ऋणमुक्ती

© सौ. प्रतिभा परांजपेअक्षरा आहेराचे सामान पॅक करत होती, तेवढ्यात आईचा फोन आला.” झाली का तयारी लग्नाला जायची?”” हो, आणि आई तुझी ?”“अग –मला नाही जमणार. मी तुला मागे म्हणाले होते ना, नेमका रेखाला आठवा महिना लागलाय आणि त्यातून तिची ही पहिली वेळ, नाजूक प्रकृती. त्यामुळे उगाचच तिला त्रास होईल आणि माझेही मन लागणार नाही. … Read more

स्टेटस

© धनश्री दाबकेदुपारपासून आजीवर चिडून बसलेली राधिका, संध्याकाळी करुणा तिला न्यायला आली तरीही रागातच होती. आज राधिका आईशी काहीच बोलत नाहीये आणि आईही जरा गप्प गप्पच आहे म्हणजे परत यांचं नक्कीच कहीतरी बिनसलंय. पण या आजी नातीच्या जोडीसाठी हे काही नविन नाही. सतत त्यांच्यात हे असे रुसवे फुगवे सुरुच असतात असा विचार करून करूणाने दोघींकडेही … Read more

व्हॅलेंटाईन डे गिफ्ट

© सौ. प्रतिभा परांजपेसकाळचे नऊ वाजले होते.गोपाळ कुलकर्णी पेपर घेऊन उन्हात जाऊन बसले.पेपरच्या आतल्या पानात व्हॅलेंटाईन डे चे , लाल कपडे घातलेल्या मुलींचे, टेडी बियरचे, लाल फुगे, रोमँटिक कपल्सचे फोटो  व लाल गुलाब सांगत होते की आज व्हॅलेंटाईन डे आहे. त्यांची नात हर्षिता, लाल टॉप घालून मोबाईल वर, किती वाजता भेटायचं या वर मैत्रिणीशी चर्चा … Read more

आई तुझं मन राखण्यासाठी

© कांचन सातपुते हिरण्या” दोघांनी राहायचं सुख वेगळंच . तिसऱ्या कुणाचं बंधन नाही . सासू-सासर्‍यांची नजरकैद नाही . कामाचं , खाण्याचं हवं तसं नियोजन .सगळंच स्वातंत्र्य . तुला काय वाटतं रे अमित ? हे असं..” नेहाचं हे बोलणं कानावर पडलं आणि पुढचं ऐकायला रोहिणीताई खोलीच्या बाहेर थांबल्याच नाहीत म्हणजे त्यांना उभंच रहावेना . खरंतर उद्याचा … Read more

चकवा

© वैशाली जोशी“शाळेतून घरी परतत असताना रस्त्यात एक वयस्कर भिकारी दिसला. माझ्याकडे बघून काही खायला मागू लागला. मला दया आली अन् मी त्याला जवळच्या कॅन्टीनमधून दोन समोसे आणून दिले.आता मात्र तो ते न खाता पाणी मागू लागला…. मला जरा विचित्रच वाटलं … मी तिथून निघून जाऊ लागले तर तो भिकारी माझ्या मागे येऊ लागला.“तहान तर … Read more

हे सगळं तुझंच तर आहे

© धनश्री दाबकेसकाळी मंगेश जागा झाला तोच कापराच्या आणि होमाच्या सुगंधाने. आज गुरुजी लवकर उठले वाटतं… गुरुजी…स्वप्नीलच्या मित्रांसारखे आपणही त्याला गुरुजीच म्हणायला लागलोय की हल्ली. या विचाराने स्वतःशीच हसत मंगेश उठून बाहेर आला तर देवांच्या खोलीत..हो काळ्यांच्या घरातली एक खोली खास देवघरासाठी राखीव होती. त्यासाठी कविताने किचनला ओपन किचनमधे बदललं होतं..तर देवांच्या खोलीत स्वप्नील अतिशय … Read more

भैरवी ( भाग 2)

भाग 1 इथे वाचा © अपर्णा देशपांडे (अश्विनी गेली . जातांना तिने निलंयला तिच्या वडिलांचे गळ्यात बांधायचे साखळीतले घड्याळ भेट दिले .  तिच्या जवळ असलेल्या मोजक्या  जीव्हाळ्याच्या वस्तूतील एक ! जातांना चार पावलं पुढे जाऊन मागे फिरली ,  निलंय चा हात हातात घेऊन थोपटला आणि झपाट्याने बाहेर पडली . ) इथून पुढे ……निलंय कितीतरी वेळ तिच्या वाटेकडे … Read more

भैरवी ( भाग 1)

© अपर्णा देशपांडेकलकत्ता ते मुंबई असा कंटाळवाणा प्रवास करून निलय थकला होता . बिजूच्या रूम वर जाऊन मस्तं आराम करावा असे त्याला वाटले , पण निग्रहाने त्याने तो विचार झटकला . आजच विरार मधील सेनगुप्ता ने सांगितलेल्या सदनिकेत जाणे आवश्यक होते . नाहीतर मालक ती सदनिका दुसऱ्या कुणाला भाड्याने देऊन मोकळा होणार होता . अंगातला … Read more

प्रत्येक वेळी तोच कसा चुकेल??

©शुभांगी मस्केरिधिमा, प्रथमेश दोघांच्या सुखी संसारात, कशाचीच कमी नव्हती. दृष्ट लागावी असा संसार होता दोघांचा. रिधिमा दिसायला सुंदर, नीटनेटक  राहणीमान, फॅशनची जाण असलेली स्वभावाने हट्टी, वर देखल्या गोष्टींना महत्व देणारी. प्रथमेश मनमिळाऊ, सुस्वभावी. संसारवेल दोन निरागस गोड लेकरांमुळे बहरलेली होती. त्यामुळे घराचं खऱ्या अर्थाने गोकुळच झालं होत. सून, पत्नी, आई, बहीण रुपात.. घरात लक्ष्मी नांदते. … Read more

ती एक पवित्र जास्वंदी

© डॉ मुक्ता बोरकर – आगाशे“काकू मी जास्वंदीची फुलं तोडते हो” म्हणत अगदी गेट उघडून आत आलेली ती इकडेतिकडे न बघता आपल्याच नादात मस्त परडीभर फुलं तोडून घेऊन गेली.दिवाणखान्यात बसलेला तो हे दुरूनच न्याहाळत होता. दुसऱ्याही दिवशी ती तशीच आली. आज तर अगदी न्हालेले केसं तसेच एका बाजूला घेतलेले. कसलाच शृंगार नाही पण एका अनामिक सौंदर्याने … Read more

error: Content is protected !!