©️®️सायली जोशी.तास उलटून गेला तरी वरुण एका कॅफेमध्ये बसून प्रियाची वाट पाहत होता.“सर, प्लीज काहीतरी ऑर्डर द्या. तुम्ही समोरची पाटी वाचली नाही का अजून? कामाव्यतिरिक्त इथे जास्त वेळ बसण्यास मनाई आहे.” वेटर तिसऱ्यांदा येऊन सांगून गेला. चेहऱ्यावरून तो पार वैतागलेला वाटत होता.इतक्यात प्रिया घाईघाईने येताना दिसली. तिला पाहून वरुणच्या कपाळावरच्या आठ्या सैल झाल्या. “सॉरी वरुण, ऑफिसचे काम खूप होते. शिवाय त्यात ट्रॅफिक! उगीचच तासभर तुम्हाला वाट पाहावी लागली. खरंच सॉरी.” प्रिया मनापासून म्हणाली.“ठीक आहे, चालायचंच. मी कॉफी घेईन. प्रिया, तुम्ही काय घ्याल, कॉफी की आणखी काही?” वरुण गडबडीने म्हणाला.“मला कॉफी चालेल.” ती थोडी रिलॅक्स होत म्हणाली.अगदी काही वेळातच मगाचसा वेटर गालातल्या गालात हसत कॉफी घेऊन आला.“प्रिया, माझा होकार मी आधी तुम्हाला कळवला आहे. आता तुमच्याकडून उत्तर येणं अपेक्षित आहे.” वरुण कॉफीचा घोट घेत म्हणाला. “हम्म..” प्रिया इकडे तिकडे बघत होती खरी, पण डोळ्यांच्या कोपऱ्यातून … Read more