मनस्वी ( भाग 1)

This entry is part 1 of 2 in the series मनस्वी

©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदेमनस्वी नुकतीच एकोणीस वर्षाची झाली होती. आता लग्न लावून द्यायचं म्हणून काकाने दडपून तिचं वय दोन वर्षांनी वाढवून सांगितलं. पण काकाच्या घरातून बाहेर पडायची लग्न ही एकच संधी होती मनस्वीला आणि तिने ती घेतली होती. आता राजेशच्या साथीने आपण एक सुंदर जग उभं करु असं स्वत:ला सांगत तिने कालची रात्र गाडीत … Read more

स्वीकार

© स्मिता मुंगळे“नेहा,अग एकटीच काय करतीयेस इथे?बघ अंधारायला लागलंय,चल आत.”……आजी म्हणाल्या तशी नेहा गडबडीने आंब्याच्या झाडाखालून उठली आणि आजींकडे न बघताच खाली मान घालून आत जावू लागली.आज नेहाचे काहीतरी बिनसले आहे हे आजींच्या लक्षात आले. कारण दुपारपासून त्यांना नेहा गप्प गप्प आहे हे त्या बघत होत्या. नेहमी अखंड बोलत राहणारी ती आज कोणाशीच फारशी बोलत … Read more

या वळणांवर

©सौ. प्रतिभा परांजपेआज शाळेतून पियूला घ्यायला जात असताना प्राजक्ताला वाटेत तिची मैत्रीण पूनम भेटली. पूनम समोरच्याच बिल्डींगमधे राहायची.“एक काम करशील प्राजक्ता? आज माझ्या निनादला घेऊन येशील ?” प्राजक्ताला पाहून पूनमने विचारले.” हो चालेल..निनाद कोणत्या सेक्शनला आहे?”“के.जी टू बी मध्ये , पियू ओळखते त्याला.”” पण ते स्कूलवाले पाठवतील का त्याला माझ्याबरोबर?’“हो पाठवतील..अगं मीच गेले असते पण आज … Read more

किती ही मोठे झालो तरी

© शुभांगी मस्केसुमेधा आणि आयुष दोघे ही एकाच कॉलेजमध्ये सोबत शिकलेले..  मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि नंतर दोघांनी लग्न करायचं ठरवलं. दोन्ही घरच्या सहमतीने दोघांचं लग्न ठरलं.अग्नीला साक्षी मानून दोघे ही लग्नाच्या पवित्र बंधनात बांधल्या गेले.  आशा आणि अनुपरावांचा एकुलता एक मुलगा आयुष आणि आता लक्ष्मीच्या पावलांनी सुमेधा ही घरात आली होती. घरात आल्या आल्या तिच्या … Read more

नकार

© सायली जोशीआज तो अचानक समोर आला आणि तिला काय बोलावं हेच सुचेना. त्याच्या हाताशी दोन चिल्लीपिल्ली होती अन् पलीकडे बायको! क्षणभर तिच्या मनात आलं, ‘आज त्याच्या बायकोच्या जागी आपण असतो आणि ही दोन चिल्लीपिल्ली मला ‘आई ‘म्हणाली असती. खरचं किती गोंडस आहेत ही मुलं!’‘पण तू आपल्या लग्नाला नकार दिला नसतास तर हे शक्य होतं. अगदी अखेरपर्यंत … Read more

बी माय व्हॅलेंटाईन

© वीणा विजय रणदिवेनकळत तिच्या डोळ्यात पाणी आले. अत्यंत शिताफीने अश्रूबिंदूंना खाली पडू न देण्याची कसरत तिला करावी लागली. पाणीभरल्या डोहात, तिने तिच्या बुबूळांना वर्तुळाकार फिरवून त्यांना बाहेर पडण्यास मज्जाव केला. तसा अश्रूंना आदेशपर प्रेमळ दम दिला. त्यांनाही तिच्या मनीचे भाव कळले. तिला तिच्या अश्रूंचे मोल वाया घालवायचे नव्हते. तिच्याकरिता ते खरे मोती होते, प्रेमाने … Read more

कोंडी

© मृणाल शामराज.सगळं आभाळ निळ्या काळ्या ढगानी  आक्रसून गेलं होतं. वातावरणात एक कुंदपणा भरला होता. पंखा डोकयावर जोरात गरगरत असतानाही जाणवणाऱ्या दमटपणाने यशोधरा जागी झाली. डोळे जडावलेलेच होते. अळोखेपिळोखे  देतं ती उठली. खिडकीचे  पडदे सारत ती पुटपुटली, अग बाई, पाऊस येणार वाटतं. तिने पंख्याच बटण बंद केलं नी चहा ठेवला. चहाशिवाय हा जडपणा जाणार नव्हता. सवयीचा … Read more

त्यांचं काय चुकलं??

© सौ.गौरी गिरीश पटवर्धनदीड दोन वर्षांपूर्वी बरेच दिवसांनी, म्हणजे जवळजवळ सात आठ वर्षांनी आजोळी जाणं झालं. रेल्वे स्टेशन येणार म्हणून सामान घेऊन दरवाज्यापाशी येत होते, तेवढ्यात एक पन्नाशीच्या आसपास वय असणारे गृहस्थ मागच्या कोच मधुन आले आणि माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, मुलगा सांगा असं सगळ्यांना सांगत होते, अगदी डोळ्यात पाणी येत होतं त्यांच्या. नीट … Read more

ती सुंदरी….!

© सौ. अनला बापटसंध्याकाळची वेळ होती. तो टॅक्सी घेऊन आजूबाजूला अनेक आई. टी. ऑफिसेस असलेल्या चौकात उभा होता. आज शनिवार असल्यामुळे त्याला खात्रीच होती की कोणीतरी प्रवासी नक्की मिळेल.शनिवार असल्यामुळे बऱ्याच लोकांना घरी जायची घाई असते तर ते लोक कंपनीची गाडी सोडून टॅक्सी पकडून लवकर घरी जाण्याकरता ह्याच चौकात येतात, हे त्याला माहीत होते.तो पण … Read more

संसारावर आलेले सावट

©️ सौ. सोनल गुरुनाथ शिंदे“कशी आहेस सानू ?’ मोबाईलवर आलेला मेसेज वाचून सानिका विचारात पडली.‘मला अशा नावाने  हाक मारणारा कोण असेल? परेश तर नसेल ना? पण, त्याच्याकडे माझा हा नंबर कसा असेल? त्याला आठ वर्षांनंतर माझी आठवण  कां आली? पूर्वी जे होते ते सर्व कधीच संपले आहे.’ सानिका विचार करत  गॅलरी मध्ये बसून राहिली.परेश तिचा भूतकाळ … Read more

error: Content is protected !!