लक्ष्य

© धनश्री दाबके” ये, आलास? लवकर आलास.. आज तुझ्या रिकामटेकड्या मित्रांना चक्क कामं होती वाटतं. नाहीतर तू कुठला एवढ्या लवकर यायला?” आजोबांनी नेहमीप्रमाणे खोचक बोलतच अजितचं स्वागत केलं.त्यांच्या अशा तिरकस बोलण्याची सवय असलेला अजित काहीही न बोलता दारातून आत आला. गायत्री तेव्हा स्वैपाकघरातली मागची आवरा आवर, उद्या सकाळच्या डब्याच्या भाजीची तयारी वगैरे आवरून पोथी वाचायला … Read more

जागर शक्तीचा

©सौ. प्रतिभा परांजपे“ईशा, चहा गार होतो आहे, चल लवकर तुला क्लासला उशीर नाही होत आहे कां?“पहा ग वंदना “मंगलाताई सुनेला आवाज देत म्हणाल्या.वंदना ईशाला बोलवायला खोलीपाशी गेली. ईशा फोनवर रुपा, तिच्या मैत्रिणी शी बोलत होती,” तू नाही येत? मग मी पण नाही जाणार .”“पण कां? तुला काय प्रॉब्लेम आहे?” “मला भीती वाटते ग”तेवढ्यात वहिनीला पाहून … Read more

तू सुखकर्ता

©® मृणाल शामराज खणं.. जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून सुलभा बाहेर डोकावली. टीपॉय वर ठेवलेल्या तांब्यावरचं भांड खाली पडलं होतं.“अरे, सावकाश जरा.. किती घाई करशील?”“अगं आई, interview ला जायचंय ना, माझं लकी पेन कुठे ठेवलंय? सापडतं नाही आहे. शोधतोय.”“अरे, त्या टेबल वर बघ तिथेच असेल. बॅग भरलीस ना नीट?सगळी कागदपत्र, सर्टिफिकेट्स घेतलीस ना?” “हो … Read more

योगा

©️ कृष्णकेशव बराच वेळ झाला वैशाली ह्या कुशीवरून त्या कुशीवर लोळत पडली होती..आज तिला बेडवरून उठावसं वाटतं नव्हतं.. अर्धवट डोळे उघडून तिनं उशाखाली ठेवलेला मोबाईल काढून किती वाजले ते बघितलं ..सकाळचे साडेआठ झाले होते..! बाप रे..!कालच तिनं  ‘फिटनेससाठी योगा’चा आठ दिवसांचा ‘क्रॅश कोर्स’ पुर्ण केला होता..आणि तिच्या इन्स्ट्रक्टरनी आजपासून महिनाभर रोज सकाळी लवकर उठून करण्याचा एक … Read more

आईचं माहेर

© सायली जोशीसान्वी आणि मंदिरा दोघी मायलेकी आज बऱ्याच वर्षांनी मंदिराच्या माहेरी आल्या होत्या. परदेशी राहणारी आपली लेक अन् तिची लेक प्रत्यक्ष भेटायला आली म्हणून सुमेधा ताईंना कोण आनंद झाला होता! आल्या आल्या सान्वी सर्वांच्या पाया पडली. सुमेधा ताईंना बरं वाटलं, परदेशी राहूनही आपली नात संस्कार विसरली नव्हती.आई -वडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केलं आणि मंदिरा आपल्या … Read more

बंधन नात्याचे

©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदेशाळेतले दिवस संपून कॉलेजचे दिवस सुरू झाले होते. बी.कॉमच्या फर्स्ट इयरला असताना उनाड मुलांच्या यादीत सुयशचं नाव अग्रणी होतं. रस्त्यावर स्टंट करणे, कॉलेज कॅम्पसमध्ये मारामारी करणे यासाठीच सुयश ओळखला जायचा. या सगळ्या गोष्टींसाठीच त्याला वेळ पुरायचा नाही तर मुलींकडे पाहणंच सोडा. पण या सगळ्यात त्याला एक खूप साधी सरळ आणि अभ्यासू … Read more

सासर माझं सुरेख बाई….

© शुभांगी मस्केराधिकाचं लग्न प्रथमेश सोबत, अगदी कांदेपोह्याच्या साग्रसंगीत कार्यक्रमात, एकमेकांच्या घरातल्या सर्वांच्या पसंतीचे जुळलं. घरात प्रथमेश, प्रथमेशचे आई वडील, लग्नाची बहीण, बरोबरीचा भाऊ, एकंदर भरलं कुटूंब होतं..घरदार, गाडीघोडी आहे. मुलगा शिकलेला, संस्कारी, होतकरू आहेच शिवाय घराणंही सुशिक्षित आहे. राधिका बरोबरच सगळे खूप खूश होते, राधिकाने नशिब काढलं अशातली फिलिंग होती.  “घरात कोण कोण?” घरात लग्नाची … Read more

मृगजळ

©सौ. प्रतिभा परांजपेफ्लॅटचं लॅच बंद करून, किल्ली पर्समध्ये टाकत संध्या बाहेर निघाली. तेव्हा नुकताच सूर्यास्त झाला होता. जून महिन्याची ती प्रसन्न संध्याकाळ. बाहेर बागेतील मधुमालती भरगच्च फुलली होती. त्याचा मंद सुवास कडुलिंबाच्या मादक सुगंधाशी स्पर्धा करू पाहत होता. तो मादक सुगंध श्वासात खोल साठवत संध्या मार्केटला आली.मॉलमध्ये बरीचशी खरेदी झाल्यावर तिचे लक्ष सी.डी.ज ठेवलेल्या रॅककडे … Read more

ओव्हरलोड

©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणेश्री ICU मध्ये निपचित पडला होता. व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल असे डॉक्टर म्हणाले. आम्ही सगळे ICU बाहेर उभे होतो.डॉक्टर , सिस्टर सारखे आतबाहेर करत होते. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकत होता.दोन्ही मुलं आईला घट्ट बिलगून होती.सासरे सासूबाईंना धीर देत होते. आईच ती, आपल्या लेकाला अश्या अस्वस्थेत पाहून अस्वस्थ झाली होती. सलोनी, आपल्या नवऱ्याच्या … Read more

वास्तू

© मृणाल शामराज.किलबिल.. किलबिल.. हलकीशी चाहूल… हळूहळू तो रव वेगवेगळ्या नादात पसरू लागतो. ढगांची कड हळूहळू उजळू लागते.. तो कोकीळचा कहूकहू, कावळ्यांचे ओरडणे, तो चिमण्यांचा चिवचिवाट.. त्या निःशब्द काळोखाला चिरत पसरू लागलाय. घड्याळाचा अलार्म वाजतोय.. मी पण आळसावण सोडून सावरून बसलोय. ती उठली आहे. हात जोडून तिने प्रार्थना केलीये. मलाही वास्तू देवतायेन नमः म्हणून भक्तीभावाने … Read more

error: Content is protected !!