तुलना

© धनश्री दाबके“चल बाई नमिते, हात चालव पटपट. साडे दहा होत आले. आई येतीलच आत्ता आणि आल्या आल्या त्यांच्या खास स्टाईलने आढावा घेतील.. अजून भाजी शिजलीच नाही का? आणि डाळ वाटायचीच आहे का? कोंशिबीरीचा काय सीन आहे? वगैरे वगैरे.. त्यांनी येऊन तुझ्या टाईम मॅनेजमेंटचे धिंडवडे काढण्याआधीच कंबर कस बाई.” नमिता स्वतःशीच बोलत होती.“नमिते, अगं साडे … Read more

तुझ्यामुळे मी झाले आई

© सौ. प्रतिभा परांजपेराधिका तयार होऊन हाॅलमधे आली. बाबांनी हाॅल रंगीत फुगे आणि Happy Birthday च्या रंगीत झिरमिळ्यांनी सजवला होता.“झालीस तयार? किती गोड दिसतिय ग माझी राधिका. थांब –कानामागे काळी तीट लावते. माझीच नजर लागेल म्हणत सीमाने  बोटाने काजळाची  तीट लावली.“अजून आले नाही तुझे फ्रेंड्स?” बाबांनी विचारलं!“आई तू तर तयार हो ना लवकर.”“अग हो साडीच तर … Read more

आहेराची साडी

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)लेटरबॉक्स उघडताच मृण्मयीच्या लग्नाची पत्रिका बघितली अन् रेखा हरखलीच!! तिच्या माहेरचं.. नव्हे नव्हे.. आजोळचं कार्य!! कित्येक वर्षांनी तिच्या माहेरच्या लोकांनी तिची आठवण काढली होती.म्हणजे माहेरच्या लोकांशी रेखाचा काही तंटा नव्हता. पण तिचं माहेर मध्यमवर्गीय अन् वडील महानगरपालिकेत कारकून! परिस्थिती अगदीच जेमतेम पण पदरी तीनही मुलीच!रेखाच्या दोघी मोठ्या बहिणी दिसायला सामान्य पण … Read more

भातुकली

© अपर्णा देशपांडेअतिशय देखणा भव्य बंगला, समोर आखीव रेखीव फुललेली बाग आणि त्यावर सोडलेली संयत रोषणाई . मंद संगीत आणि हिरवळीवर मांडलेल्या सुबक टेबल खुर्च्या . सगळं चित्रातल्या सारखं मोहमयी .इनामदारांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न झालं होतं , त्याची आज छानशी छोटेखानी मेजवानी होती . रागिणी ताई आणि शशिकांत यजमान म्हणून जातीने सगळ्याची आवभगत करत होते … Read more

पण ती आईचं होती ना

©️ सायली पराड कुलकर्णी“आई चल तुझी बॅग घे गाडी आली” असं म्हणत आशिषने सुमतीबाईंना जवळपास ओढतच घरातुन बाहेर आणलं. काय घडतंय हे आपल्या बरोबर आपल्याच पोटच्या गोळ्याने हे दिवस दाखवावे आपल्याला! असा प्रश्न पडलेल्या सुमतीबाई डोळ्यातून वाहणारं पाणी कसं बसं थोपवत गाडीत जाऊन बसल्या.सुमतीबाईना वयापरत्वे आलेलं वृद्धत्व, त्यांच्या ह्यांचं जाणं, जमीन जुमला स्वतःच्या नावावर झाल्यावर पोटच्या … Read more

गुंतता हृदय हे

© सौ. प्रतिभा परांजपेसानिका घाईघाईने आर्ट्स आणि काॅमर्स काॅलेजच्या गेटमधे शिरली. स्पर्धा बरोबर अकरा वाजता सुरू होणार. आता पावणे अकरा वाजत आले. हातातल्या मोबाइल मध्ये स्पर्धेच्या विषयावर बोलायचे काही पॉइंट्स नोट केलेले होते त्यावर नजर फिरवत ती घाईघाईने पुढे जात होती, तेवढ्यात– कोणीतरी तिच्यावर आदळले.“… दिसत नाही कां हो?” असे म्हणत तिने वर पाहिले. दोन काळेभोर … Read more

रेशमी घरटे

© कांचन सातपुते हिरण्या” नानी कसं वाटतंय आता ? पाच-सहा दिवस झाले ना केस धुवून ?”नानींचं अवघडलेपण ओळखून माधुरी रोजसारखी बोलत होती. त्यांना अंघोळ घालून आवरून आणून तिनं बेडवर झोपवलं.नानींनी डोळे मिटून घेतले माधुरी गेली असं समजून, त्या पुटपुटल्या, “देवा कसलं हे दुखणं मागं लावलंस. त्यापेक्षा बोलावून घे लवकर. कशाला उगाच या पोरांना त्रास.”“नानी असं … Read more

चिरतरूण

© समीर खान ” हजारदा विचारलंय समीर पण तू ब्र काढत नाहीस.” शेल्फमधली पुस्तकं भिरकावत विभावरी आपला राग समीरवर काढत होती. ” सांगणार होतो गं, तुला माहितीये ना की मला वाचनाची आवड आहे? ”  समीर विभावरीशी लगट करण्याच्या प्रयत्नात होता. ” काही एक सांगू नकोस मला आणि अंगाला अजिबात हात लावू नको. ” विभू चांगलीच संतापली होती. … Read more

व्हायरलची कमाल

© वर्षा पाचारणे.“तू काय दिवसभर घरातच तर असतेस ! एक तर घरातली कामं करायची, नाही तर ते जुन्या साड्यांचे कपडे शिवत बसायचे.अगं बाजारात आजकाल एवढे फॅशनेबल कपडे येतात पण तुला ते नको… घरातल्या अशा जुन्यापुराण्या वस्तूंचे कपडे कोण घालतं आज-काल? आता परवा दिवशी आपण त्या साठे आजींच्या नातीला बघायला गेलो, तिथे काय प्रेझेंट म्हणून… तू … Read more

काळजी की काळजीचा दिखावा

©शुभांगी मस्के“किती ती मस्ती… आणि उगाच दंगा करता करता रावीची खेळणी इकडे लपव तिकडे लपव… या खेळण्याला हात लाव तर कधी त्या खेळण्याला हात लाव..’बाऊ… बाऊ’…करता करता मग एवढी मस्ती अंगात येते की काय सांगू?  कुठे धडपड धडपड नुसती. ताई, लहान लहान करता करता चांगलाच डोक्यावर बसलाय तो आता. रावी लहान आहे, तिला काय कळतं? … Read more

error: Content is protected !!