चिऊताई भुssर्र

©®सौ. प्रतिभा परांजपे.हर्षु ला जाग आली तीच  कूंssकूंs आवाजाने. त्याने घाबरून पांघरुण डोक्यापर्यंत घेतले तरी मधून मधून बारीक बारीक  कूंsकूंsअसा आवाज येत होता.काना वर उशी ठेवून थोड्यावेळ हर्षू पडून राहिला. पण तरीही आवाज ऐकू येतो होता.कोsण आहे बरं ??असा विचार करत हर्षु ने पांघरूण फेकून दिलं व बाहेर आला.एक छोटासा कुत्र्याचा पप्पी दारात थंडीने थरथरत उभा … Read more

एक चित्त थरारक रेल्वे प्रवास

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडेआज रागिणीचा सिक्स्थ सेन्स तिला काहीतरी वेगळेच इशारे देत होता. सकाळपासुन काहीतरी अनुचित घटना घडणार आहे,असे तिला वाटत होते.ती पोलिस स्टेशनला जायला निघाली. खरं तर हा सिक्स्थ सेन्स रागिणीला स्वतःच्या प्रोफेशनमध्ये सतत निष्ठेने प्रावीण्य मिळवल्याने अवगत झाला होता.ती मुंबईतील एक प्रख्यात पोलिस कॉन्स्टेबल होती. आपल्या क्षेत्रात आजवर तिने खूप मन लावून … Read more

नातं

©️®️सायली जोशी.तास उलटून गेला तरी वरुण एका कॅफेमध्ये बसून प्रियाची वाट पाहत होता.“सर, प्लीज काहीतरी ऑर्डर द्या. तुम्ही समोरची पाटी वाचली नाही का अजून?  कामाव्यतिरिक्त इथे जास्त वेळ  बसण्यास मनाई आहे.” वेटर तिसऱ्यांदा येऊन सांगून गेला. चेहऱ्यावरून तो पार वैतागलेला वाटत होता.इतक्यात प्रिया घाईघाईने येताना दिसली. तिला पाहून वरुणच्या कपाळावरच्या आठ्या सैल झाल्या. “सॉरी वरुण, ऑफिसचे काम खूप होते. शिवाय त्यात ट्रॅफिक! उगीचच तासभर तुम्हाला वाट पाहावी लागली. खरंच सॉरी.” प्रिया मनापासून म्हणाली.“ठीक आहे, चालायचंच. मी कॉफी घेईन.  प्रिया, तुम्ही काय घ्याल, कॉफी की आणखी  काही?” वरुण गडबडीने म्हणाला.“मला कॉफी चालेल.” ती थोडी रिलॅक्स होत म्हणाली.अगदी काही वेळातच मगाचसा वेटर गालातल्या गालात हसत कॉफी घेऊन आला.“प्रिया, माझा होकार मी आधी तुम्हाला कळवला आहे. आता तुमच्याकडून उत्तर येणं अपेक्षित आहे.” वरुण कॉफीचा घोट घेत म्हणाला. “हम्म..” प्रिया इकडे तिकडे बघत होती खरी, पण डोळ्यांच्या कोपऱ्यातून … Read more

झुंज

©® दिपराज दत्ताराम माने.विक्रांत दावणीची गुरे सोडत होता. तोच विठ्ठलराव गोठ्यात आले. सर्जा जवळ जाऊन त्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला.” विक्या पुढच्या महिन्यात देव दिवाळीच्या दिवशी आपल्या सर्जाची झुंज ठरलेय. झुंज सड्यावर होणार आहे. मुरांबे गावच्या संग्राम पाटलाच्या बैला सोबत. तेव्हा आपल्या सर्जाला चांगला तयार कर. सकाळी संध्याकाळी पेंड भुशी खायला घालत जा. जितका खाईल … Read more

वंशाचा दिवा

©® मनिषा ठाणगे जाधव गावाबाहेर शेताच्या कडेला राधाबाईची  झोपडी होती. राधाबाई म्हणजे एक सत्तर वर्षाची म्हातारी.सगळे तिला राधाई म्हणायचे. वय झालेलं असलं तरी शरीरयष्टी मजबूत होती. राहणीमान सुद्धा नीटनेटके.दिवसभर स्वतःची कामे स्वतः च करायची. झोपडी आणि आजूबाजूचा परिसर देखील अगदी झाडून पुसून  स्वच्छ ठेवायची. झोपडीसमोर मस्त फुलझाडांची बाग फुलवली होती. त्यातलीच काही फुलं तिच्या लाडक्या … Read more

दरवळ

©® मृणाल शामराजमधुमालती.. टुमदार बंगली आज जराशी विसावली होती. अंगणातल्या मांडवातील दाराशी लावलेल्या लेकुरवाळ्या केळीच्या खांबांनी आता मान टाकली हॊती.येणाऱ्या वाऱ्याबरोबर झुलणाऱ्या मंडपाच्या कनातींची फडफड नकळत जाणवतं हॊती.सारं घरं कसं सैलावून, दमून भागून पहुडलं होतं.हॉलमधे सोफयावर मधुकरराव पण डोळे झाकून निवांत बसले होते.मालतीची आतबाहेर चाललेली लगबग त्यांना जाणवत हॊती.शेवटी तें न राहवून तिला म्हणाले, “अग, … Read more

भास आभास

©️®️ सौ.हेमा पाटील.ओह..नो यार… ! मोबाईल गाडीतच विसरला. रात्री साडेनऊ वाजता काॅन्फरन्स मिटींग आहे.आता परत खाली गेले पाहिजे.पण आधी फ्रेश होऊन चहा तर घेऊ,असे मनाशी म्हणत त्याने लॅचकी ने दरवाजा उघडला.हाॅलमध्ये मनु रोजच्या सारखीच टिव्ही वर सासु सुनेच्या नात्यात जेवढा तणाव आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विविध चॅनलपैकी एका चॅनेलवरील सिरियल मध्ये बिझी होती.रोजच्यासारखीच … Read more

कौतुक 

©️®️सायली जोशी.“आई, भाजी कशी झाली आहे?” मनाली आपल्या सासुबाईंना विचारत होती. पण सासुबाईंचे लक्ष होतेच कुठे? मनालीचा नवरा महेश आणि सासरे न बोलता, खाली मान घालून जेवण करत होते आणि वनिता बाई जेवता जेवता त्या दोघांचा अंदाज घेत होत्या. ‘अजून ‘हे’ काही बोलले नाहीत म्हणजे भाजी छान झालेली आहे! नाहीतरी एरवी ही कसली भाजी केली? म्हणून … Read more

आरंभ ( भाग 2)

भाग 1 इथे वाचा.©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.सारिका सकाळी उठली आणि बाजूला बघितले तर सागर नव्हता, ती मनातल्या मनात बोलली रात्रीच बोलत होता सकाळी फ्रेश वातावरण अनुभवण्यासाठी इथे मॉर्निंग वाॅकला जायला पाहिजे, गेला वाटतं तो, असं बोलून ती उठली.आज इथे खुप छान वाटतय. खूप फ्रेश वाटतंय , काल या वाड्यात आले होते तेव्हापासूनच काहीतरी निगेटिव्ह … Read more

आरंभ ( भाग 1)

©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.सुलभाताई सकाळ सकाळ घरात बडबड करत होत्या – घरी म्हातारे सासू-सासरे आहेत याचं तरी भान ठेवा, लवकर उठून आवरत जा, घरातली मोठी माणसं उठण्याच्या आधी चहा करून ठेवायचा, एवढं पण रोज सांगून पण रोज हिला उशीर होतोच, असं अजून बरंच काही त्या बडबडत होत्या. चहा करायला उशीर झाला म्हणून सुलभाताई चिडल्या … Read more

error: Content is protected !!