स्वाभिमान


©️®️ A.W.
रमा एक अतिशय शांत, समजूतदार आणि घरात सगळ्यांची लाडकी..इंटेरियर डिझायनर ची डिग्री घेऊन जॉब ला लागली आणि तिथेच तिची आणि राज ची भेट झाली.
पहिल्यांदा बघितले तेव्हाच त्याला ती आवडली होती. रमा दिसायला सुंदर तर होतीच पण तिचा शांत स्वभाव त्याला खूप आवडायचा. राज खूप बोलका होता त्यामुळे दोघांची छान मैत्री झाली होती. काही दिवसात च तो तिच्यात खूप गुंतला आणि ना राहून त्याने रमा ला प्रपोज केले.
पण रमा त्याला फक्त मित्र मानायची त्या पेक्षा जास्त तिने त्याचा विचारच नव्हता केला. राज नी जेव्हा तिला प्रपोज केले तेव्हा तिने खूप शांतपणे त्याला समजावले की कसे हे नाते पुढे जाऊ शकत नाही.

कारण होते रमाची आई, तिच्या आईला जावई हा खूप शिकलेला आणि श्रीमंत हवा होता आणि रमाला हे माहिती होते.
त्यामुळे तिने राजला नकार दिला आणि समजावूण सांगितले. तिचे बोलणे राज ला पण पटले आणि या पुढे आपण मित्र बनून राहू असे ठरले. (राज बद्दल हे सांगायचे कारण त्याचा रोल पुढे आहे.आत्ता थोडक्यात माहिती दिली फक्त)
पुढल्या काही महिन्यात रमाचे लग्न ठरले मुलगा चांगला शिकलेला आणि दुसऱ्या देशात जॉबला होता. नाव ठेवण्या सारखे काहीच नव्हते. एकमेकांची पसती झाली आणि लग्न ठरले.
लग्ना नंतर रमा खूप खुश होती. शुभम (रमाचा नवरा) आणि ती परदेशात गेले.
पाहिले २ वर्ष खूप छान गेलेत, पण नंतर नंतर रमाला शुभम थोडा वेगळा वाटायला लागला. पण तिने विचार केला की लग्ना नंतर अस होताच असेल आणि दुर्लक्ष केले.
२ वर्षांनी दोघे मायदेशी परतले आणि खर सांगायचे तर सगळे प्रॉब्लेम्स सुरू झालेत.

घरची मंडळी तशी गोड बोलायची पण सतत रमाची कोणा ना कोणा सोबत तुलना केली जायची. कधी तिच्या भाषेवरून तर कधी कमा वरून. तिला पण ह्या गोष्टी खटकायला लागल्यात आणि ती सतत विचार करायला लागली की आपल्यातच काही कमी आहे. आपल्याला काहीच जमत नाही..
असेच दिवस जात होते आणि सासरच्या मंडळीच वागणं त्रासदायक होत चालले होते. पण रमानी माहेरी काहीच सांगितले नाही. उलट आपण कसे सगळ्यांना खुश ठेऊ त्या मागे लागली. पण व्यर्थ, कारण घरात कोणालाच तिच्या बद्दल आदर नव्हता. पण तरी रमा सगळं सहन करायची. तिला असे वाटायचे मी जर माहेरी काही सांगितले तर आई बाबांना त्रास होईल आणि जसे सगळे म्हणतात तसे लग्ना नंतर प्रॉब्लेम होतात पण मग काही दिवसांनी किंवा मुलं झाल्यावर होईल ठीक, असा विचार करून एक एक दिवस ती काढत होती.
बरेच दिवसांपासून रमा नोकरी करायचा विचार करत होती. शुभामशी आज तिला बोलायचे होते.

संध्याकाळी शुभम ऑफिस मधून आला फ्रेश झाल्यावर दोघे बसले असतांना रमानी विषय काढला, आधी तर शुभम म्हणाला की तुला घर आणि नोकरी जमेल का? उगाच तुझ्या नोकरीमुळे आईला त्रास नको.
त्यावर हिने ठामपणे सांगितले की मी सगळं नीट सांभाळेल. हो नाही करता शुभम तयार झाला.. रमा तर जाम खुश होती, तिने लगेच तयारी सुरू केली आणि ३-४ ठिकाणी अर्ज केलेत.
काही दिवसात तिचे इंटरव्ह्यू झालेत आणि एका कंपनी मध्ये तिचे सेलेक्शन पण झाले.
घरचं सगळं सांभाळून रमा नोकरी पण करत होती सगळं नीट सुरू होते.
नोकरीमुळे आणि घरा बाहेर पडल्यामुळे रमाचा कॉन्फिडन्स वाढला होता. आता तील बरचं मोकळ वाटायला लागले होते.
रमा चे आयुष्य आता जरा स्थिर होत होते. शुभम पण आता तीच्याशी नीट वागायचा बोलायचा त्यामुळे ती खुश होती.
पण अजून सुध्दा तिच्या सासूला तिचे नोकरी करणे आवडत नव्हते त्यामुळे ती उगाच काही ना काही कुरापती काढायची.

पण रमा नी माघार घेतली नाही. सगळ्यां गोष्टींवर मात करून ती स्वतःला सिद्ध करत होती.
आज रविवार होता त्यामुळे दोघांना पण सुट्टी होती. रमा आपली नेहमीची काम आवरत असतांना तिला गरगरायला लागले आणि मळमळ होत होती. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपली कामं आटपून थोडा आराम करायला खोलीत आली तेव्हाच तिला उलटी सारखे वाटले आणि ती वॉश रूम मध्ये पळाली.
तिला तसे बघून शुभम काळजीत पडला जशी रमा बाहेर आली तसेच तो काय झाले या आविर्भवात तिच्याकडे बघत होता. रमा बेडवर बसली आणि आज सकाळ पासून काय काय झाले ते सांगू लागली.
ते ऐकून तो लगेच म्हणाला आपण डॉक्टरकडे जाऊयात पण रमानी त्याला मेडिकल मध्ये जाऊन प्रेगनान्सी किट आणायला सांगितली. शुभम च्या चेहऱ्याला आनंद,काळजी गोंधळ असे सगळे भाव उमटले पण त्याने जास्त विचार ना करता जाऊन किट घेऊन आला. टेस्ट केल्यावर रिझल्ट बघून रमा खूप खुश झाली.

तिने लगेच शुभमला ही गोड बातमी सांगितली त्याला तर इतका आनंद झाला की त्याने रमा उचलून घेतले. पण रमा ओरडली, अहो, खाली सोडा पटकन त्याच्याही लक्ष्यात आले आणि त्याने खाली सोडून लगेच तिला मिठीत घेतले.
रमाच्या सासूला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्या खूप खुश झाल्यात.
पण म्हणतात ना कधी कधी देवाच्या मनात काय असते हे कळत नाही सुखाची चाहूल लागताच दुःख पण मागे मागे येतेच. ३-४ दिवस झाले असतील ही गोड बातमी कळली तेव्हाच शुभमची नोकरी गेली. त्याच्या ऑफिस मध्ये बरेच जणांना नोकरीहून कमी केले होते. हे ऐकून सगळ्यांना टेन्शन आले. पण काही तरी चांगले होईल दुसरा जॉब मिळेल अशी आशा ह्या दोघांना वाटत होती. त्यामुळे शुभम नोकरी शोधायला लागला..पण इकडे रमाच्या सासूबाईंच्या डोक्यात भलत्याच गोष्टींनी घर केले होते.

रमाची गोड बातमी कळणे आणि शुभमची नोकरी जाणे ह्याचा संदर्भ त्यांनी बाळाचा पायगुण चांगला नाही असा जोडला, आणि मग छोट्या छोट्या गोष्टींवरून त्या रमाला आणि बाळाला बोलायला लागल्यात. रमा हे सगळं सहन करत होती ह्या आशेवर की शुभमला जॉब मिळेल आणि सगळं नीट होईल.
असेच दिवस जात होते पण शुभमला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे तो पण खूप चिडचिड करायला लागला आणि त्याला दारूचे व्यसन लागले . पण ह्या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली होती ती म्हणजे रमाचे प्रमोशन झाले होते आता तिला वाटले की सगळं ठीक होईल. पण तिला काय माहिती अजून तिचा त्रास संपणार नव्हता.
शुभमला नोकरी मिळत नव्हती त्यामुळे तो बिथरला होता आणि त्याच्या आईच्या डोक्यात बाळा विषयी निगेटीव्ह विचार आधीच आले होते. त्यामुळे आता त्याच्या आईने त्याचे कान भरायला सुरुवात केली.
शुभमला पण बायको पुढे जाते आहे ह्याचा आता त्रास व्हायला लागला आणि आई जे सांगायची ते त्याला पटायला लागले.

त्यामुळे तो पण रमाला बोलायला लागला, त्रास द्यायला लागला.
रमा सगळं शांतपणे सहन करत होती. बरेचदा नशेत असताना शुभम रमावर हात पण उचलायचा पण शेवटी रमाच ती कोणाला काही ही न सांगता सगळं सहन करत होती.
आता रमाला सातवा महिना लागला होता ती माहेरी आली होती आणि तिचे डोहाळे जेवण करायचे ठरले. ठरल्या प्रमाणे सगळे जमलेत आणि कार्यक्रम सुरू झाला सगळे खुश होते फक्त शुभम आणि त्याची आई फार खुश दिसत नव्हते.
कार्यक्रम संपला आणि आता फक्त घरातली मंडळी बसली होती. शुभम रमाला घेऊन आत गेला आणि तेव्हा रमाच्या लक्ष्यात आले की आज सुद्धा तो दारू पिऊन आला. त्यावरून त्यांचे भांडण झाले. आजच्या दिवशी तरी त्याने असं करायला नको होते हे रमाला वाटत होते. बोलता बोलता भांडण वाढले आणि शुभामनी रामावर हात उचलला आणि नशेत तो बोलून गेला की हे बाळ माझे नाही. हे ऐकून रमा शॉक झाली. तिला त्याचा बोलणं ऐकू येणे बंद झाले तिच्या कानात फक्त एकच वाक्य ऐकायला येत होते म्हणजे हे बाळ माझे नाही.

त्यांचा आवाज ऐकून घरातले सगळे तिथे जमले होते आणि शुभम चे बोलणे ऐकून सुन्न झालेत. शुभम अजून पण बडबडत होता तेव्हढ्यात रमा उठली आणि काही ही विचार न करता करता तिने शुभम च्या कानाखाली मारली.
बरेच वर्ष ती बऱ्याच गोष्टी सहन करत आलेली पण तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले तिला सहन झाले नाही.
शुभम आणि त्याची आई बघतच राहिलेत. शुभम तर शुद्धीत नव्हता त्यामुळे त्याच्या आईने रमाकडे रागात बघितले आणि त्याला घेऊन निघून गेली.
ते गेल्यावर रमा सुन्न होऊन शून्यात बघत बसलेली. बराच वेळ झाला पण ती काही बोलत नाही हे बघून तिची आई तिच्या जवळ आली. मायेनी तिच्या डोक्यात वरून हात फिरवला.
तिने आईकडे बघितले आणि लगेच गळ्यात पडली बराच वेळ रडत होती आणि आई तिला शांत करत होती.

दुसऱ्या दिवशी सगळं शांत होते. रमाला वाटले शुभम येईल किंवा फोन करेल पण असा काही झाले नाही. हिने फोन केला तर त्यांनी रिसिव्ह केला नाही. सासूबाईंना फोन केला तर त्यांनी सांगितले की आम्हाला तुझा तोंड बघायचा नाही. तू तुझा काय ते बघून घे. हे ऐकून तर रमाच्या पाया खालची जमीन सरकली ती पुन्हा रडायला लागली. पण रडत रडता ती शांत झाली.
काहीतरी विचार करून डोळे पुसून उठली आणि आईला म्हणाली, “आई मला आता हे नाते नको आहे. मी घटस्फोट घ्यायचे ठरवले आहे. मी खूप सहन केले पण माझ्या बाळाला काहीच सहन करू नाही देणार.”
कालचा प्रकार बघत आईनी तिला आडवले नाही. निर्णय खूप मोठा होता पण शेवटी प्रश्न तिच्या स्वाभिमानाचा होता त्यामुळे ती ठामपणे स्वतःला तयार करत होती.
तिला माहिती होते बरेच प्रॉब्लेम्स येतील सगळं खूप कठीण असेल पुढे पण तिला ते मान्य होते.
अखेर त्यांचा घटस्फोट झाला आणि रमाचे एक नवीन आयुष्य सुरु झाले.

रमाला गोड मुलगी झाली होती ती आता ती २ वर्षाची होती. रमा पण खूप बदलली होती. खूप कष्ट घेऊन तिने नोकरीमध्ये प्रमोशन मिळवले होते. या २ वर्षात खूप गोष्टी घडून गेल्या. खूप संकटं आलीत पण रमा खंबीरपणे सगळ्या गोष्टींना समोरी गेली आणि आज स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. या २ वर्षात रमानी एक आश्रम पण सुरू केला होता ज्या स्त्रियांना कोणाचा सहारा नव्हता त्यांच्यासाठी आणी ह्या सगळ्यात तिला मदत केली ती राज ने. हो तोच राज जो रमावर खूप प्रेम करायचा आणि म्हणूनच त्याने लग्न नव्हते केले.
एके दिवशी अचानक राज आणि रमाची रस्त्यात भेट झाली. आणि त्या दिवसा नंतर राजने रमाची खूप मदत केली.
या एका वर्षात राजचे तीच्यावरचे प्रेम रमाला बरेचदा जाणवले होते. पण ती किंवा तो कोणीही ह्या विषयावर बोलले नव्हते. ती सोबत आहे ह्यातच त्याला आनंद होता.
त्याला त्याच्या रमानी स्वाभिमानाने जगावे इतकीच इच्छा होती आणि कदाचित आपण लनाचा विषय काढला तर ती दुखवेल म्हणून तो शांत होता. एव्हाना रमाच्या आईला पण राज बद्दल कळले होते, त्यामुळे तिच्या आईने एकदा तिच्याशी बोलायचे ठरवले. आईने तिच्याशी बोलून समजावून तिचा होकार मिळवला आणि दोघांचे लग्न लावून दिले.
शेवटी राज ला त्याची रमा मिळाली आणि रमाला चांगला जोडीदार मिळाला.
समाप्त.
©️®️ A.W.

सदर कथा लेखिका A.W. यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!