तथास्तु

©® सौ. वृषाली आशिष शिरूडे.माईनी रात्रीच आपल्या मनाशी निर्णय घेतला कि, उ‌द्या सकाळी उठल्याबरोबर बॅग भरायची आणि यात्रेला निघायचं. आपल्याला शांततेची गरज आहे. परत आल्यावर काय ते बघु आणि निर्णय घेऊ. त्यांना मनावर संयम ठेवणं कठीण जात होत, कारण वेगवेगळ्या प्रश्नांनी त्यांचे डोकं भणभणायला लागले होते. त्यांना सतत डोळ्यांसमोर स्वयंपाकघरात रंगलेल्या तिघींचा गप्पाच आठवत होत्या. … Read more

स्वाभिमान

©️®️ A.W.रमा एक अतिशय शांत, समजूतदार आणि घरात सगळ्यांची लाडकी..इंटेरियर डिझायनर ची डिग्री घेऊन जॉब ला लागली आणि तिथेच तिची आणि राज ची भेट झाली. पहिल्यांदा बघितले तेव्हाच त्याला ती आवडली होती. रमा दिसायला सुंदर तर होतीच पण तिचा शांत स्वभाव त्याला खूप आवडायचा. राज खूप बोलका होता त्यामुळे दोघांची छान मैत्री झाली होती. काही … Read more

अकेला हुं मै

©️®️अशोक रा. गोवंडेदमयंती आज तशी लवकरच उठली होती . स्वतःचं सगळं आवरून अगदी तयार होऊन बसली होती . हेमाला तिनं आज लवकरच यायला सांगितलं होतं . हेमा , तिची सोबतीण. दिवसभर तीन फक्त दमयंती सोबत राहायचं. बाजारहाट, बँकेत जाताना तिच्या सोबत राहायचं. शिवाय ब्रेकफास्ट , स्वयंपाक आणि इतरही कांही कामं असली तर ती करायची, यासाठी … Read more

मी घरीच तर असते…!

©️®️ अनुराधा पुष्कर.सकाळ ची रविकिरण खिडकीतुन डोकावू पहात होती. वंदना उठून फ्रेश होवून दोन मिनिट खिडकीतुन आकाशाकडे बघत होती. ताजी हवा, प्रसन्न वातावरण बघुन संपूर्ण दिवस पुरेल इतकी ऊर्जा स्वतः मध्ये साठवून घेत होती..“चला आवरून घ्याव पुन्हा उशीर होईल इथे थांबल तर..”असा विचार करत तिची पावले स्वयंपाक घराकडे वळली कारण रोजचीच कामं, स्वयंपाक, डब्बा, शाळेची … Read more

अनुबंध

©® धनश्री दाबके.लेक्चरमधून बाहेर पडल्यावर मीताने बॅगमधून मोबाईल बाहेर काढला. बघते तर नंदा आजीचे चार चार कॉल्स येऊन गेलेले. इतके कॉल्स.. काय झालं असावं? काहीतरी मेजर गोंधळ झाला असेल.. नाहीतर नंदा आजी इतके कॉल्स करणार नाही..मीच तर नाही ना काही माती खाल्ली.. गेल्या वेळेसारखा परत नळ तर चालू नसेल राहिला माझ्याकडून?मीताने घाईघाईने फोन लावला पण … Read more

परिवर्तन

©️®️ सौ.हेमा पाटील.“सरिता..ऐ सरिता ! कुठल्या विचारात एवढी हरवली आहेस”?सरिताने भानावर येत स्वतःला सावरले, “अगं काही नाही गं असंच”…“नाही.काहीतरी मेजर आहे..गेले चारपाच दिवस मी पहातेय तुझे काहीतरी बिनसलेय.मिलिंदमध्ये अन् तुझ्यात काही वाद झाला आहे का? मी बोलू का मिलिंदशी”?“नाही गं..तसं काहीच नाही.जरा माझीच तब्येत बरी नाही”.“काय गुड न्यूज देतेयस की काय”…यावर काहीच न बोलता सरिता … Read more

जबाबदारी

©️®️ सायली जोशी.“उद्या माझा वाढदिवस आहे. मला काय गिफ्ट देशील?” दीप्ती आपल्या नवऱ्याला विचारत होती.“बोल, काय हवंय तुला?” सारंग गाडी सुरू करत म्हणाला.“सरप्राईज म्हणून काहीही दे. बघ, दरवेळी असं होतं. मी जे मागेल ते तू मला आणून देतोस. कधीतरी तुझ्या मनाने ठरवत जा ना. खरंतर मला सरप्राईज खूप आवडतात रे. पण कोणीच देत नाही. मला … Read more

चिऊताई भुssर्र

©®सौ. प्रतिभा परांजपे.हर्षु ला जाग आली तीच  कूंssकूंs आवाजाने. त्याने घाबरून पांघरुण डोक्यापर्यंत घेतले तरी मधून मधून बारीक बारीक  कूंsकूंsअसा आवाज येत होता.काना वर उशी ठेवून थोड्यावेळ हर्षू पडून राहिला. पण तरीही आवाज ऐकू येतो होता.कोsण आहे बरं ??असा विचार करत हर्षु ने पांघरूण फेकून दिलं व बाहेर आला.एक छोटासा कुत्र्याचा पप्पी दारात थंडीने थरथरत उभा … Read more

एक चित्त थरारक रेल्वे प्रवास

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडेआज रागिणीचा सिक्स्थ सेन्स तिला काहीतरी वेगळेच इशारे देत होता. सकाळपासुन काहीतरी अनुचित घटना घडणार आहे,असे तिला वाटत होते.ती पोलिस स्टेशनला जायला निघाली. खरं तर हा सिक्स्थ सेन्स रागिणीला स्वतःच्या प्रोफेशनमध्ये सतत निष्ठेने प्रावीण्य मिळवल्याने अवगत झाला होता.ती मुंबईतील एक प्रख्यात पोलिस कॉन्स्टेबल होती. आपल्या क्षेत्रात आजवर तिने खूप मन लावून … Read more

नातं

©️®️सायली जोशी.तास उलटून गेला तरी वरुण एका कॅफेमध्ये बसून प्रियाची वाट पाहत होता.“सर, प्लीज काहीतरी ऑर्डर द्या. तुम्ही समोरची पाटी वाचली नाही का अजून?  कामाव्यतिरिक्त इथे जास्त वेळ  बसण्यास मनाई आहे.” वेटर तिसऱ्यांदा येऊन सांगून गेला. चेहऱ्यावरून तो पार वैतागलेला वाटत होता.इतक्यात प्रिया घाईघाईने येताना दिसली. तिला पाहून वरुणच्या कपाळावरच्या आठ्या सैल झाल्या. “सॉरी वरुण, ऑफिसचे काम खूप होते. शिवाय त्यात ट्रॅफिक! उगीचच तासभर तुम्हाला वाट पाहावी लागली. खरंच सॉरी.” प्रिया मनापासून म्हणाली.“ठीक आहे, चालायचंच. मी कॉफी घेईन.  प्रिया, तुम्ही काय घ्याल, कॉफी की आणखी  काही?” वरुण गडबडीने म्हणाला.“मला कॉफी चालेल.” ती थोडी रिलॅक्स होत म्हणाली.अगदी काही वेळातच मगाचसा वेटर गालातल्या गालात हसत कॉफी घेऊन आला.“प्रिया, माझा होकार मी आधी तुम्हाला कळवला आहे. आता तुमच्याकडून उत्तर येणं अपेक्षित आहे.” वरुण कॉफीचा घोट घेत म्हणाला. “हम्म..” प्रिया इकडे तिकडे बघत होती खरी, पण डोळ्यांच्या कोपऱ्यातून … Read more

error: Content is protected !!