त्याचा अहंकार

© सौ. सोनल गुरुनाथ शिंदेहि कथा सत्य घटनेवर आधारीत आहे सांगली मधल्या एका दुर्गम गावातला एक हुशार मुलगा नीरज, घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर मुंबईत जाउन स्वतःच शिक्षण उत्तमरीत्या पूर्ण करतो, तिथेचं कॉलेजात त्याच्या बरोबरच शिकत असणाऱ्या नेहल बरोबर त्याची मैत्री होते.नेहल त्याला मनापासून आवडते, तिलाही हि गोष्ट माहित आहे आणी तिची … Read more

सिमरन आणि तिचा राज

© धनश्री दाबके“हा चल.. झाला माझा ऑफिसचा कॉल.. आता बोल.. काय म्हणत होतीस मगाशी? कुठे जाऊया आपण ट्रीपला?”“आई आपण नाही.. मला जायचंय.. सोलो ट्रीप म्हणाले मी.. पिंक सिटी म्हणजे जयपूर फिरायचंय मला. एकटीने. थोडं independent व्हायचंय..माझे माझे प्लॅन्स आखायचेत, decisions घ्यायचेत.. confidence बूस्ट करायचाय.” सिमरन बोलत होती आणि शुभांगीच्या चेहऱ्यावर ४४० व्होल्टचा शॉक बसल्यासारखे भाव … Read more

रेशीमगाठी

© सौ. प्रभा निपाणेऋषी एका सुखवस्तू आणि सुशिक्षित घरचा मुलगा. आई शिक्षिका त्यामुळे मुलांना आईचा धाक असा नाही. परंतु आदरयुक्त भीती होती. ऋषी आणि त्याची बहीण ऋतुजा दोघेही हुशार आणि गुणी मुले.ऋषीने इंजिनिअरिंग केले, खरतर त्याने चांगल्या कॉलेज मधून एम टेक करावे आणि स्पर्धा परीक्षा देऊन class one ऑफिसर व्हावे ही त्याच्या वडिलांची इच्छा होती. … Read more

गुंतता हृदय हे

© सौ. प्रतिभा परांजपेसानिका घाईघाईने आर्ट्स आणि काॅमर्स काॅलेजच्या गेटमधे शिरली. स्पर्धा बरोबर अकरा वाजता सुरू होणार. आता पावणे अकरा वाजत आले. हातातल्या मोबाइल मध्ये स्पर्धेच्या विषयावर बोलायचे काही पॉइंट्स नोट केलेले होते त्यावर नजर फिरवत ती घाईघाईने पुढे जात होती, तेवढ्यात– कोणीतरी तिच्यावर आदळले.“… दिसत नाही कां हो?” असे म्हणत तिने वर पाहिले. दोन काळेभोर … Read more

भैरवी ( भाग 2)

भाग 1 इथे वाचा © अपर्णा देशपांडे (अश्विनी गेली . जातांना तिने निलंयला तिच्या वडिलांचे गळ्यात बांधायचे साखळीतले घड्याळ भेट दिले .  तिच्या जवळ असलेल्या मोजक्या  जीव्हाळ्याच्या वस्तूतील एक ! जातांना चार पावलं पुढे जाऊन मागे फिरली ,  निलंय चा हात हातात घेऊन थोपटला आणि झपाट्याने बाहेर पडली . ) इथून पुढे ……निलंय कितीतरी वेळ तिच्या वाटेकडे … Read more

भैरवी ( भाग 1)

© अपर्णा देशपांडेकलकत्ता ते मुंबई असा कंटाळवाणा प्रवास करून निलय थकला होता . बिजूच्या रूम वर जाऊन मस्तं आराम करावा असे त्याला वाटले , पण निग्रहाने त्याने तो विचार झटकला . आजच विरार मधील सेनगुप्ता ने सांगितलेल्या सदनिकेत जाणे आवश्यक होते . नाहीतर मालक ती सदनिका दुसऱ्या कुणाला भाड्याने देऊन मोकळा होणार होता . अंगातला … Read more

ती एक पवित्र जास्वंदी

© डॉ मुक्ता बोरकर – आगाशे“काकू मी जास्वंदीची फुलं तोडते हो” म्हणत अगदी गेट उघडून आत आलेली ती इकडेतिकडे न बघता आपल्याच नादात मस्त परडीभर फुलं तोडून घेऊन गेली.दिवाणखान्यात बसलेला तो हे दुरूनच न्याहाळत होता. दुसऱ्याही दिवशी ती तशीच आली. आज तर अगदी न्हालेले केसं तसेच एका बाजूला घेतलेले. कसलाच शृंगार नाही पण एका अनामिक सौंदर्याने … Read more

पुनश्च ( भाग 3)

This entry is part 5 of 4 in the series पुनश्च

भाग 2 इथे वाचातसं तर अमेयची कंपनी त्याला लॉंगटर्म साठी अमेरिकेत पाठवायला तयार होती. पण अमेयला अजिबात लॉंग टर्मसाठी अमेरिकेत राहायचं नव्हतं कारण त्याचा जीव त्याच्या ममामध्ये अडकला होता. तो गेल्यानंतर ती अगदीच एकटी पडणार होती. जी अवस्था ममाची होणार तिच थोड्याफार फरकाने डॅडची होणार होती.आत्तापर्यंत ममा आणि डॅड आपल्यामुळे का होईना एकमेकांशी जोडलेले आहेत. … Read more

पुनश्च ( भाग 2 )

This entry is part 2 of 4 in the series पुनश्च

भाग 1 इथे वाचा लग्नानंतरही शालिनी वडलांबरोबर काम करतच राहिली. हळूहळू शालिनीवर जबाबदारी टाकत वडलांनी त्यांच्या वाढत्या वयाच्या मागणीनुसार बॅक सीट घेतली. शालिनीला कामात जसं जसं यश मिळत गेलं तस तसा agency चा व्याप वाढला. Recruitment assistants वाढले. मग दोन तीन वर्षांतच शालिनीला आपल्या लोकल agency ला ग्लोबल करण्याची स्वप्नं पडू लागली. पण ते करायचं … Read more

पुनश्च ( भाग 1)

This entry is part 1 of 4 in the series पुनश्च

© धनश्री दाबकेबर्‍याच वेळापासून शालिनी कपाटासमोर उभी होती, कुठली साडी नेसावी या विचारात. एकतर आज खूप दिवसांनी साडी नेसायची होती आणि अनेक वर्षांनी शंतनू बरोबर एकत्र कुठेतरी जायचं होतं.शेवटी अमेयने गेल्या वर्षी तिच्या वाढदिवासाला घेतलेली साडी शालिनीने निवडली आणि छानपैकी तयार होऊन शालिनी ठरलेल्या वेळेला शंतनूच्या ऑफिसमधे पोचली.  इतक्या वर्षांनी शालिनीला असं ऑफिसमधे पाहून शंतनूला एकदम त्यांचे … Read more

error: Content is protected !!