आई – सावली मायेची

©️®️ A.W.
आश्र्विनी,आश्विन आणि ४ वर्षाची आस्था हे तिघे मुंबईहून पुण्याला येत होते. मस्त गाणे ऐकत आणि गात प्रवास सुरू होता.
पुण्यात एन्ट्री करता करता आश्विन नी करकचून ब्रेक लावला आणि सगळे अचानक सीटवरून पुढे आलेत. अश्विनी तर आश्विन कडे बघून ओरडलीच पण आश्विन पुढे बघत होता आणि तो काय बघतो म्हणून अश्र्विनीची पण नजर समोर गेली.
बघते तर काय तिथे एक आज्जी खाली पडली होती. गाडीला आज्जी धडकल्या नव्हत्या पण अचानक समोर आलेल्या आणि तिथे चक्कर येऊन पडल्यात.
त्यांना तसा बघून आश्विन खाली उतरला आणि त्यांच्या जवळ गेला. तो पर्यंत अश्विनी पण पाण्याची बॉटल घेऊन खाली आली. आज्जीच्या चेहऱ्यावर पण मारले,आज्जी शुद्धीवर आल्यात पण खूप अशक्त दिसत होत्या.

ह्या दोघांनी त्यांना उचलले आणि गाडीत बसवले.
दोघे पण घाबरले होते. त्यामुळे आज्जीना घरी घेऊन जाऊ आणि मग काय ते विचारू असा विचार केला त्यांनी.          
आज्जी अजून पण डोळे मिटून सीटला टेकून बसली होत्या. आस्था त्यांना फक्त बघत होती. सगळे घरी पोहचलेत.
आज्जीना गेस्ट रूम मध्ये झोपवून आश्विन आणि आश्विनी हॉल मध्ये तरुण बसलेत.
वीणाने पाणी आणि चहा दिला. वीणा त्यांची कामवाली होती. ती तिथेच राहायची ह्यांच्या सोबत.
दोघे थोडे रिलॅक्स झाल्यावर विणानी अश्विनी ला विचारले ह्या आज्जी कोण आहेत.
अश्विनी ने घडलेला सगळा प्रकार सांगितला.आणि आज्जीला बघायला त्यांच्या रूम मध्ये गेली.

तेव्हढ्यात आज्जी शुद्धीवर आल्यात आणि भिरभिरत्या डोळ्यांनी सगळीकडे बघायला लागल्यात.
ते लक्ष्यात येता अश्विनी बोलली, “आज्जी घाबरु नका तुम्ही आमच्या गाडी समोर चक्कर येऊन पडल्या होत्या, म्हणून मग आम्ही घरी घेऊन आलोय.”
तेव्हढ्यात आश्विन पण रूम मध्ये आला. आश्विन डॉक्टर होता. त्याने आज्जी ला चेक केले आणि वीणाला सांगितले आज्जीसाठी खायला घेऊन ये.
आज्जीने वीणाने आणलेले जेवण भराभरा खायला सुरुवात केली सगळे बघतच राहिलेत. थोडे पोटात गेल्यावर आज्जीला बरे वाटले. थोड्यावेळाने आश्विन ने विचारले, “तुम्ही काही खाल्ले नव्हते का? पोटात काही नसल्याने तुम्हाला चक्कर आली होती…”
आज्जीने फक्त नाही मध्ये मान हलवली.

त्यानंतर आश्विन म्हणाला, “तुमचे नाव काय? कुठे राहता? मला नंबर द्या मी तुमच्या घरी कळवतो.”
हे ऐकून आज्जीच्या डोळ्यात पाणी आले ते त्यांनी पदराला पुसत बोलायला सुरुवात केली, “माझं कोणीच नाही. मी एकटीच आहे. इथे काही काम मिळेल ह्या विचारांनी आली होती. पण २ दिवस काम मिळाले नाही आणि माझ्या जवळ पैसे पण नव्हते जेवणासाठी. २ दिवस फक्त पाणी पिऊन होते.”
हे ऐकून दोघांना पण खूप वाईट वाटले.
अश्विनी आज्जीला म्हणाली की तुम्ही आराम करा आपण नंतर बोलुयात.
आज्जी ने हो म्हटले आणि हे दोघे रूम च्या बाहेर आलेत. दोघे पण शांतच होते.

हे दोघे पण अनाथ होते. एका आश्रमात ह्यांचे जीवन सुरू झालेले. खूप कष्ट करून मेहनत करून हे दोघे पुढे आले होते. पण आपल्याला कोणीच नाही ही खंत कायम होती मनात. आस्था पण आज्जी आजोबा बद्दल विचारायची तेव्हा ह्यांना आपल्या नशिबात का नाहीत आई वडील ह्याचे दुःख व्हायचे.
आज आज्जींची कहाणी ऐकून दोघांच्या मनात आले की आपण ह्यांना आपल्या घरी ठेऊन घेऊयात. तसा विचार सुरू असतांनाच आस्था आली आणि म्हणाली, “ही आज्जी आपल्याकडेच राहणार का??”
त्यावर दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि मग आस्था कडे बघून हसुन हो मध्ये मन डोलावली.
पण आश्विन पुढे म्हणाला की आज्जीला विचारायला हवे.
संध्याकाळी आज्जी उठून हॉल मध्ये आल्यात आणि म्हणाल्यात ”पोरांना मला आता जायला पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी खूप केले.” तेव्हा अश्विनी लगेच म्हणाली, “आज्जी तुम्ही इथेच राहा. आम्हाला आई मिळेल आणि आम्ही तुमची नीट काळजी घेऊ.”

हे ऐकून आज्जीने डोळे भरून आलेत. त्यांना पण आसरा हवाच होता म्हणून आज्जीने हो म्हटले आणि सगळे खुशीत सोबत राहू लागलेत.
असेच सोबत राहत एक वर्ष होऊन गेले. आस्था तर आज्जी सोबत खूप रमली होती.आज्जीला सगळ्यांनी खूप प्रेम,सन्मान दिला होता. आज्जी पण ह्या सगळ्यांना खूप जीव लावायची. सगळं छान सुरू होता. सगळे खुश होते.
आज मदर्स डे होता आणि आश्विन आणि अश्विनी ने आई साठी सरप्राइज प्लॅन केला होता.
आज मित्रांना घरी पार्टीला बोलावले होते. त्यांना सगळ्यांना आईची ओळख करून द्यायची होती. संध्याकाळी सगळे जमले होते. अश्विनी आईला घेऊन आली आणि सगळ्यांशी ओळख करून देत होती तेव्हढ्यात डॉक्टर सुमित तिथे पोहचला.
सुमित आणि अश्विनची एका कॉन्फरन्स मध्ये भेट झालेली आणि तेव्हा पासून ते मित्र बनलेत. आज त्याला पण पार्टीला बोलावले होते.

सुमित ने आश्विन च्या आईला बघितले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन बदललेत. आजी पण त्याला बघतच होत्या.
हे अश्र्विनीच्या लक्ष्यात आले. पण तिने काही विचारले नाही.
पार्टी सुरू होती पण आजी आणि सुमित ह्यांचे मूड ठीक नव्हते. ते काही तरी  विचार करता आहेत हे आश्विन च्या पण लक्ष्यात आले. पण तो शांत होता.
पार्टी संपली आणि सगळे निघून गेलेत पण सुमित थांबला होता.
हॉल मध्ये आता आई आणि सुमित दोघेच होते. त्यामुळे सुमित ने आईशी बोलायचा प्रयत्न केला पण आईने काही ही विचार ना करता त्याच्या कानाखाली मारली.
आईंचा परा चढला आणि त्यांचा आवाज ऐकून सगळे हॉल मध्ये आलेत.
आई सुमित ल निघून जायला सांगत होत्या.

ते ऐकून आश्विन पुढे आला आणि त्याने आईला सोफ्यावर बसवले पाणी दिले आणि शांत करत होता. आईच्या डोळ्यात पाणी होते आणि राग पण.
अश्विन त्यांच्या पाया जवळ बसला आणि काय झाले विचारले.
आई बोलायला लागल्या, “तू मला विचारले होते ना तुम्ही कुठे राहता? घरी कळवतो मी आणि म्हटले होते मला कोणीच नाही पण ते खोटं होता पोरा. मला एक मुलगा होता सून होती पण त्यांना मी नको होते. म्हणून त्यांनी मला कधीच जवळ केले नाही.आम्ही कष्ट करून मुलाला शिकवले डॉक्टर बनवले. मोठ्या शहरात आलेल आम्हाचा मुलगा काही दिवसांनी आम्हाला टाळू लागला आधी वाटले कामात असेल म्हणून असा वागत असेल पण एक दिवस त्याने फोन करून सांगितले की त्याने लग्ना केले आहे आणि आता तो कधीच गावी परतणार नाही आमची त्याला लाज वाटू लागली.
आम्ही पण मग नवरा बायको एकमेकांसाठी जगायला लागलो.पण काही वर्षात माझे मालक गेलेत आणि माझ्यावर खूप वाईट दिवस आलेत.

मुलगा कुठे असतो हे आम्हाला माहीत होते म्हणून मी एकटी पुण्यात आली. मुलाच्या घरी गेली तर चौकिदारा ने मला आता सोडले नाही. मी म्हटले डॉक्टर सुमित माझा मुलगा आहे. त्यांनी फोन लाऊन विचारले तर ह्याने मला ओळख नाही दाखवली. त्यामुळे चौकीदाराने मला हाकलून लावले.
२दिवस मी ह्याच्या बागल्या बाहेर होती पण ह्याला दया नाही आली माझी आणि मग जेव्हा तिथून निघाली तर फिरता फिरता तुमच्या गाडी समोर चक्कर येऊन पडले. ह्या माणसाला माणुसकी नाही आईची कदर नाही. ह्याला बघून तर असे वाटते मी निपुत्रिक राहिले असते तर बरं झाले असते. हे असे दुःख बघायला नसते लागले.”
हे सगळं ऐकून सगळे शॉक झाले होते आणि रडत सुद्धा होते.
सुमित ला त्याची चूक कळली होती त्याने आईला खूप शोधले होते.पण आईंचा शोध लागला नव्हता.
आज अस आईला समोर बघून सुमित भाऊक झाला होता आणि म्हणुच तो आईशी बोलायला आला होता.

पण आई खूप रागात होती. थोडा वेळ गेल्यावर आईच बोलली, “आश्विन मला ह्याच्या सोबत कुठे जायचे नाही. माझं कुटुंब हेच आहे. मला पुन्हा बेघर व्हायचे नाही आहे.” असा म्हणून आई रडायला लागली.
ते ऐकून आश्विन ने आईला मिठी मारली आणि रडायला लागला  सुमित नुसता बघत होता. अश्विनी आणि आस्था पण येऊन त्या दोघांना मिठी मारून उभे होते.
थोड्या वेळानी आश्विन सुमित जवळ गेला आणि त्याला सॉरी आणि thank you म्हणाला. thank you ह्यासाठी की सुमित मुळे अश्विनला आई मिळाली होती आणि सॉरी ह्यासाठी की आज सुमित्ने त्याच्या चुकीमुळे त्याच्या आईला कायमचे गमावले होते.
आश्विन सुमित ल म्हणाला, ”सुमित आपण कितीही मोठे होऊ देत पण आईच्या मायेची सावली कायम आपल्याला हवी असते रे. आणि वडिलांच्या शाबाशीची थाप आपल्या पाठीवर मिळायला हवी. कारण हीच खरी दौलत आहे आणि तू तेच गमावले आहे.

तू स्वतः खूप काही हरवून बसला आहेस. पण तरी मला खात्री आहे आईच्या आशीर्वाद तुझ्या सोबत असेल कारण ती राग करू शकते पण आपल्या मुलं बद्दल वाईट विचार कधीच करू शकत नाही. त्यामुळे आईंचा राग शांत झाल्यावर ती बोलेल तुझ्याशी पण त्यासाठी तुला आता वाट बघावी लागेल.
ते ऐकून सुमित तिथून निघून जातो आई आणि सगळे त्याला बघत असतात.
पण आई आश्विन चा हाथ हातात घेऊन उभी असते…
समाप्त
कधीही आईला दुखावू नका. कारण ती एकटीच असते जी आपल्या मुलांसाठी कायम कुठल्याही परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभी असते.
©️®️ A.W.

सदर कथा लेखिका A.W. यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकाकडे राखीव असून आमचा त्यावर काहीही अधिकार नाही.
धन्यवाद.!!!📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार …अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या ‘माझी लेखणी’ या फेसबुक पेजला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!