाड्यात पाऊल ठेवत नाही, सदानंदरावं बाहेर पायरीवरच बसले.

सगळे बाहेर आले. सदानंदरावं बोलू लागले मी आता येत नाही ह्या वाड्याच्या , याच वाड्याने माझ्या मुलीचा जीव घेतला हो.
ह्या वाड्यात खूप वर्षांपूर्वी एक देशमुख कुटुंब राहायचं अहो, सावकार होते ते गावचे . त्यांनी त्यांच्या मुलासाठी माझ्या सुंदर, सालस मुलीला मागणी घातली आणि सून करून घेतली.
दोन वर्ष सगळं नीट होतं, दोन वर्षांनी तीला पहिली मुलगी झाली, पण सासरची मंडळी नाराजच होती. त्यांना मुलगा हवा होता. तीला सतत बोलले जायचे, पण ती बिचारी ऐकून घ्यायची.
पुन्हा तीन वर्षांनी ती गरोदर राहिली, सासू, सासरे सर्व वारसचं हवा बोलू लागले, सासरच्या माणसांनी तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली कि या वेळेस मुलगा हवा. पण तिच्या नशिबात मुलगा होणं नव्हतं, दुसरीही मुलगीच झाली.

अजूनच मुलीचे हाल सुरु झाले. सासरचे सगळे खूप नाराज झाले, भगताकडे जाऊ लागले, वारसासाठी तिच्यावर अजून काय काय अत्याचार तिच्यावर होत होते ते त्या भगवंताला ठाऊक, तिची आई दम्याने आजारी असते म्हणून माझ्या मुलीने आम्हाला तिच्या ह्या
त्रासाबद्दल काही सांगितलं नाही. आम्हाला त्रास होऊ नये म्हणून ती सगळं हे लपवायची.
दुसऱ्या मुलीच्या पाठीवर दोन वर्षांनी ती पुन्हा तिसऱ्यादा गरोदर राहिली, तेव्हा मात्र ती घाबरली ह्यावेळी पण मुलगी झालीच तर, आणि एकदा दोन दिवसासाठी माहेरी आली होती तेव्हा मला बाजूला घेऊन मला हे सगळं बोलली, मी पण तीला धीर देऊन बोललो ह्यावेळी तुला मुलगाचं होणार बघ. मी तीला बोललो ह्यावेळी तू नवव्या महिन्यात इकडे ये आम्ही करू तुझं बाळंतपण तर नको
म्हणाली.

ती सासरी गेली आणि तीन महिन्यांनी तीला नववा महिना चालू असताना ती रात्रीत जळून मेली असा सासरच्या बोभाटा केला. पण ते कारण काही आम्हाला पटले नाही. मनात येत होतं की तिची डिलिव्हरी ह्यांनी घरीच केली की काय आणि त्यात मुलगी झाली म्हणून हिला जाळून मारलं. मुलगी गेली आणि तिच्या दोन्ही मुलींना इथून मी माझ्या घरी घेऊन गेलो, मग पुन्हा या घरात कधीच पाय ठेवला नाही.
मी त्यानंतर दोन्ही नातीना घेऊन मोठ्या मुलाकडे रहायला गेलो. नंतर नंतर कळलं की कळले कि देशमुख घराणं पण नेस्तनाबूत झालं. मुलीचे सासू – सासरे एका अपघातात वारले. आणि ती बातमी ऐकून जावई वेडे झाले, काही – बाही बडबडत गावभर फिरू लागले, आणि एके दिवशी नदीत बुडून मेले. घरातली सगळी माणसं संपल्यावर मुलीच्या चुलत दिराने हे घर स्वतःच्या नावावर केले, थोडेसे ह्यात चेंजेस केले आणि आता ते रो – हाऊस म्हणून पर्यटकांसाठी दहा, बारा दिवसासाठी देतो तो.

गावातले लोक म्हणतात की माझ्या मुलीला ह्यांनी जाळून मारले त्यामुळे तिचं वाईट लोकांना त्रास देते.
पण तुमचा कालचा अनुभव ऐकून हे खरे वाटते की माझी मुलगी त्रास देत असावी. तुम्ही आता इथे राहू नका. लवकर निघा.
सगळ्यांनी वाड्यावरचे सामान आवरून गावातल्या एका दुसऱया घरात जाण्यासाठी तयारी केली.
सारिका हे सगळं ऐकून विचार करत बसली ,काल रात्री काय झाले याची तीला आता कल्पना आली होती. तिच्या मनाला काहीतरी खुप खटकत होते. सगळे एका दुसऱ्या बंगल्यात पोचले.
रात्री जेवताना सारिकाने सुलभाताईना विचारलं आई…“मला आणि श्रेयाला काहीच दिसले नाही. खरेतर आम्हाला खुप छान आणि गाढ झोप लागली होती. पण तुमच्याबरोबर काय झाले होते?…
अशोकरावांनी तीला सगळं सांगितलं…

“अरे देवा…खरेच…. एव्हढे सगळे झाले आणि मला कळले कसे नाही? सारिका बोलली.
सारीकां तुला काय वाटते ? त्या वाड्याने तुला काही त्रास का नाही दिला? अशोकरावं बोलले.
मलाही हाच प्रश्न पडला आहे, मला काहीच कसे कळलेही नाही? सारिका बोलली.
अशोकरावं म्हणाले, “त्याचे एकच कारण आहे. तुझी श्रद्धा. तुझी त्या देवावर, स्वामींवर खूप श्रद्धा आहे ना, आणि त्याचं श्रद्धेने दुष्ट शक्तीपासून तुमची राखण केली. तुझ्या देवाने तुला कसलीच झळ लागू दिली नाही.
पटकन वीज चमकावी तशी सारिका पेटून उठत बोलली, काल रात्री तुम्हाला सगळ्यांना माहित होतं कि इथे धोका आहे. तरीही तुम्ही सगळे मला आणि श्रेयाला सोडून गेलात. सागर अरे तू नवरा ना माझा तू पण आम्हा माय – लेकींना विसरलास.

आजपर्यंत मी कधी काहीच म्हंटले नाही. सगळे सहन करत राहिली, सासूबाईंचा जाच सहन केला. त्यांचा राग, नवर्याचं आईबद्दलचं अपार प्रेम, त्यामुळे बायकोला सतत तो दुरावत राहिला सगळं सगळं सहन केलं.. पण आज हद्द झाली…
तुम्ही माणुसकी सोडलीत, अरे अडचणीत आपल्या बायको आणि मुलीला एकटं सोडून जाणारा भ्याड नवरा मला नको आहे, आई वेड जरूर असावं, पण बायकोच कर्तव्य पण निभावावं, मी हे वागणे अजून सहन करणार नाही. अरे मला आणि माझ्या लेकीला तुम्ही
अडचणीत सोडून गेलात. कसली माणसं आहात तुम्ही…
आता मी तुम्हांला सोडून जाते आहे माझ्या मुलीबरोबर मला नवीन आयुष्याचा आरंभ करायचा आहे., ह्या सगळयाची सुरवात मी आज आणि आत्ता करत आहे.” असे म्हणून सारिका तिची बॅग घेवून लेकीबरोबर निघाली.

तिला असे जाताना बघुन सागर हादरला, सारिका मला माफ कर असं रडत बोलू लागला.
पण अशोकराव तीला थांबवू लागले आणि बोलू लागले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले,”बरोबर आहे तुझे पोरी, जी चूक त्या देशमूखांनी केली , तीच आम्हीही केली. घराच्या सुनेची आणि नातीची किंमत नाही केली घरच्या लक्ष्मीचा अपमान केला .. आता मी
या गुन्ह्याचे प्रायश्चित करणार मी तुला शब्द देतो की यापुढे आता या घरात कुणावरही अन्याय होणार नाही. आम्ही सगळे तुला सुखाने नांदवू, सुलभाताई पण बोलल्या सारिका मला माफ कर..
सारिका पण अशोकरावांच्या शब्दाचा मान राखून थांबली आणि आता सगळे मिळून गुण्या – गोविंदाने राहत आहेत.
©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे

सदर कथा लेखिका सौ. सोनल गुरुनाथ शिंदे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!
📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 thoughts on “आरंभ ( भाग 2)”

Leave a Comment

error: Content is protected !!